Interview Question

प्रशासननामा

  • - सरकारी कार्यालयाला तुम्ही कधी भेट दिली होती का? कसा अनुभव आला?
  • - नोकरशाही या शब्दाला नकारात्मक छटा आहे का?
  • - नोकरशाहीला 'बाबू' म्हणणे योग्य आहे का?
  • - नोकरशाही संरचनेतल्या सकारात्मक बाबी कोणत्या?
  • - नोकरशहांनी (bureaucracy) प्रशासकाची भूमिका निभवावी की फक्त मध्यस्थाची?
  • - लोकसेवा आणि समाजसेवा यात काय फरक आहे?
  • - प्रशासक व व्यवस्थापक यात काय फरक असतो?
  • - लोकप्रशासन व लोकव्यवस्थापन यात काय फरक आहे?
  • - नोकरशाही व राजकारणी यांच्यात किती अंतर असले पाहिजे?
  • - नोकरशहा हा सरकारी नोकर असतो की लोकसेवक असतो की दोन्ही असतो?
  • - नोकरशाहीने तटस्थ असावे की वाहलेले (कमिटेड) असावे? वाहिलेले असावे तर कोणाला?
  • - देशात कोणाची गरज जास्त आहे, तज्ज्ञांची की अष्टपैलू लोकांची? (generalist)
  • - जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी यात काय फरक असतो?
  • - सरकारी कार्यालयाला तुम्ही कधी भेट दिली होती का? कसा अनुभव आला?
  • - नोकरशाही या शब्दाला नकारात्मक छटा आहे का?
  • - नोकरशाहीला 'बाबू' म्हणणे योग्य आहे का?
  • - नोकरशाही संरचनेतल्या सकारात्मक बाबी कोणत्या?
  • - नोकरशहांनी (bureaucracy) प्रशासकाची भूमिका निभवावी की फक्त मध्यस्थाची?
  • - लोकसेवा आणि समाजसेवा यात काय फरक आहे?
  • - प्रशासक व व्यवस्थापक यात काय फरक असतो?
  • - लोकप्रशासन व लोकव्यवस्थापन यात काय फरक आहे?
  • - नोकरशाही व राजकारणी यांच्यात किती अंतर असले पाहिजे?
  • - नोकरशहा हा सरकारी नोकर असतो की लोकसेवक असतो की दोन्ही असतो?
  • - नोकरशाहीने तटस्थ असावे की वाहलेले (कमिटेड) असावे? वाहिलेले असावे तर कोणाला?
  • - देशात कोणाची गरज जास्त आहे, तज्ज्ञांची की अष्टपैलू लोकांची? (generalist)
  • - जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी यात काय फरक असतो?
  • भारताला गव्हर्नमेंटची गरज आहे की गव्हर्नन्सची? गुड गव्हर्नन्स काय असते?
  • चांगले प्रशासन (good administration) देखील असले पाहिजे का?
  • लालफीतशाहीचा कारभार लाल गालिचात कसा बदलता येईल?
  • विकास व शिस्तीसाठी आपण देशाला नोकरशहांच्या हवाली केले पाहिजे का? (जसे सिंगापूरने केले)
  • आपण नोकरशाहीमध्ये खाजगीतील लोकांना वरच्या स्तरावर प्रवेश (lateral entry) देणे सुरु करायला हवे का?
  • खाजगी क्षेत्रातील कामाचा अनुभव घेण्यासाठी नोकरशहांना देण्यात येणारी मोठी सुटी (sabbatical) बंद करायला हवी की चालू ठेवली पाहिजे?
  • अनामिकत्वाचे (anonymity) तत्व काय असते? ते भारतात पाळले जाते का?
  • नोकरशहाने मीडियाशी संबंध ठेवावेत का?
  • नोकरशहांनी कामाबरोबर येणारी प्रसिद्धी व सत्ता स्वीकारावी की नाकारावी?
  • प्रशासकीय संरचना उभी असावी की आडवी?
  • निवृत्तीनंतर नोकरशहांना खाजगी किंवा सरकारी पदे देण्यापूर्वी विश्रांतीचा काळ (cooling period) ठेवायची आवशक्यता आहे का?
  • बढती जेष्ठतेनुसार असावी की कामगिरीनुसार?
  • सेवा हमी कायदा, माहितीचा अधिकार यांनी नोकरशाहीला वेसण घातली आहे का?
  • मुंबईतील सचिवालयाचे नाव बदलून मंत्रालय असे का ठेवले?
  • प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या महत्वाच्या सूचना कोणत्या?
  • भारतात नोकरशहा संख्येने पुरेसे आहेत का?
  • नोकरशाहीचे महत्व येणाऱ्या काळात कायम राहील असे वाटते का?
  • प्रशासकीय सेवांमध्ये काम करणे हे करियर आहे की सेवा आहे?
  • महसुलाच्या जास्तीत जास्त किती टक्के खर्च नोकरशाहीवर केला पाहिजे?
  • राज्याच्या व देशाच्या नोकरशाहीचा शीर्ष नेता कोण असतो?
  • 'आपली नोकरशाही बदल करायला किंवा स्वीकारायला राजी नसते' असा आरोप नेहमी केला जातो. तुम्ही त्या आरोपाशी सहमत आहात का?
  • अभिलेख वर्गीकरण किती प्रकारात केले जाते?
  • राजेशाही व लोकशाही यातील नोकरशाहीच्या वैशिष्ट्यात काय फरक असतो?
  • खाजगी क्षेत्रातील नोकरदार व्यक्तीपेक्षा सनदी सेवकांनी कोणते गुण जास्तीचे जोपासले पाहिजेत?
  • सामान्य माणूस व खाजगी क्षेत्रातील नोकरदार यांच्यापेक्षा सनदी सेवकांना जास्तीचे उत्तरदायित्व असते. हे न्याय्य आहे का? - त्यामागे कोणता तर्क आहे? जिल्हाधिकारी तोच कलेक्टर - घटनेच्या कलम 50 मध्ये कार्यपालिका व न्यायपालिका वेगळे ठेवण्यावर भर दिला आहे. ते साध्य झाले आहे?
  • कॉर्नवॉलिसचे नियम (कोड) काय होते? जिल्हा प्रशासनात उपजिल्हाधिकारी व डीवायएसपी कणा आहेत. त्यांना एकमेकांचे काम समजून घेण्यासाठी एक वर्षासाठी एकमेकांचे काम द्यायला काय हरकत आहे?
  • डीवायएसपी पदासाठी वेगळी परीक्षा घ्यायची गरज आहे का?
  • स्वातंत्र्योत्तर काळातील नोकरशाहीच्या कामगिरीकडे तुम्ही कसे पाहता?
  • खाजगी सारखे कामावर घ्या व काढून टाका धोरण (हायर अँड फायर) प्रशासनातही आणावे का?
  • उपयोजन

  • चांगला प्रशासक बनण्यासाठी कोणते गुण आवश्यक असतात?
  • शासन व प्रशासन यात काय फरक आहे?
  • चांगला राजकारणी बनण्यासाठी पण तेच गुण आवश्यक आहेत का?
  • पुढील विधान स्पष्ट करा 'अधिकारी घडवले जातात, जन्मत नाहीत'
  • एक डेप्युटी कलेक्टर आहे त्याची 23 वर्षात 56 वेळा बदली झाली. त्याच्या बॅचमेटची तेव्हढ्याच कालावधीत 22 वेळा बदली झाली. त्यांच्यापैकी कोणाला यशस्वी म्हणता येईल?
  • - पदकालावधीची शाश्वतीत (security of tenure) तरतुदीबद्दल तुमचे काय मत आहे? - अशी शाश्वती चांगली की वाईट?
  • अग्निवीर सारखी नीतीवीर योजना नोकरशाहीसाठी आणली पाहिजे का?
  • सनदी सेवा हा एक वाईट जॉब आहे यावर दोन मिनिटे बोला.
  • नागरी सेवा दिवस कधी असतो? तेव्हाच का?
  • दैनंदिन प्रशासनात साधेपणा कसा आणता येईल?
  • चार ते पाच दिवस कामकाजाचा आठवडा करण्याचा प्रस्ताव आहे. तुम्ही त्या प्रस्तावाला पाठिंबा द्याल का?
  • - फक्त काम व काहीच विरंगुळा नसेल तर प्रशासक निरस बनतो. तुम्हाला काय वाटते?
  • गॅझेटेड अधिकारी काय असतो? तुम्ही तसे बनणार आहात का?
  • वर्ग एक ते चार अशी विभागणी कशाच्या आधारावर करण्यात आली आहे?
  • सनदी सेवकांच्या प्रशिक्षणाचा कालावधी कमी करण्याची गरज वाटते का?
  • रँक, प्रतिष्ठा, सत्ता, कामाची सुरक्षा, लोकसेवा - तुम्ही कसा क्रम लावाल?
  • नोकरशाहीबद्दल लोकांच्या मनात वाईट प्रतिमा असते.अकुशल, भ्रष्ट, अतत्पर इत्यादी. तरीही तुम्हाला सरकारी नोकरीत यायचे आहे. का?
  • नोकरशाहीला युनियन बांधण्याची परवानगी दिली पाहिजे का?
  • प्रशासक हृदयाने कमी व डोक्याने जास्त काम करतात असे तुम्हाला वाटते का? मिशन कर्मयोगी बद्दल ऐकले आहे का? नियम आधारित प्रशासन व भूमिका आधारित प्रशासन यात काय फरक असतो?
  • भ्रष्टाचार

  • प्रामाणिकपणा हे सर्वोत्तम धोरण आहे. प्रामाणिकपणा हे सर्वोत्तम तत्व आहे. कोणते विधान योग्य आहे?
  • फक्त भ्रष्ट नसणे म्हणजे प्रामाणिकपणा का?
  • - कुमार्गाने मिळालेला पैसा (graft), लाच (bribe), ठेका देण्यासाठी मिळालेले पैसे (kickbacks) आणि हात ओला करणे (स्पीडमनी) यात काय फरक आहे?
  • एखादया सरकारी कर्मचाऱ्याने एखादया बेकायदेशीर कामासाठी लाच घेतली व ते काम केलेच नाही तर त्याला भ्रष्टाचार म्हणता येईल का?
  • एखादया कायदेशीर कामासाठी लाच घेतली तर त्याला भ्रष्टाचार म्हणायचे का?
  • भेटी स्वीकारणे (उदा. दिवाळीत मिठाई) हाही भ्रष्टाचार आहे का?
  • कोणी जर पुष्पगुच्छ स्वीकारला तर तो भ्रष्ट्राचार आहे का?
  • कोणी जर अधिकाऱ्याच्या नावाचा बॅनर लावला असेल तर तो भ्रष्ट्राचार आहे का?
  • खाजगी क्षेत्रातही भ्रष्टाचार असतो का? उदाहरणे दया.
  • भ्रष्टाचार प्रतिबंध कायदयात खाजगी क्षेत्राचाही समावेश होतो का?
  • तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भ्रष्टाचारावर मात करता येईल का?
  • कोणत्याही निर्णयाचे उत्तरदायित्व (accountability) ही नोकरशहाची असते की राजकीय नेतृत्वाची?
  • राज्य लोकसेवा आयोग (MPSC)

  • कार्यालयाचा पत्ता
  • स्थापनेपूर्वी काय होते?
  • संघ व राज्य लोकसेवा आयोगाची रचना.
  • ब्रीदवाक्य व त्याचा अर्थ
  • पोलिस खाते

    एक असे खाते ज्याच्याबद्दल उमेदवारांमध्ये प्रचंड कुतूहल व आकर्षण असते तर ते म्हणजे पोलिस खाते. एक ही गणवेशधारी सेवा आहे, तेही एक आकर्षण आहे. काहीजण तर फौजदार बनयाचेच या ध्येयाने झपाटलेले असतात. मुंबई पोलिस अधिनियम १९५१ नुसार महाराष्ट्र राज्यासाठी पोलिस दलाचे गठन करण्यात आले आहे. राज्य पोलिस दलात शहरी भागासाठी आयुक्तालये व ग्रामीण भागाकरिता परीक्षेत्रे निर्माण करण्यात आलेली आहेत. मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व आयुक्तालये ही पोलिस महासंचालकाच्या अधिपत्याखाली आहेत. 'सदरक्षणाय, खलनिग्रहणाय' असे ब्रीद घेऊन महाराष्ट्र पोलिस सेवा (म. पो. से.) कार्य करते.

    पोलिस खात्याची उतरंड

    सर्वात वरती पोलिस महासंचालक येतो. (DGP) त्याखाली अतिरिक्त महासंचालक असतात (१४), त्याखाली विशेष पोलीस महानिरीक्षक (Special IGP) हे महसूल आयुक्ताच्या दर्जाचे पद येते. त्याखाली पोलिस उपमहानिरीक्षक (DIG), त्यानंतर जिल्हा स्तरावर पोलिस अधीक्षक (SP/DCP), मग अतिरिक्त पोलिस अधीक्षक (Add. SP), मग पोलिस उपअधीक्षक (DySP/ACP) हे पद येते जे राज्यसेवेतून प्राप्त होते. त्यानंतर मग वरिष्ठ पोलिस निरीक्षक (Sr.PI), पोलिस निरीक्षक (PI), मग सहाय्यक पोलिस निरीक्षक (API), पोलिस उपनिरीक्षक (PSI), सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक (APSI), मग शेवटी पोलिस हवालदार (Police Head Constable), पोलिस नाईक (PN) आणि अंती पोलिस शिपाई (PC) अशी ही उतरंड आहे

    पोलिस आयुक्तालयातील कार्य

    राज्यातील प्रमुख अशा दहा शहरांमध्ये पोलिस आयुक्तालयांची योजना करण्यात आलेली आहे. पोलिस उपाधीक्षक (DySP) हे पद ग्रामीण परीक्षेत्रासाठी तर पोलिस उपायुक्त (DCP) हे पद शहरी भागासाठी मुक्रर करण्यात आले आहे. पोलिस अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण महाराष्ट्र पोलिस अकॅडमी, नाशिक येथे पार पडते. राज्य पोलिस दलाचा स्वत:चा ध्वज आहे. त्यातील पंचकोनी तारा हे पोलिसांचे पारंपरिक चिन्ह आहे. झेंड्यातील व्दिवर्तुळात्मक ढाली या संरक्षणाचे प्रतिक आहेत. हाताचा पंजा हा अभय दर्शविणारा आहे.

    Dy SP

  • जिल्हे छोटे केले तर कायदा व सुव्यवस्था सुधारेल का?
  • लोक पोलिसांना का घाबरतात?
  • तरुण गुन्हेगारीकडे का वळतात?
  • आंदोलकांवरील खटले सरकारला मागे घेता येतात का?
  • त्याचा पोलिसांच्या मनोबळावर परिणाम होत नाही का?
  • या पदावर राजकीय दबाव खूप जास्त असतो. मग Dy SP का व्हायचंय?
  • दोन आमदार तुमच्याकडे सामाजिक समस्या घेऊन आले तर तुम्ही काय कराल?
  • थर्ड डिग्री चौकशी व मानव अधिकार यात संघर्ष आहे का?
  • त्यावर काय उपाय करता येतील?
  • Dy SP चे प्रमोशन कोणत्या पदावर व कधी होते?
  • ACP व Dy SP मध्ये काय फरक आहे?
  • ACP ला कोणते अधिकार जास्तीचे असतात?
  • ACP हे चॅप्टर केसेस चालवू शकतात का?
  • अशी कोणत्या केसेस आहेत ज्याची चौकशी DySPच करतात? (atrocity)
  • या पदाला ठाण्याचा चार्ज नसतो. मग हे पद ठेवण्याची गरज आहे का?
  • रेवेन्यू पोलिसिंग काय असते?
  • महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीचे मुख्यालय कुठे आहे?
  • आयुक्तालय पद्धत (commissionarate system) काय आहे? महाराष्ट्रातील किती ठिकाणी आहे? काही फायदा झाला आहे का?
  • तुमचे या सेवेत कोणी आदर्श आहेत का?
  • पोलिसी खाक्या म्हणजे काय?
  • पोलिसांबद्दल जनतेमध्ये 'आदरयुक्त भीती' का 'भीतीयुक्त आदर'?
  • महाराष्ट्र पोलीस दलाची संरचना कशी आहे?
  • महाराष्ट्र पोलिसांचे काम कोणत्या कायद्यानुसार चालते?
  • पोलीस दलासाठी 'एक देश - एक गणवेश' असला पाहिजे का?
  • महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MOCCA) काय आहे? तो कोणकोणत्या राज्यात लागू आहे?
  • MOCCA लावण्याचे निकष काय आहेत?
  • एन्काऊंटर करणे नैतिक आहे का?
  • CID चे नक्की काम काय? कोणत्या केसेस CID हाताळते?
  • जर CID मालिकेतील प्रद्युमन २० वर्षांपूर्वी ACP होते तर ते आज कुठल्या पदावर असायला हवे होते?
  • स्मार्ट पोलिसिंग' कसे काम करते?
  • C-६० हे दल काय काम करते? SWAT हे दल काय आहे? ATS कसे काम करते?
  • सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे कोणाचे कर्तव्य आहे? त्यासाठी कोणता कायदा आहे?
  • जमावबंदी कायद्याचा आपल्याकडे दुरुपयोग केला जातो आहे का?
  • सध्या पोलिस त्यांचे तपासकार्य नीट करत नाहीत त्यामुळे न्यायालयातून आरोपी पटकन सुटतात अशी सामान्य जनतेची तक्रार असते. त्याबद्दल तुमचे मत काय आहे?
  • Conviction rate म्हणजे काय? त्याचे प्रमाण किती आहे? ते प्रमाण तेवढं असण्याचं तुम्हाला कारण काय वाटतं? पोलीस व्यवस्थित काम करत नाही असं तुम्हाला वाटतं का?
  • पोलीस स्वतःहून तक्रार नोंदवून तपास करू शकतात का?
  • CBI व CID मधील फरक सांगता येईल का?
  • गुन्हेगारांना कडक शासन होणे जास्त महत्वाचे आहे की शासन होण्याची निश्चिती जास्त महत्वाची आहे?
  • हिंदू दहशतवाद असतो का?
  • बंद घोषित करणे कायद्यात बसते का? बंद व हरताळ यात काय फरक आहे?
  • कायदा व सुव्यवस्था व अंतर्गत सुरक्षा यात काय फरक आहे?
  • नक्षलवाद्यांना हाताळणे सेनादलाच्या हाती सोपवले पाहिजे का?
  • समाजकंटक (anti-social elements) कोण असतात? समाजकंटक व राष्ट्रद्रोही एकच असतात का?
  • पोलीस दलामध्ये संख्या महत्वाची असते की दर्जा?
  • पोलीस दलाचे आधुनिकीकरण करायचे म्हणजे काय करायचे?
  • पोलीस दलांना युनियन बांधायची परवानगी दिली पाहिजे का? हा त्यांच्या लोकशाही अधिकारांचा प्रश्न नाही का?
  • जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असेल तर पोलीस दलांनी राज्य सरकारच्या आदेशांना बाजूला ठेवून स्वतंत्रपणे निर्णय घेतले पाहिजेत का? (उदा. ठोक मोर्चांमधील परिस्थिती)
  • पोलीस दल राजकीय प्रभावापासून मूक्त करणे आवश्यक आहे का?
  • तुम्ही कधी ट्रॅफिक पोलिसांना लाच दिली आहे का?
  • पोलीस दलात भ्रष्टाचार आहे का? तुम्ही तो कसा कमी क
  • ) जनमानसात पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी काय करता येईल? सिनेमातून होणारी पोलिसांची बदनामी थांबवली पाहिजे का?
  • पोलीस हप्ता वसूल करतात का? काय उपाययोजना कराल?
  • महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (MFAS)

    शासनाचे विविध विभाग, महामंडळे येथील लेखा विषयक (accounts) व वित्तीय जबाबदारीचे काम करण्यासाठी प्रशिक्षित अधिकारी उपलब्ध करून देता यावेत या उद्देशाने केंद्र सरकारच्या धर्तीवर १९६५ मध्ये महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेची स्थापना करण्यात आली. या सेवेचे दोन भाग आहेत. कोषागारे व स्थानिक निधीलेखा. राज्यसेवा परीक्षेतून वित्त व लेखा सेवा गट 'अ' व 'ब' या पदांसाठी निवड होते. ही सेवा ज्यांना शांतपणे आपले काम करायला आवडते त्यांच्यासाठी चांगली आहे. थेट जनतेशी संपर्क कमी असतो.

    मोटार वाहन विभाग

    हा विभाग गृहमंत्रालयाच्या अधीन असतो. प्रादेशिक परिवहन अधिकारी हे जिल्हास्तरावरील सर्वोच्च पद आहे. राज्यसेवा परीक्षेतून सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट - ब या पदासाठी निवड करण्यात येते. कामे: शिकाऊ व पक्के ड्रायव्हिंग लायसेन्स तसेच आंतरराष्ट्रीय वाहन चालक परवाना देणे,

    सहकार खाते

    महाराष्ट्र देशस्तरावर सहकार चळवळीसाठी नावाजलेला आहे. सहकारी संस्था राज्यात खेडोपाडी पसरले आहेत. या संस्थावर नियंत्रण व देखरेखीसाठी सहकार खात्याची निर्मिती करण्यात आली. राज्यसेवा परिक्षेतून उपनिबंधक व सहाय्यक निबंधक, सहाकरी संस्था गट अ व गट ब या पदासाठी निवड करण्यात येते. जिल्हास्तरावर उपनिंबधक व तालुका स्तरावर सहाय्यक निबंधक कार्य करतो. जिल्हा व तालुका उपनिबंधाच्या जबाबदार्‍या व कामाचे स्वरूप सारखेच आहे. त्यात सहकारी सस्थांची नोंदणी करणे, रद्द करणे, संस्थाचा वर्ग/ प्रवर्ग निश्‍चित करणे. त्याशिवाय सरकारी संस्थाच्या वार्षिक सभा, सभासदाचे सदस्यत्त्व रद्द करणे, सरकारी संस्थाची वार्षिक हिशेब तपासणे करण्याची व्यवस्था लावून देणे ही कामे करायची असतात. हे पद चालवण्यासाठी धीर व कार्यकुशलता याची गरज भासते.

    महसूल प्रशासन

    महसूल प्रशासनात कार्यकारीपेक्षा अकार्यकारी पदांची संख्या जास्त आहे. जसे की निवडणूक, पुरवठा, करमणूक इत्यादी. खूपसे अधिकार महसूल खात्याकडे आहेत, परंतु हळूहळू अधिकारांचे विकेंद्रीकरण इतर खात्यांकडे चालू आहे.

    उपजिल्हाधिकारी

    हे राज्य सेवेतील सर्वोच्च पद आहे. (प्रश्न - तसे MPSC ने कुठे म्हटले आहे का?) ते वर्ग एक (class I) मध्ये मोडते. दोन प्रकारे या पदापर्यंत पोहचता येते, बढतीने व सरळ सेवा प्रवेशाने. या पदाचे वैशिष्ट हे की १५ ते २० वर्षे सेवा झाल्यावर काही निकष पूर्ण केले असतील तर भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) प्रवेश मिळतो. ही गोष्ट या पदाचे आकर्षण वाढवते. यू . पी. एस. सी. ची परीक्षा देऊन जेव्हा आय. ए. एस. मिळते तेव्हा केडर म्हणून भारतातील कोणतेही राज्य मिळते. पण काहींना राज्यातच काम करायची इच्छा असते. त्यांच्यासाठी आधी जिल्हाधिकारी बनून मग आय. ए. एस. बनणे हा थोडा लांबचा पण इच्छापूर्ती करणारा प्रवास ठरतो.

    मार्गातील खाच खळगे

    अशाप्रकारे आय. ए. एस. चे मिळणे जरी आकर्षक असले तरी हे नक्की किती वर्षात साध्य होईल हे निश्चित नसते. यू. पी. एस. सी. कडून थेट भरती झालेल्या अधिकाऱ्यांची पदोन्नती जशी विशिष्ट कालक्रमाने होत जाते तसे इथे होत नाही. राज्यात जेव्हढी आय. ए. एस. ची पदे उपलब्ध असतील त्यात दोन वाटे केले जातात. पहिला वाटा राज्यसेवा परीक्षा देवून आलेले (आतले) इच्छुक यांना जातो. दुसरा वाटा जे यू . पी. एस. सी.ची परीक्षा उत्तीर्ण होऊन थेट राज्य केडर मिळवून दाखल होतात त्यांना जातो. पहिला वाटा जो असतो त्याला गट अ व गट ब या दोन्ही सेवांना प्रयत्न करायची संधी असते. साधारणपणे दोन तृतीयांश पदे गट अ मधून भरली जातात व उरलेली एक तृतीयांश पदे गट ब मधून भरली जातात. ज्या अधिकार्यांना आय. ए. एस. मध्ये बढती दयायची आहे त्यांची शिफारस राज्य सरकार करते. ही शिफारस करण्यापूर्वी अधिकार्यांचा सेवा पूर्वेतिहास (service record) पहिला जातो. तो ज्यांचा समाधानकारक आहे त्यांची एक यादी बनवली जाते. मग या यादीतील अधिकाऱ्यांची एक छोटी लेखी परीक्षा घेतली जाते व नंतर मुलाखत घेतली जाते. अशा प्रकारे एक शिफारसीची अंतिम यादी बनवून यू . पी. एस. सी. कडे सोपवली जाते. यू . पी. एस. सी. या उमेदवारांची मुलाखत घेते व त्यातून अंतिम नेमणूक होते. काहीजण लवकर आय. ए. एस. मध्ये शिरतात तर काहींना वेळ लागू शकतो. सगळ्यांना ते पद मिळेलच असेही नाही. त्यामुळे प्रत्येक उपजिल्हाधिकारी आय. ए. एस. या प्रतिष्ठित सेवेपर्यंत पोहोचतोच असे नाही.

    उपजिल्हाधिकार्याच्या जबाबदाऱ्या

    उपजिल्हाधिकारी हा उपविभागीय अधिकारी म्हणून काम करतो. ते करताना त्या उपविभागात शांतता व सुव्यवस्था राखणे, निर्वाचन अधिकारी म्हणून काम करणे व महसुली वसुलीचा आढावा घेणे या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. तो त्या उपविभागाचा प्रशासक किंवा सेनापती असतो. याशिवाय विविध खात्यांचा उपजिल्हाधिकारी म्हणूनही नेमणूक होऊ शकते. उदा. पुनर्वसन, रोहयो, राज शिष्टाचार इत्यादी. एकूण पंधरा प्रकारच्या प्रमुख पदांवर त्याची नेमणूक होऊ शकते. ही काम करताना त्या खात्याचा इतर खात्यांशी समन्वय साधणे, ठरलेली उद्दिष्टे पूर्ण करणे व त्यासंबंधी अहवाल तयार करणे या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.

    उपजिल्हाधिकारी हा निवासी जिल्हाधिकारी म्हणूनही नेमला जाऊ शकतो. ते काम करताना सर्व खाती, जिल्हाधिकारी व तहसीलदार केंद्र व राज्यांचे विभाग यांच्यात समन्वय साधण्याची कसरत त्याला करावी लागते. शिष्टमंडळांना भेटणे, मोर्चाला सामोरे जाऊन परिस्थिती सांभाळणे ही कामेही करावी लागतात. जिल्हाधिकार्याच्या अनुपस्थितीत जिल्हा प्रशासनात सुसूत्रता ठेवण्याची जबाबदारीही निवासी जिल्हाधीकार्यावर असते. याशिवाय उपजिल्हाधिकाररयाची प्रतिनियुक्तीवर MIDC, CIDCO, MHADA अशा स्वायत्त मंडळांवरही नेमणूक होऊ शकते. या सर्वातून हे दिसते की उपजिल्हाधिकार्याचे काम वैविध्यपूर्ण असते. या जबाबदाऱ्या सांभाळताना सावधानता, प्रशासन कौशल्य यांचा कस लागतो.

    उपजिल्हाधिकारी

  • जिल्हाधिकारी हे पद कोणी चालू केले?
  • उपजिल्हाधिकारी हे पद कोणी चालू केले?
  • किती प्रकारची प्रकारची पदे उपजिल्हाधिकाऱ्याला मिळू शकतात?
  • निवासी जिल्हाधिकारी कोण असतो? त्याची काय कामे असतात?
  • कार्यकारी दंडाधिकारी व न्याय दंडाधिकारी यात काय फरक असतो?
  • प्रांत हे पद काय आहे?
  • मामलेदार शब्द कुठून आला?
  • पुनर्वसन अधिकारी म्हणून कसा समन्वय साधाल?
  • उपजिल्हाधिकारी हे पद प्रामुख्याने कार्यकारी आहे की देखरेख करणारे? (supervisory)
  • Sub Divisional Magistrate म्हणून DCचे अधिकार कोणते?
  • जमावबंदी करण्यासाठी कलम कोणते?
  • हद्दपारी कोणत्या कारणासाठी करता येते?
  • बॉण्ड कधी घेतला जातो? (Maharashtra Prohibition Act)
  • विक्रीकर अधिकारी (ACST)

  • वाढीत वस्तूंचा महसूल किती व सेवांचा किती?
  • GST व्यवस्थेत सामील झाल्याचे राज्याला कोणते फायदे व तोटे झाले?
  • GSTN तंत्रज्ञान काय आहे? ते इतर क्षेत्रांमध्ये वापरता येईल का?
  • AI चा वापर कसा करणार?
  • कराचा परिणाम (tax impact) आणि कराचे ओझे (tax incidence) यात काय फरक असतो?
  • कर लवचिकता (tax elasticity) आणि कर तीव्रता (tax intensity) काय असते?
  • लॅफेरचे वक्र काय दर्शवते?
  • आदर्श कर- जीडीपी प्रमाण किती असते?
  • कर खर्च (tax expenditure) काय असतो?
  • कर प्रशासनात स्थानिक स्वराज्य संस्थांना विशेषतः पालिकांना कसे सहभागी करून घेता येईल?
  • तहसीलदार गट अ

    महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ अन्वये राज्य शासन प्रत्येक तालुक्यासाठी एक 'तहसीलदार' नेमते. तहसीलदारालाच 'मामलेदार' असेही नाव प्रचलित आहे. हे गट 'अ' प्रकारचे पद आहे. जमीन महसूलाबाबत कोणताही अर्ज सर्वप्रथम तहसीलदारासमोर येतो. त्यावर त्याने योग्य तो निर्णय घेतल्यावरच तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जातो.

    तालुक्यातील सर्व प्रशासकीय विभागातील मुख्य समन्वयक, अतिशय प्रतिष्ठेची पोस्ट. ग्रेड पे - 5000, प्रमोशन साधारण 10-12 वर्षानंतर उपजिल्हाधिकारी पदावर होते.

    जमीन महासुलाशिवाय पिकांची आणेवारी काढणे ही महत्वाची जबाबदारी तहसीलदारावर असते. या आणेवारीच्या आधारेच दुष्काळाची स्थिती जाणून घेऊन त्याची घोषणा केली जाते. यानंतर सरकारने नियमांनुसार निश्चित केलेली नुकसानभरपाई तहसीलदाराच शेतकऱ्यांपर्यंत पोहचवतो. तालुक्यातून गौण खनिजांचे उत्खनन करायचे असेल (उदा. वाळू) तरी तहसीलदाराची परवानगी घ्यावी लागते. 'बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या लोकांवर कारवाई करायला गेल्यावर तहसीलदारावर हल्ला झाला' अशा बातम्या वर्तमान पत्रात नेहमी वाचायला मिळतात. त्यातून तहसीलदार पदाचे महत्वच दिसते.

    स्वस्त धान्य दुकानांवर देखरेख ठेवणे व काळाबाजार रोखणे ही कामेही तो करतो. तहसीलदार तालुका दंडाधिकारी म्हणून देखील काम करतो. कायद्याची पदवी न घेताही तो अर्ध न्यायिक जबाबदाऱ्या पार पाडतो. त्यात समन्स पाठवणे, प्रसंगी अटक वौरण्ट काढणे, दंड करणे असे अधिकार येतात.

    नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी यांना मार्गदर्शन करणे, वेळोवेळी आपल्या कार्याचा अहवाल प्रांताधिकार्यांकडे सादर करणे आणि तालुक्यात नैसर्गिक संकट आल्यास त्यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे त्वरित सादर करणे, ही कामे तहसीलदारास करावी लागतात.

    तहसीलदाराचे महत्व

    वरील जबाबदार्यांचे बारकाईने अवलोकन केले तर लक्षात येईल की ज्याला आपण सरकार म्हणतो त्याचे दृश्यरूप म्हणजे तहसीलदार आहे. विशेषत: ग्रामीण भागात तहसीलदार हा तालुक्यातील प्रशासन व्यवस्थेचा केंद्रबिंदू ठरतो. तहसील कार्यालय पूर्णपणे त्याच्या हाताखाली काम करते. एकप्रकारे जिल्ह्यात जे स्थान जिल्हाधिकार्याचे, तितकेच किंबहुना त्याहून महत्वाचे स्थान तालुक्यात तहसीलदाराचे आहे. हे पद जितके जबाबदारीचे तितकेच अधिकार देणारे आहे. म्हणून कधीकधी या पदावरून बढती घ्यायला देखील अधिकारी नाखूष असतात.

    तहसीलदार

  • 'दार' कुठल्या भाषेतून घेतले आहे? तहसीलदार हा तालुक्याचा प्रथम नागरिक असतो का?
  • तहसील म्हणजे किती गावे किंवा तालुके?
  • तहसील व ब्लॉक एकच असतो का?
  • - तहसीलदार तालुक्याचा प्रथम नागरीक असतो का?
  • महसूल विभागाची प्रशासकीय उतरंड सांगा.
  • तहसीलदाराची नेमणूक कुठल्या कायद्याअंतर्गत केली जाते?
  • तहसीलदाराला तालुका दंडाधिकारी असे का म्हणतात?
  • तहसीलदाराचे पहिले promotion कोणते होते? (SDO)
  • दोन तालुक्यांचा उपविभाग करतात. त्याचे प्रमुख कोण असतात? (SDO)
  • एखाद्याला अटक करायचे अधिकार तहसीलदाराला आहेत का?
  • तहसीलदार पदाचे न्यायिक अधिकार वेगळे करण्याची गरज आहे का?
  • जमिनीशी संबंधित केसेस शून्यावर आणता येतील का?
  • आणेवारी ठरवणे म्हणजे काय?
  • आणेवारीचा काय उपयोग होतो?
  • उत्तर भारतात जमाबंदी वर्षातून तीनदा केली जाते. महाराष्ट्रातील किती वेळा होते?
  • पाहणी करून जमीन मालकीची नोंदणी शेवटची कधी ठरवून दिली? (सेटलमेंट)
  • ब्रिटिश काळात या पदाला जे महत्त्व होते त्याची आता फक्त सावली उरली आहे का?
  • जमिनीचे विभागीकरण (subdivision) व तुकडीकरण (fragmentation) एकच आहे का?
  • जमिनीचे तुकडीकरण होऊ नये म्हणून तुम्ही कोणते उपाय सुचवाल?
  • नायब तहसीलदार

    राज्य शासन प्रत्येक तालुक्यासाठी एक किंवा जास्त नायब तहसीलदारांची नेमणूक करू शकते. हे गट 'ब' मधील पद असले तरी 'राजपत्रित' (gazetted) पद आहे. तहसीलदारांना जे जे अधिकार आहेत व जी काही कर्त्यव्ये पार पाडावी लागतात, जवळपास त्या सर्वच गोष्टी नायब तहसीलदारांना लागू होतात. महसूली कामकाजाबाबत अर्धन्यायिक अधिकारी म्हणूनही नायब तहसीलदार काम करतो. जात व उत्पन्न प्रमाणपत्र देण्याचे कामही तो करतो. अशाप्रकारे सगळ्याच महत्वाच्या जबाबदार्यांची अंमलबजावणी करावी लागते. 'कमी तिथे आम्ही' या पद्धतीने नायब तहसीलदार विविध विभागांच्या गरजा पूर्ण करतो.

  • नायब तहसीलदार नेमणुकीची झोनल पद्धत काय आहे? ती योग्य वाटते का?
  • तलाठी

  • तीन ते चार गावांच्या समूहाला काय म्हणतात? (सज्जा)
  • जे न लिखे लल्लाटी ते लिखे तलाठी, असे का म्हणतात?
  • आणेवारी कशी बनवतात?
  • कामाची परिणाममकारकता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल?
  • कुळवहिवाट काय असते?
  • तुकडीकरण काय असते? त्याला प्रतिबंध घातला आहे का?
  • पीक कापणी प्रयॊग करण्यास मंडळ निरीक्षकांना मदत करणे हे तलाठ्यांचे कार्य आहे का?
  • गाव नमुना ८-अ व ब काय असतात?
  • गावाची सीमा चिन्हे किंवा भूमापन चिन्हे यासंदर्भात तलाठ्याचे कोणते कर्तव्य आहे?
  • तगाई कर्ज काय असतात?
  • फेरफार नोंदवही काय असते? ती बघायचा अधिकार गावकऱ्यांना आहे का?
  • तलाठी दैनंदिनी ठेवतात का? तिच्यात काय लिहिले जाते?
  • खातेफोड काय असते?
  • शिधापत्रिका संदर्भात तलाठ्याचे अधिकार व कर्तव्य कोणती?
  • महाराष्ट्र विकास सेवा

    महाराष्ट्र विकास सेवेची निर्मिती १९७४ मध्ये करण्यात आली. त्यापूर्वी महसूल खातेच विकासाचे कार्यक्रम राबवत असे पण जशी कल्याणकारी राज्याची संकल्पना विस्तारत गेली तशी वेगळया सेवेची गरज निर्माण झाली. सोप्या शब्दात आता महसूल खाते महसूल आणून देते तर विकास सेवा त्याचा विनियोग करून विकासाची उद्दीष्टये साध्य करते. राज्यसेवा परीक्षेद्वारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (Dy CEO) व गटविकास अधिकारी (BDO) या पदांसाठी निवड केली जाते. ही पदे गट ‘अ’ व ‘ब’ प्रकारात मोडतात. ज्यांना लोकांमध्ये मिसळून कल्याणकारी योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे आवडेल त्यांना विकास सेवा चांगले करियर ठरतात.

    उपमुख्य कार्यकारी अधिकारी (DyCEO)

    मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा प्रशासन प्रमुख असतो, तर त्याच्या मदतीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतात. एकाहून अधिक असलेल्या उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांपैकी एक अधिकारी हा परिषदेचा पदसिद्ध सचिव असतो. एक उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हयातील सर्व पंचायत समित्यांवर देखरेख ठेवतो, तर एक उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा महिला व बालकल्याण समितीचा सचिव असतो.

    गटविकास अधिकारी (BDO)

    गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा कार्यकारी प्रमुख असून सर्व कारभारास तो जबाबदार असतो. तो बैठका बोलावतो, त्यांची नोंद ठेवतो पण त्यात मतदानाचा अधिकार मात्र त्याला नसतो. पंचायत समितीचा अर्थसंकल्प तो तयार करतो. पंचायत समितीचे सर्व करार त्याच्या सहीनिशी होतात. पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायतीवर देखरेख आणि नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला आहे. वरील कामे करताना सहाय्यक गटविकास अधिकारी (Asst. BDO)त्याला मदत करतो. एकंदरीतच गटविकास अधिकारी हा विकास प्रशासनातील महत्त्वाचा दुवा ठरतो.

    त्याचा जनता व लोकप्रतिनिधी यांच्याशी थेट संपर्क असतो. सरकारी योजनांना मूर्तरुप देण्याची संधी मिळते. ग्रामीण भागातील लोकांना रोजच्या जीवनात महत्वाच्या असणाऱ्या विभागांना हाताळण्याची संधी उदा. आरोग्य, शिक्षण, जलपुरवठा, बांधकाम, स्वच्छता इत्यादी. तालुक्याचे विकास नेतृत्व BDOच्या हाती असते. हाताखाली सुमारे ५०० लोक काम करतात. पोस्टिंग ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये होते.

    BDO

  • ब्लॉक कसा ठरवला जातो?
  • तो तालुक्याला समकक्ष असतो का?
  • विकास क्षेत्र महसूल क्षेत्राला मॅच होते का?
  • विकासाची व्याख्या कशी कराल?
  • कोणते काम जास्त महत्त्वाचे आहे BDOचे की तहसीलदाराचे?
  • भारतातील विकास प्रशासन महसुली प्रशासनासमोर दुय्यम स्थानी का आहे?
  • तुम्ही BDO असताना जर महिला सभापतींच्या पतीने तुमच्यावर सहीसाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर काय कराल?
  • महिला व बालकांसाठी काही विकास योजना सुचवा.
  • ग्रामसेवक

  • ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यात काय फरक आहे?
  • ग्रामपंचायत निधी कसा येतो? थेट की झिरपत
  • ग्रामपंचायत निवडणुकांचे महत्व का वाढू लागले आहे?
  • PESA कितपत प्रभावी ठरला आहे? त्याची अंमलबजावणी करण्यात भाग घेतला आहे का?
  • तलाठी हे पद रद्द करून ते काम ग्रामसेवकाकडे दिले पाहिजे का?
  • केंद्राचा थेट निधी किती मिळतो?
  • एखादे गाव विकसित झाले की नाही हे कसे ठरवायचे?
  • गावाचा मानव विकास निर्देशांक काढता येईल का?
  • स्मार्ट सिटी आधी उभारल्या पाहिजेत की स्मार्ट व्हिलेज?
  • सरपंच निवडणूक थेट झाली पाहिजे का?
  • तुम्ही काम केलेले गाव तंटामुक्त आहे का?
  • नगरविकास खाते

    नगरविकास खात्यात कार्यकारी पदे जास्त आहेत. वाढत्या नागरीकरणाच्या दृष्टीने येत्या काळात या खात्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे. मुख्याधिकारी गट अ (CO) अ वर्ग ब वर्ग नगरपालिकेचा मुख्याधिकारी म्हणून काम करण्याची जास्त संधी. ग्रेड पे - 5400, प्रमोशन 6-10 वर्षाच्या आत आहे. गट अ मुख्याधिकारी हा मुख्याधिकारी म्हणून किंवा महानगरपालिकेत उपायुक्त म्हणून काम करू शकतो.

    मुख्याधिकारी नगरपालिका / नगरपरिषद गट - ब

    राज्यातील 'क' वर्ग, 'ब' वर्ग आणि 'अ' वर्ग नगर परिषदांतील प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यास 'मुख्याधिकारी' (Chief Officer)असे म्हणतात. हे पद राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेद्वारे भरले जाते. प्रत्येक नगर पालिकेसाठी एक मुख्य अधिकारी असतो. तो आर्थिक शिस्तपालनाची महत्वाची जबाबदारी पार पाडतो. मुख्याधिकारी हा स्थानिक नेतृत्व आणि शासन यामधील प्रशासकीय दुवा असतो. तो त्याच्या कार्यासाठी स्थानिक नेतृत्व, जनता आणि शासनास जबाबदार असतो. नगरातील आवश्यक सेवा व्यवस्थित आणि अद्ययावत आहेत किंवा नाहीत यावर त्याचे नियंत्रण असते. हाताखालील कर्मचाऱ्यांमध्ये कामाचे व्यवस्थित वाटप करून घेणे व नागरिकांना सेवा उपलब्ध करून देणे हे त्याचे कार्य असते. मुख्याधिकारी अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक तयार करून ते स्थायी समितीला सादर करतो. स्थानिक राजकारण, प्रश्न व मर्यादित साधने यांचा कुशलतेने मेळ घालत तो शहराचा गाडा चालवतो. नगरविकास खात्यातर्फे मुख्याधिकारी या पदावर सरळ भरतीही करण्यात येते.

    मंत्रालयीन पदस्थापना

    मंत्रालयीन पदस्थापनेमध्ये मुख्य सचिवांपासून लिपिक संवर्गापर्यंत विविध पातळयावर वेगवेगळया परीक्षांच्या माध्यमातून प्रवेश मिळवता येतो. राज्य लोकसेवा आयोगाकडून (MPSC) सहाय्यक व लिपिक संवर्गासाठी स्वतंत्रपणे परीक्षा घेतल्या जातात. राज्यसेवा परिक्षेच्या माध्यमातून कक्ष अधिकारी (Section Officer) या पदावर निवड होते. कक्ष अधिकारी कार्यासनात येणारे टपाले व फाईल यांची हाताळणी करतो. योग्य गोष्ट योग्य व्यक्तीपर्यंत पोहचवून त्यांच्याकडून प्रतिसाद मिळवून घेणे ही त्याची जबाबदारी असते. काम मुंबईत मंत्रालयात असते.

    सेक्शन ऑफिसर

  • सेक्शनची व्याख्या कशी केली जाते?
  • मागवलेली माहिती संवेदनशील आहे की नाही हे कसे ठरवले जाते?
  • जुन्या नोकरशाही पद्धतीच्या कामकाजाचे अवशेष म्हणजे हे पद आहे असे म्हणता येईल का?
  • मोठ्या प्रमाणावर लोक मंत्रालयात आपले काम घेऊन येतात ही चांगली गोष्ट आहे का?
  • कोणी उडी मारू नये म्हणून जाळी लावणे ही चांगली गोष्ट आहे का?
  • सचिवालय हे नाव बदलून मंत्रालय असे का ठेवले?
  • विकसित देशांमध्ये देखील असे पद असते का?
  • कामाच्या पद्धतीत कोणते बदल करता येतील?
  • तंत्रज्ञानाचा वापर करुन हे काम यांत्रिक पद्धतीने करता येईल का?
  • क्षेत्रीय काम (फिल्डवर्क) दिले पाहिजे का? (८ वर्ष काढल्यावर CO म्हणून फिल्ड पोस्टिंग मिळू शकते)
  • राज्य उत्पादन शुल्क विभाग

    राज्य उत्पादन शुल्क हा राज्यसूचीतील विषय असून राज्य महसूलामध्ये याचा मोठा वाटा असतो. हा विभाग गृहविभागातर्गत देतो. राज्यसेवा परीक्षेद्वारे उपअधीशक, राज्य उत्पादन शुल्क गट ब या पदासाठी निवड करण्यात येते. प्रत्येक जिल्हयासाठी एक राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक, राज्यशासनाकडून नेमण्यात येतो त्याचे प्रमुख काम अनुज्ञन्या (license) देणे हे असते. मदयार्क व अमंली पदार्थाची तस्करी रोखणे त्यासाठी वेगवेळया उद्योग व्यवसायाची तपासणी करणे, अमंली पदार्थ विषयक गुन्हाचा तपास करण्याची जबाबदारी सुद्धा या अधिकारर्‍यावर सोपवण्यात आली आहे. हे पद यांना अधिकार गाजवणे आवडते व जमते त्यांना आवडेल.

    राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक (State Excise Sub Inspector

  • हातभट्टी व देशी दारू यातील फरक?
  • अल्कोहोलची स्ट्रेंथ म्हणजे काय? कशी काढतात?
  • देशी मद्याची क्वालिटी कशी चेक करतात?
  • मद्यात भेसळ होते का?
  • दारूबंदीवर घटनेतील कलम स्पष्ट करा?
  • मग दारूचा प्रसार सरकारी खाते कशाला करते?
  • व्हिस्कीचे प्रकार? देशाच्या नावावरून फेमस प्रकार?
  • वाईन कशापासून बनवतात?
  • वाईन मधील शरीराला चांगला घटक? काय फायदा?
  • Liquor आणि liquoyer मधील फरक?
  • भूमी अभिलेख खाते (Dept of Land Records)

    जमाबंदी व भूमीअभिलेख खाते हे शेतकर्‍यांपासून बिल्डरांपर्यंत सगळयांसाठी सारखेच महत्त्वाचे आहे. प्रत्येकाचा या खात्यांशी संबंध येतो. जमीनीची मोजणी, पोट हिस्से, फेरफार उतारे या बाबतच्या तांत्रिक गोष्टी या खात्याकडून हाताळल्या जातात. राज्यसेवा परिक्षेतून तालुका निरिक्षक भूमिअभिलेख गट ‘ब’ या पदांसाठी निवड होते. काम बरेच फिरतीचे असते. ग्राम निरीक्षण व तालुका निरीक्षणाचा वर्षांतील एकूण 150 दिवसांचा दौरा पूर्ण करून भूमापन व अभिलेखाचे काम अचूकपणे होते की नाही याची खात्री तालुका निरिक्षकाला करून दयावी लागते.

    विक्रीकर विभाग (VAT)

    विक्रीकर (आता VAT) हा राज्यशासनाच्या महसूलातील सर्वात जास्त वाटा असणारा कर महसूल आहे. (एकूण महसुलापैकी ६० ते ६५%) विक्रीकर विभाग हा अर्थमंत्रालयाच्या अधिनस्थ कार्यरत आहे.

    राज्यसेवा परिक्षेतून सहाय्यक विक्रिकर आयुक्त (ACST) हे पद प्राप्त होते. प्रमुख कामे पुढीलप्रमाणे असतात. व्यापार्‍यांच्या व्हॅटची निर्धारणा करणे, व्यापार्‍यांनी दर महिन्यास विवरण पत्रके भरावी यासाठी पाठपुरावा करणे, थकबाकीची वसुली करून घेणे. थकबाकी न भरल्यास मालमत्तेचा लिलाव करणे इत्यादी.

    विक्रिकराचे रूपांतर VAT मध्ये झाल्यावर आता खात्याचे पूर्ण संगणकीकरण झाले आहे. त्यामुळे काम सोपे झाले असले तरी उलाढाल वाढली आहे. आता VAT मधून वस्तू व सेवा कराकडे (GST) स्थित्यतर होण्यास सुरवात झाली आहे. विक्रिकर कार्यालय हे फक्त जिल्हयाच्या ठिकाणीच असते. सर्वात जास्त कर संकलन मुंबईतून होत असल्याने जास्तीत जास्त नेमणुका या मुंबईतच होतात. त्यामुळे ज्यांना शहरी जीवनात काम करायला आवडते त्यांच्यासाठी ही सेवा चांगली आहे. दुसरीकडे सरकार करसंकलनाची लक्ष्ये ठरवून देते. ती गाठण्यासाठी दबाव असतो. तो सहन करावा लागतो.

    खाजगी कार्यालयात असते तसे १० ते ६ कामकाज चालते. जनतेशी व लोकप्रतिनिधींशी थेट संपर्क नसतो. फक्त ३ ते ५ कर्मचारी हाताखाली असतात.

    कामगार आयुक्त

  • कामगार कायदे कोणाला लागू होतात?
  • गिग अर्थव्यवस्थेला ते लागू होतात का?
  • IT क्षेत्राला ते लागू होतात का?
  • औपचारिक (formal) व अनौपचारिक (informal) क्षेत्र यांच्यात काय फरक असतो?
  • संघटीत कामगार व असंघटीत कामगार यात काय फरक असतो?
  • working class व labour class यात फरक असतो का?
  • कामगार चळवळ भारतात क्षीण झाली आहे का?
  • भारतातली सर्वात जुनी कामगार संघटना कोणती?
  • सध्या देशातील सर्वात मोठी कामगार युनियन कोणती?
  • तुम्ही अधिकारी झाल्यावर युनियन स्थापन कराल का?
  • अधिकृत युनियन कोणाला म्हणतात?
  • सामूहिक वाटाघाटी (collective bargaining) काय असते?
  • महिला कामगारांना रात्रपाळी देण्यावर बंदी आणली पाहिजे का?
  • किमान वेतन कायदा कोणाला लागू होतो?
  • डॉ आंबेडकर यांचे कामगार मंत्री म्हणून कोणते योगदान होते?
  • कामगार कायद्यात सध्या कोणते बदल प्रस्तावित आहेत? (८ तासांची मर्यादा १२ तासांवर, तीन दिवस सुट्टी, रजेचे अधिकार कंपनीकडे)
  • कामगार कायद्यातील बदल पारित का होत नाही आहेत?
  • मेस्मा काय आहे? तो आवश्यक आहे का?
  • पितृत्वाची रजा दिली जाते का?
  • एखादा कर्मचारी ३६५ दिवस काम करतो. काय कारण असू शकेल?