महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) कृषी सेवा मुलाखत परीक्षेसाठी अभिरूप प्रश्नावली
बळीराजाचे जग
घरची शेती असेल तर सखोल माहिती घ्यायला हवी. मी त्यात लक्ष घालत नाही व त्यामुळे मला फारशी माहिती नाही हे समर्थन लंगडे आहे. तुम्ही शेतकरी समाजातून आला आहात हा एक मोठा प्लस पॉईंट ठरू शकतो. पण आपण शेतकऱ्यांच्या भावनांशी एकरूप झालो आहोत हे दाखवून देता आले पाहिजे. शेती व ग्रामीण पार्श्वभूमीतून प्रशासनात येणे हे एक सामर्थ्यस्थळ आहे, मर्मस्थान नव्हे. अशा उमेदवारांकडे समस्यांकडे बघण्याचा जास्त वास्तववादी दृष्टिकोन असू शकतो.
संगती
उमेदवाराच्या उत्तरात संगती असणे अपेक्षित आहे. मी आदिवासींमध्ये जाऊन शाश्वत शेतीचा प्रसार करतो असे सांगून मग आमच्या घरच्या शेतीत आम्ही ऊस घेतो हे असंगतीचे उदाहरण आहे.
शेतीव्यवसायाला बाजार खुले झाले पाहिजे असे म्हणून नंतर देशांतर्गत महागाई आटोक्यात आणण्यासाठी शेतमालाच्या निर्यातीवर बंधने आणली पाहिजेत असे म्हणणे ही विसंगती ठरेल.
शेतीतून पुरेसा नफा मिळाला पाहिजे असे म्हणतानाच शेती उत्पन्नावर कर लावण्यास सहमती दर्शवावी लागेल.
कृषिसंस्कृती?
भारत हा शेतीप्रधान देश आहे की भारतीयांचा मुख्य व्यवसाय शेती आहे की भारतीय समाज कृषक समाज आहे?
शेती हा व्यवसाय आहे की संस्कृती?
शेती फक्त उपजीविकेचे साधन न ठेवता त्याचे व्यवसायात रूपांतर कसे करता येईल?
शेतीला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे का? एकदा दिला होता हे तुम्हाला माहिती आहे का?
शेतकऱ्यांसाठी निवृत्तीचे वय निश्चित केले पाहिजे का?
भारतात शेतीमध्ये वाढावा आहे का? (Surplus)
भारतात शेतीच्या वाढीचा दर किती आहे? महाराष्ट्रात?
जर शेतीतील उत्पादन वाढत आहे तर शेतीमध्ये वाढ का होत नाही?
शेतीचा GDP व शेतीचा GVA यात तफावत का पडते आहे?
वावर हीच पॉवर
शेतीला अनुदानांची गरज आहे का? शेती स्वबळावर टिकू शकत नाही का?
भारतात आपण कंपन्यांकडून शेती (कॉर्पोरेट फार्मिंग) करायला परवानगी दयायला हवी का?
भारतीय शेतीचे खाजगीकरण करायची गरज आहे का?
भारताचे कोणते शेतकरी देशाचे पंतप्रधान झाले?
राज्यात कोणी शेतकरी मुख्यमंत्री झाले का?
अर्थसंकल्पातून देशाच्या जीडीपीच्या किती टक्के खर्च शेती क्षेत्रासाठी केला जातो?
राज्याच्या अर्थसंकल्पातून किती टक्के खर्च केला जातो?
शेतीसाठी अर्थसंकल्पात कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत?
शेतीचा वेगळा अर्थसंकल्प मांडण्याची गरज आहे का?
जर आपण आर्थिक वर्ष एक जानेवारीपासून सुरू केले तर त्याचा कृषी क्षेत्रावर काय परिणाम होईल?
कराराची शेती व शेतजमीन भाडेपट्टयाने देणे (लँड लिजिंग) यात काय फरक आहे?
गटशेती काय असते?
शेतीचे यांत्रिकीकरण करायची गरज आहे का? त्यामुळे बेरोजगारी वाढेल का?
उदारीकरणाचा शेती व्यवसायाला फायदा झाला आहे की तोटा?
महिला व शेती
भारतीय शेतीचे महिलाकरण का झाले आहे?
किती टक्के शेती संबंधित कार्ये महिला करतात?
महिला शेतकऱ्यांसाठी सरकार कोणत्या योजना राबवते?
कृषी ताई कल्पना काय आहे?
महिलांच्या नावावर किती टक्के शेतजमीन आहे?
महिलांच्या नावावर शेतजमीन करण्यासाठी काय उपाय करता येतील?
यांत्रिकरणाचा महिला शेतकर्याना फायदा होईल का?
लखपती दीदी योजना काय आहे?
२०२६ हे वर्ष कोणते आंतरराष्ट्रीय वर्ष घोषित झाले आहे?
VB RAMJI
मनरेगा व रामजी मध्ये कोणता फरक आहे? कोणती योजना जास्त प्रभावी होती?
हमी अजूनही आहे का? की आता फक्त खात्री (assurance) आहे?
काम करण्याचा अधिकार आता रद्द झाला आहे असे म्हणता येईल का?
आधी कायदा होता, आता योजना आहे, त्यामुळे कोणता फरक पडतो?
जर राज्यांनी त्यांचा ४०% वाटा द्यायला नकार दिला तर काय होईल?
स्थानिक स्वराज्य संस्था आता दुय्यम ठरतील का?
नवीन योजना ग्रामीण भागात अस्थिरता आणेल असे तुम्हाला वाटते का?
शेतीवर काय परिणाम होईल?
ग्रामीण कामगारांची रोजंदारीसाठी वाटाघाटी करण्याची क्षमता क्षीण होईल असे तुम्हाला वाटते का?
नवीन योजनेत कामाचे तास ८ वरून १२ पर्यंत वाढवता येतील. त्याचा काय परिणाम होईल?
स्थलांतरात वाढ होईल का?
किमान वेतन व उचित वेतन यात काय फरक आहे?
राहणी वेतन (living wages) काय असते?
वास्तविक वेतन (real wages) काय असते?
मनरेगामुळे शेतमजुरांची रोजंदारी वाढली व त्याचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे का?
पीक हंगामात रामजी योजना ६० दिवस बंद ठेवली जाणार आहे, त्याचे कोणते परिणाम होतील?
शेजाऱ्याच्या दृष्टीकोनातून रामजी व शेतमजुरांच्या दृष्टीकोनातून रामजी विश्लेषण करा.
महाराष्ट्राने आपली रोजगार हमी योजना (रोहयो) चालू ठेवावी का?
रोहयोला वित्त पुरवठा कसा केला जातो?
घर की फसल
शेती उत्पन्न कसे मोजतात?
तुम्ही कोणते सूत्र वापरले आहे?
तुमचे कुटुंब बीपीएलच्या व्याख्येत येते का?
बीपीएल कुटुंब कसे ठरवतात?
दारिद्र्यरेषा कशी ठरवतात?
तुमच्याकडे कोणते रेशनकार्ड आहे?
तुमच्याकडे किसान क्रेडिट कार्ड आहे का?
तुम्ही कोणती पिके घेता?
तुम्ही तुमच्या मालाची विक्री कशी करता?
तुम्ही किसान टीव्ही बघता का?
ऍग्रो वन कधी वाचता का?
‘बीज ते पीक’ या प्रवासात कोणते सामाजिक-आर्थिक अडथळे असतात?
ते कसे दूर करायचे?
गोवंश
गोवंशाची पाहणी किती वर्षांनी केली जाते? (१०)
गोवंशाची संख्या महाराष्ट्रात वाढते आहे का?
गोवंश हत्या बंदीच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे की तोटा?
पाळीव जनावरे अभियान (Livestock Mission)
आपण गायी भारतात आयात का करतो?
आपण भारतीय जनावरांचा परदेशी जनावरांशी संयोग घडवून आणला पाहिजे का? (Cross breeding)
त्यासाठी कोणते वळू उत्तम ठरतील?
महाराष्ट्रातील कोणते वळू शेती साठी उत्तम आहेत?
फुले त्रिवेणी हा कोणत्या गायीचा संकर आहे? ती यशस्वी आहे का?
की देशी गायीचा संकर करण्यास प्राधान्य दिले पाहिजे?
थंडीमध्ये दूध उत्पादन का कमी होते?
कोल्हापूर राज्यातील सर्वात मोठा दुग्धोत्पादक जिल्हा कसा बनला?
वारणा, गोकूळ – अमूलशी तुलना करा. कोण पुढे आहे?
कृषी कर्म
राष्ट्रीय कृषिदिन कधीअसतो?
तो कोणाचा जन्मदिवस? त्यांचे योगदान सांगा.
जागतिक अन्न दिन कधी असतो? (१६ ऑक्टोबर)
त्या दिवशी कोणत्या संस्थेची स्थापना झाली? (FAO)
एखादा शेतकरी शेतात नाविन्यपूर्ण गोष्टी करत असेल तर त्याला आपण स्टार्टअप म्हणू शकतो का?
शेतीतील निर्णय प्रक्रिया सुधारण्यासाठी एखादे ॲप तुम्ही सुचवू शकाल का? (उदाहरणार्थ देहात)
शेतीमध्ये GPS चा वापर कशाप्रकारे करून घेता येईल?
शेती व्यवसायातील मागचे – पुढचे दुवे कोणते? (Backward and forward linkages)
MSP
कृषी मूल्य आयोगाच्या (CACP) संरचनेत सुधारणा करण्याची गरज आहे का?
शेतमालाचा व्यय (cost) ठरवताना कोणत्या घटकांन महत्त्व दिले पाहिजे?
प्रत्येक राज्यासाठी वेगळा MSP घोषित केला पाहिजे का?
A2 + FL की C2 हा वाद काय आहे? तुमच्या मते कोणती किंमत दिली पाहिजे?
५०% नफा जास्त होत नाही का?
महाराष्ट्रातील शेतकर्याना MSP मिळतो का? का मिळत नाही?
महाराष्ट्रात ३०० कृषी उत्पन्न बाजार समित्या (APMC) असूनही MSP का मिळत नाही?
खाजगी APMC स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे का?
APMC मध्ये शेतकर्याना मताधिकार आहे का?
असेल तर APMC मध्ये मध्यस्थांचे वर्चस्व कसे?
APMC मधील निवडणूक किती कालावधीने होतात? त्या कोण घेते?
मतदान कोणत्या प्रकारे केले जाते? EVM चा वापर केला जातो का?
APMC ची मक्तेदारी अजून आहे का?
सध्या फक्त ६% शेतकरी MSP चा फायदा घेतात. MSP रद्द केला जावा का?
MSPला कायदेशीर दर्जा दिला जावा का? सरकार त्यासाठी का तयार नाही?
कराराच्या शेतीला तुमचा पाठिंबा आहे का? ही मागच्या दाराने जमीनदारी आहे का?
कराराची शेती चांगली की लँड लिझिंगचे करार चांगले?
सर्वच पिकांना FRP का मिळत नाही? आपण MSP बंद करून सर्व पिकांना FRP आणला पाहिजे का?
विमा योजना
विमा योजनेचा ‘बीड पॅटर्न’ काय आहे?
Cup & Cap model काय आहे?
कंपनीला यात किती नफा मिळू शकतो?
हा पॅटर्न राज्यभर का राबवला जात नाही?
नमो पीक विमा योजना काय आहे?
यात शेतकऱ्यांना किती प्रिमियम भरावा लागतो? (एक रुपया)
विमा योजना लागू असून देखील राज्य सरकारला नुकसान भरपाई देण्याची वेळ का आली आहे?
राज्य सरकारने स्वतःची विमा कंपनी स्थापन करावी का?
खाजगी विमा कंपन्यांबद्दल कोणते आक्षेप आहेत?
नुकसानीचे सर्वेक्षण वेळेत करण्यासाठी कोणते उपाय योजता येतील?
विमा योजना घेतलेल्या शेतकऱ्यानाच पीक कर्ज दिले जावे का?
अतिवृष्टी अशी काही संज्ञा आहे का?
प्राण्यांनी नुकसान केले तर विमा योजनेतून भरपाई मिळते का?
तुमचे पीक फसल बीमा योजनेखाली आले आहे का?
फसल बीमा योजना यशस्वी आहे का? पीक नुकसानीचे संश्लेषण कोणत्या पद्धतीने केले जाते?
crop cutting experiment काय आहे?
जर जनावरांनी पिकांना नुकसान पोहोचवले तर फसल बिमातून संरक्षण मिळते का?
दुष्काळ
अवर्षण व दुष्काळ यात कोणता फरक असतो?
अवर्षणाचे रूपांतर कायमच दुष्काळात होते का?
ओला दुष्काळ व सुका दुष्काळ यात काय फरक असतो?
दुष्काळ सदृश्य स्थिती काय असते?
आधी अवर्षण जाहीर केले जाते की दुष्काळ?
दुष्काळाची घोषणा झाल्यावर कोणत्या उपाययोजना केल्या जातात?
दुष्काळी प्रदेश काय असतात? राज्यात कोणते प्रदेश दुष्काळी प्रदेश आहेत?
कर्जमाफी
सातबारा कोरा करणे म्हणजे काय?
शेतीला कर्जमाफी दिली पाहिजे का?
त्याची उद्योगांना दिलेल्या कर्जमाफीशी तुलना करा.
कर्जमाफी दिल्याचे फायदे व तोटे सांगा.
मागे दिलेल्या कर्जमाफीचा फायदा झाला का?
शेती जर व्यवसाय असेल तर नुकसान सरकारने का भरून द्यावे?
कर्जमुक्ती केली पाहिजे की कर्जमाफी? फरक काय?
कर्जमाफी ऐवजी तेच पैसे शेतीमध्ये गुंतवणूक म्हणून वापरावे का?
कर्जमाफीचे निकष काय असावे? सावकाराकडून ज्यांनी कर्ज घेतले आहे त्यांना देखील कर्जमाफीचा फायदा द्यावा का?
कर्जमाफीचा फायदा शेतकर्यांपेक्षा सरकारी बँकांना होतो हा आरोप खरा आहे का?
PM किसान
शेतकऱ्यांना अनुदाने दिली पाहिजेत की उत्पन्नाला आधार (income support) दिला पाहिजे?
ही उत्पन्न आधार योजना आहे की निर्वाह योजना (subsistence) आहे?
नमो किसान सन्मान योजना या कुबड्या आहेत का?
हा पैशातून केलेला खर्च शेतीवर केलेला खर्च मानता येईल का?
शेतमजुरांना या योजनेचा फायदा मिळतो का?
शेतकरी आत्महत्या
महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यांची राजधानी म्हणून का ओळखला जातो?
विदर्भ व विशेषतः यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या होण्याचे कारण काय?
गुजरातमध्ये देखील कापूस हे प्रमुख पीक आहे, पण तिथे मोठ्या प्रमाणात आत्महत्या नाहीत. असे का?
सोयाबीन हा कापसाला पर्याय आहे का?
विदर्भात शेतजमिनीचा छोटा आकार हे संकटाचे कारण आहे का?
कोकण विभागात सर्वात कमी आत्महत्या का?
पीक पद्धती (cropping pattern)
रब्बी हंगामातील पिके कोणती? खरीप मधील कोणती? दोन्ही हंगामात येणारी पिके कोणती?
आंतर पिके कोणती असतात?
कृषी हवामान क्षेत्र (agro-climatic zones) काय असतात?
भारतात किती आहेत?
भारतात आपली पीक पद्धती त्यानुसार आहे का?
महाराष्ट्रात किती क्षेत्रे आहेत?
शेतीतून होणारी जलनिर्यात काय असते?
भारतीय शेती जलवापर करण्यात तत्पर (efficient) का नाही?
‘विकेल ते पिकेल’ ही घोषणा योग्य आहे का?
देशातील 60% पेक्षा जास्त पाणी तांदूळ आणि ऊस अशा दोनच पिकांनी कसे काय पळवले आहे?
ही स्थिती बदलण्यासाठी कोणत्या जलसुधारणा तुम्ही सुचवाल?
‘प्रत्येक थेंबा मागे जास्त पीक’ (more crop, per drop) कसे साध्य करायचे?
रिले पीकपद्धती काय असते?
SRI पीक पद्धती काय असते? ट्रान्सजेनिक पिके कोणती असतात?
ती वापरण्याचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम कोणते?
जलवायू परिवर्तनाला तोंड देण्यासाठी कोणती नवी पिके घेता येतील? (ओट्स)
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रोपवाटीका योजना काय आहे?
सरकारी धोरणे
भारतातील कृषी क्षेत्राला बरकत आणण्यासाठी सात कलमी कार्यक्रम कोणता?
आजवर सरकारने कृषी धोरण एकदाच का काढले?
2018चे शेती निर्यात धोरण काय होते? जागतिक शेतीत निर्यातीत भारताचा सहभाग फक्त 2% आहे. असे का?
शेतीला राज्य सूचीतून काढून समवर्ती सूचित टाकण्याची गरज आहे का?
भारत आणि चीनमधील शेतीविषयक प्रक्रियांमध्ये काय फरक आहे?
कृषी विज्ञान केंद्र (KVK) त्यांना दिलेले उद्दिष्ट पूर्ण करत आहेत का?
महाराष्ट्र सरकारने मागेल त्याला घोषणा केली आहे – शेततळे, शेडनेट हाऊस, ठिबक सिंचन, विहीर
या योजनेचा फायदा होतो आहे का?
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना काय आहे?
गावात शेती-उपकरणे बँक (Agro-equipment Bank) काढली पाहिजे का?
अन्नप्रक्रिया पंचायतराज साठी निर्धारित केलेल्या 29 विषयांपैकी एक विषय आहे का?
सरकारी धोरणे गवती पिके (cereals) विशेषत: तांदूळ व गहू यांच्या बाजूने झुकली आहेत असे तुम्हाला वाटते का? गवती पिकांकडून भरड धान्ये, फळे भाजीपाला, प्राणीसंगोपन आणि मच्छी उत्पादन याकडे कसे वळवता येईल?
बाजार सुधारणा
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे खरोखर शक्य आहे का?
त्यासाठी बाजार माहिती उपलब्धता (market intelligence) कशी मदत करू शकेल?
बाजार व्यवस्थेत गरजेपेक्षा जास्त मध्यस्थ आहेत का? ते कसे कमी करता येतील?
बाजार सुधारणेचे ‘कर्नाटक प्रारूप’ काय आहे?
eNAM काय आहे? त्याचा काय फायदा होईल?
कांद्याच्या किमती वर्षभर स्थिर कशा ठेवता येतील?
TOPS योजना कशी काम करते?
शेतकरी थेट शहरात येऊन आपला माल का विकत नाही?
संत सावता माळी आठवडी बाजार योजना काय आहे? ती यशस्वी आहे का?
शेती उत्पादनांचा ‘वस्तू बाजार’ (commodity market) कसे काम करतो?
शेतकर्याना वस्तू बाजारात भाग घेण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे का?
‘उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाला किंमत’ ही मागणी तुम्हाला पटते का?
अन्नधान्य व भाजीपाला यांच्या बाजारातील किमती कमी होत गेल्या पाहिजेत की वाढत गेल्या पाहिजेत?
फलोत्पादनाने (horticulture) अन्नधान्याच्या शेतीला MSP नसताना देखील कसे मागे टाकले?
इस्राएलची शेती ही आपल्याकडील कोरडवाहू क्षेत्रासाठी आदर्श असू शकते का?
अर्थव्यवस्थेचा कृषी क्षेत्र हा पाया ठेवून आपण विकसित देश बनू शकतो का?
क्रांती
नील, हरित, पीत, सुवर्ण, रजक, कृष्ण, गुलाबी, लाल, गोल क्रांत्या
इंद्रधनुष्यी क्रांती (Rainbow Revolution) काय असते?
सदाहरित क्रांती (Evergreen Revolution) काय असते?
न्यूट्री सिरीयल काय असतात? त्यांचे आंतरराष्ट्रीय वर्ष कोणते होते?
सहकार
सहकार से समृद्धी कार्यक्रम काय आहे?
जगातील सर्वात सहकारी संस्था कोणती? (IFFCO)
अमूल जसा संपूर्ण गुजरातचा एकच दूध ब्रँड आहे तसे महाराष्ट्रात महानंदचे का झाले नाही?
महानंदचे खाजगीकरण करण्याचा निर्णय योग्य आहे का?
महाराष्ट्रातील दूध सहकारी संस्था अमूलसारख्या देशव्यापी का बनू शकल्या नाही?
पश्चिम महाराष्ट्र सोडला तर राज्यातील इतर भागात सहकाराला पुरेसे यश का मिळू शकले नाही?
सहकार पद्धती ही कंपनी पद्धती पेक्षा कशी वेगळी आहे?
सहकारी संस्थांना नफा कमावण्याची परवानगी आहे का?
सहकारी संस्था लाभांशाचे वाटप करू शकतात का?
सहकार समाजवादी विचारसरणीशी जोडले गेले आहे का?
सहकारी सामूहिक शेती लोकप्रिय का झालेली नाही?
सहकार स्वाहाकार झाला आहे हे मत तुम्हाला मान्य आहे का?
नुकतेच कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष होते?
शेती व सहकार यांचे काय नाते आहे?
विकसित देशात सहकार संस्था यशस्वी आहेत का?
सहकार राज्याचा विषय असताना केंद्राने सहकार खाते का काढले आहे? त्याचा शेतीला फायदा होईल का?
सहकारात सरकारची भूमिका अव्वल हवी की दुय्यम?
प्राथमिक सहकारी पत सोसायटी (PACS) पुनरुज्जीवित केल्यास काय फायदा होईल?
FPO
FPO ची व्यूहरचना कशी आहे?
FPO हे Small Farmers Agriculture Consortium (SFAC) पेक्षा कशा प्रकारे वेगळे आहेत?
FPO प्रारूपाने मध्यस्थाची मक्तेदारी तोडण्यासाठी मदत होऊ शकते का?
FPO मुळे उत्पन्नाची हमी शेतकऱ्याला मिळू शकते का?
भारतात FPO एखाद्या क्रांतीसारखे का पसरत नाही?
भारतात खूप जास्त FPO कंपनी ऍक्टच्या सेक्शन 8 खाली होत आहेत. त्यामानाने सोसायटी नोंदणी कायद्याने बनणारे FPO कमी आहेत. त्याचे कारण काय?
FPO स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे की FPC?
शेतकऱ्यांच्या कंपन्या उभ्या केल्या तर त्याचा शेतीला फायदा होईल की तोटा?
महाराष्ट्रातील सर्वात यशस्वी संस्था सह्याद्री फार्म्स काय आहे? (FPC)
महाराष्ट्राने किती FPO स्थापन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे?
What is homestead farming?
What is agripreneurship?
गटशेती
गटशेतीमध्ये वाढ होण्याची कारणे कोणती?
गटशेतीचे फायदे व तोटे कोणते?
गटशेतीला SHG बरोबर जोडले तर फायदा होईल का?
अन्नसुरक्षा
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाचे उद्दिष्ट कोणते आहे?
फूड फोर्टीफिकेशन कार्यक्रम काय आहे? त्याचा काय फायदा होतो?
राज्य अन्न आयोग काय असतो?
राज्यातील कोणता जिल्हा सर्वाधिक धान्य उत्पादक आहे? (अहिल्यानगर)
हरितक्रांती ही सुख व दुःख (pain & gain) दोन्ही होती. स्पष्ट करा.
एम एस स्वामिनाथन यांनी कोणते योगदान दिले?
दुसरी हरितक्रांती शेताबाहेर होईल असे म्हटले जाते. तुम्ही त्याच्याशी सहमत आहात का?
अन्न सुरक्षा हे राष्ट्रीय सुरक्षेचे अंग आहे हे तुम्हाला मान्य आहे का?
अन्न सुरक्षा महत्वाची की पोषण सुरक्षा? कोणती जास्त महत्वाची आहे?
जर सुमारे ४० कोटी लोक गरीब आहेत तर आपण गरीब कल्याण योजना ८१ कोटी लोकांसाठी का राबवत आहोत?
इतक्या लोकांना फुकट अन्न वाटूनदेखील देशातील भुकेचा प्रश्न का सुटलेला नाही?
छुपी भूक (hidden hunger) काय असते? त्यावर काय उपाय करता येतील?
अन्नप्रक्रिया
मूल्य साखळी व पुरवठा साखळी काय असते?मूल्य साखळी मधील घटक कोणते? अन्न प्रक्रिया क्षेत्राला अग्रक्रम क्षेत्र घोषित केले आहे का?पंचायत संस्थांना जे २९ विषय दिले आहेत त्यात अन्न प्रक्रिया आहे का?अन्न प्रक्रिया क्षेत्रात किती थेट परकीय गुंतवणूक (FDI)ला परवानगी आहे?सध्या भारतातील किती कृषी उत्पादनांवर प्रक्रिया होते?भारतातील किती टक्के धान्य व भाजीपाला खराब होऊन वाया जातो?अन्न प्रक्रिया उद्योग भांडवल सघन आहेत का? की कामगार सघन आहेत?लिज्जत पापड हे अन्न प्रक्रिया उद्योगाचे उदाहरण आहे का?राज्यात फूड टेस्टिंग लॅब किती आहेत?
संपदा योजना काय आहे? राज्यात मेगा फूड पार्क आहेत का?
त्यांचे काम कुठवर आले आहे?
ही कल्पना कधी भरारी का घेऊ शकली नाही?
मेड इन भारत ही कल्पना काय आहे?
तुम्ही जर कृषी सचिव असाल तर सुला वाईनला कसे प्रोत्साहन द्याल?
वाईन उत्पादन कोणत्या मंत्रालयाखाली येते?
शेतीतील कडब्याचा वापर कसा केला पाहिजे? भाताची value chain कशी आहे?
प्रोसेसिंग असतं का भातामध्ये?कांद्याची महाबँक प्रकल्प काय आहे?
शेतमालाची निर्यात आपण शेतमालाची निर्यात करू लागलो तर देशाची अन्नसुरक्षा धोक्यात येणार नाही का?किमान निर्यात किंमत (MEP) काय असते? निर्यातीला ती प्रोत्साहन ठरते की अडथळा?ड्राय पोर्ट काय असते? त्याचा शेतमालाच्या निर्यातीला कसा फायदा होईल?महाराष्ट्रात ड्राय पोर्ट प्रकल्प कुठे आहेत?किसान रेल्वे महाराष्ट्रातून जाते का? कुठल्या मार्गावर?किसान एअर सुरु झाली आहे का?विकसित देशांना शेतमालाची निर्यात करण्यात कोणते अडथळे आहेत?भारताने WTO मधून बाहेर पडावे का?मुक्त व्यापार करारांचा (FTA) शेतीला फायदा होतो की तोटा?
वावर की विवर
महाराष्ट्र हे प्रगतीपर राज्य असूनही शेती उत्पादनात स्वयंपूर्ण का नाही?
ICRISAT, हैदराबाद ही संस्था काय काम करते?
तिच्या संशोधनाचा उत्पादकता वाढवण्यासाठी कसा फायदा करून घेता येईल?
महाराष्ट्रात किती कृषी विज्ञान केंद्रे (KVK) आहेत? त्यांचा शेतीला फायदा झाला आहे का?
भूमीहीन शेतमजूर व सीमांत शेतकरी यांच्या समस्या कशा सोडवता येतील?
कृषी आंदोलनातील शेतकऱयांच्या १२ मागण्या कोणत्या आहेत?
बीटी
बीटी कापूस काय असतो?
त्याने कापूस पेरणीतील किती क्षेत्र व्यापले आहे?
भारतीय कापसाची उत्पादकता कमी का आहे?
बाजारामध्ये व्यापारी बीटी हायब्रीडची बजबजपुरी का माजली आहे?
कापूस बियाणे निर्मितीतून सरकारी बियाणे कंपन्यानी माघार का घेतली?
बीज महामंडळ कोणते काम करते?
बीटी कापसाची रॉयल्टी संदर्भात वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. याबद्दल तुम्हाला काही माहित आहे का?
परदेशात बीटीच्या प्रगत आवृत्या उपलब्ध आहेत. मग आपल्याकडे का नाहीत?
अग्रक्रम कशाला दिले पाहिजे. नाविन्यतेला की किफायतशीरपणाला?
हायब्रीड बियाणे उत्पादनात कोणते टप्पे असतात?
हायब्रीड व सायब्रीड यात काय फरक असतो?
GM पिके
GM पिकांचा कोणता फायदा होऊ शकतो?तुमचा GM पिकांना पाठिंबा आहे का? आपण GM पीकांवर संशोधन चालू ठेवले पाहिजे का?
तुम्ही तुमच्या मुलांना GM पीकांनी बनलेले अन्न खायला द्याल का?
भारतात आपण GM पीकांबद्दल ताठर भूमिका का घेतली आहे?
अमेरिकेने स्वीकारले आहे पण ब्रिटनने नाही. असे का?
जीएम बियाणे व हायब्रीड बियाणे यात कोणता फरक असतो?
हायब्रीड व सायब्रीड (cybreed) यात काय फरक असतो?
GM चांगले की जीन एडिटिंग केलेले पीक चांगले?
भारतात GM पीके स्वीकारण्यात आपण मंद गतीने वाटचाल करत आहोत का?
आपण GM अन्नाची आयात करतो का?
देशांतर्गत संशोधन व उत्पादन करण्याऐवजी आपण त्यांची पैसे देऊन आयात करतो आहोत. हे चांगले आहे का?
GM पिकांसंदर्भात जी राष्ट्रीय समिती आहे तिने कोणत्या पिकांना मान्यता दिली आहे?
GM वांगी आरोग्याला अपायकारक असतात का?
GM तीळ फायद्याचे ठरले आहे का?
हवामान
Climate आणि weather यांच्यात काय फरक असतो?
Climate change होतो आहे याचा पुरावा काय?
तुमच्या भागातील उदाहरणे देता येतील का?
मेघदूत अँप तुम्ही वापरून बघितले आहे का?
हवामान विभागापेक्षा स्कायमेटचे अंदाज अचूक असतात का?
प्रत्येक गावात हवामान केंद्र काढले पाहिजे का?
जर हवामान खात्याचे अंदाज चुकल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले तर त्याची भरपाई दिली पाहिजे का?
जंगले ही नद्यांची आई आहेत असे का म्हणतात?
हवामान खात्यानुसार (IMD) अवर्षणाचे निकष कोणते? त्यात नुकतेच कोणते बदल करण्यात आले?
कृषी अवर्षण व जल अवर्षण (Hydrological drought) यात काय फरक असतो?
अवर्षणातून बाहेर पडण्यासाठी अल्पकालीन, मध्यमकालीन व दीर्घकालीन उपाय योजना सुचवा.
शुन्य दिवस (zero day) काय असतो?
अवकाळी काय असते?
जोराचा पाऊस व ढगफुटी यात काय फरक असतो?
IMD त्याची वेगळी व्याख्या करते का?
सिंचन
सूक्ष्म सिंचन अभियान (micro irrigation mission) काय आहे?
जलव्यवस्थापन तंत्रे उदा. गोकुळ, वनराई बंधारे, शिरपूर पॅटर्न, शेततळी, जलयुक्त शिवार योजना. राजस्थानातील जोहड किंवा आपल्याकडील शिवकालीन पाणी साठवण योजना.
सिंचनाच्या पारंपरिक पद्धती चांगल्या की आधुनिक?
मालगुजारी तलाव काय आहेत? मालगुजारी तलाव हे नैसर्गिक आहेत की कृत्रिम? त्यांचे पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे का? कोणत्या समाजाने हे सर्व तलाव बांधले? त्यांना कोणी आणून वसवले? कोणता समाज हे तलाव सांभाळतो? मालगुजारी तलावांसाठी किंमतकर समितीच्या शिफारसी काय आहेत?
पाण्याची नासाडी टाळण्यासाठी आपण पाण्याला खाजगी वस्तू घोषित केले पाहिजे का?
सध्या राज्यसूचीत असलेले जल, समवर्ती सूचीत समाविष्ट केले पाहिजे का?
प्रतिव्यक्ती किती पाणी उपलब्ध असले पाहिजे?
भारतात व महाराष्ट्रात ग्रामीण व शहरी भागात प्रतिदिनी प्रतिव्यक्ती किती पाणी उपलब्ध आहे?
जल संवर्धन प्रकल्पात नेतृत्व कोणाकडे असले पाहिजे – सरकार, बिगरसरकारी संघटना की ग्रामीण समुदाय?
जल वितरणासाठी आपण उद्योगांना अग्रक्रम दिला पाहिजे की शेतीला?
कोल्हापूर बंधारे कशापासून बनवले जातात? (लाकूड व लोखंड)
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ कार्यक्रम काय आहे?
त्याच्या अंमलबजावणीत कोणत्या अडचणी आहेत?
कालव्यातून होणारे बाष्पीभवन रोखण्यासाठी काय करता येईल?
महाराष्ट्रातील किती टक्के जमीन शेतीखाली आहे? (५४%)
सिंचनाखाली किती आहे?
राज्यातला सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प (विष्णुपुरी)
मोठ्या प्रमाणात धरणे बांधून देखील महाराष्ट्रात सिंचन समाधानकारक का नाही?
उपयुक्त साठा म्हणजे काय?
कोयना
– कोयना धरणाचे किती टप्पे? सध्या कितवा?
– विद्युतनिर्मिती क्षमता किती आहे?
– :Lake tapping म्हणजे काय?
– लेक टॅपिंग प्रकल्प भारतात सर्वप्रथम कुठे राबवला गेला? तो कसे काम करतो?
– महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी की महाराष्ट्राचा शाप? कोयना प्रकल्पामुळे भूकंप होतात का?
– कोयनेच्या वाया जाणाऱ्या पाण्याचे काय करता येईल? ते मराठवाडयाकडे वळवणे शक्य आहे का?
नदी जोड प्रकल्पाची महाराष्ट्रातील उदाहरणे कोणती?
स्थिरीकरण प्रकल्प काय असतो?
नदी खोरे विकास महामंडळ सिंचनाचे नियोजन करते का?
राज्य जल परिषदेचा प्रमुख कोण असतो?
उपलब्ध पाण्यापैकी शेतीसाठी किती पाणी वापरले जाते?
पाणीपुरवठ्याच्या फड पद्धतीवर बंदी घातली पाहिजे का?
बुलढाणा पॅटर्न काय आहे? (तलावांचे पुनर्जीवन व त्यातील माती महामार्ग निर्माणासाठी. अमृत योजनेला प्रेरणा दिली)
मेगा रिचार्ज प्रकल्प काय आहे?
पूर्णा नदीवर कोणत्या प्रकारचे बंधारे बांधले आहेत? (शिरपूर पॅटर्न)
कालव्याने सिंचन करणे चांगले की पाईपलाईनने?
फवारा सिंचनासाठी पाण्याचा दाब किती असावा लागतो?
ठिबक सिंचनासाठी किती लागतो?
देशात सर्वाधिक ठिबक सिंचन कोणत्या राज्यात केले जाते?
सिंचनामध्ये डेल्टा काय असते?
अटल भूजल योजना कशी काम करते?
इस्राएल देशाकडून आपल्याला काही शिकता येईल का?
ऊस
हे प्रादेशिक पीक कमी व राजकीय पीक जास्त आहे असे तुम्हाला वाटते का?
एकीकडे ऊसशेती व दुसरीकडे पाण्याचे टँकर – ही विसंगती नाही का?
कोकणात ऊस घेण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे का?
ऊस शेतकरी राजकीय दृष्ट्या सक्रिय असतो असे दिसते. तसे का?
ऊसाला आळशी पीक असे का म्हणतात?
ऊसाला FRP का दिला जातो? इतर पिकांना का मिळत नाही?Sugarcane साखर कारखान्यांना देणं शेतकऱ्याला फायदेशीर आहे की गूळ बनवण्यासाठी गुऱ्हाळाला देणं?
साखर उत्पादन व भारत मधुमेहाची राजधानी असणे यांचा संबंध आहे का?
साखरेचा चहा पिणे चांगले की गुळाचा चहा?
E-२० धोरणामुळे ऊस या पिकाला संजीवनी मिळाली आहे का?
climate change च्या काळात ऊस हे टाकून राहणारे पीक आहे की लवकर नष्ट होणारे?
ठिबक सिंचन पद्धतीने ऊस घेता येतो का?
मल्चिंग काय असते?
सध्या ऊसतोड कामगारांना कशी मजुरी मिळते? किमान रोजगार किती द्यायला पाहिजे? टनामागे किती रुपये दिले पाहिजेत?
शुगरकेन हार्वेस्टर मुळे ऊसतोड कामगार कमी होतील का?
यांत्रिक कोयता (ऊस तोडणीसाठी) कसा बनवता येईल?
ऊस पिकामुळे महाराष्ट्राचा फायदा झाला आहे की तोटा?
द्राक्ष
वटवाघुळ द्राक्षांकडे का आकर्षित होतात?
द्राक्ष बागा (विशेषतः नाशिक विभागात) कमी होण्याचे कारण काय?
जितकी निर्यात नाशिक द्राक्षांची होते तितकी सांगलीच्या द्राक्षांची होत नाही, असे का?
द्राक्षांच्या प्रमुख जाती कोणत्या? (सोनाका, बंगलोर ब्लू)
द्राक्षांची बी विरहित प्रजाती कोणती? तिचा काय फायदा होतो?
बी विरहित प्रजाती बी वाल्या प्रजातीपेक्षा कशी वेगळी ठरते?
महाराष्ट्राला देशाची वाईन राजधानी म्हणणे बरोबर आहे का?
संत्री
नेपाळ आणि पूर्वोत्तर राज्यातून आणलेल्या संत्रांच्या कलमांची नागपुरात लागवड कोणी केली होती? (रघूजी भोसले)
नागपुरातील संत्री कोणत्या गटात मोडतात? (मँडरिन)
अस्सल विदर्भ संत्री कशी ओळखतात? (साल खडबडीत असते)
नागपूरची संत्री चांगली असतात की अमरावतीची?
GI नागपूर संत्री या नावाने का घेतला आहे?
संत्र्यांचा रस बनवण्यासाठी जात उपलब्ध आहे का?
डाळिंब
शरद सीडलेस काय आहे?
कोणत्या देशांना डाळिंब निर्यात होते?
डाळिंबावर कोणता रोग पडतो? (तेल्या) डाळिंब वरील pest and diseases सांगा?GI मिळाले आहे का?
कांदा
कांदा रडवतो असे का म्हणतात?
GI मिळाले आहे का?
पांढरा कांदा लाल कांद्यापेक्षा महाग का आहे?
कांद्याची निर्यात होते की आयात?
उन्हाळी कांदा काय असतो?
TOP योजना यशस्वी आहे का?
पाणलोट व्यवस्थापन (watershed management)
पाणलोट क्षेत्र कशाला म्हणतात?
वॉटरशेड आणि कॅचमेंट यात काय फरक आहे?
पाणलोट क्षेत्राला गती पोहोचवणारे घटक कोणते?
जनावरे चारल्यामुळे पाणलोट क्षेत्राला क्षती पोहोचते का?
त्यावर कोणता उपाय करता येईल?
सपाट प्रदेशात, जिथे उतार नाही, तिथे पाणलोट व्यवस्थापन करता येते का?
check dam आणि percolation dam यात काय फरक असतो?
पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनासाठी समुदाय व्यवस्थापन (community management) गरजेचे असते का?
रामजी यात सक्रिय भूमिका निभावू शकते का?
जलस्तर आधीपेक्षा सुधारला आहे हे कसे ओळखायचे?
पाण्याची क्षारता कशी मोजायची?
भूगर्भजल
भूगर्भातील जल शेतीसाठी पाण्याचा प्राथमिक स्तोत्र म्हणून वापरणे योग्य आहे का?
त्याला पृथ्वीचा राखीव साठा असे का म्हणतात?
भूगर्भातील पाणी (underground water) आणि भूपृष्ठाखालील पाणी (sub-surface water) यात काय फरक असतो?
आपण पृथ्वीवरील पाण्याचा साठा वाढवू शकतो का?
एखादा मोठा तलाव हा कार्बनचा साठा (carbon stock) असतो की carbon sink?
दक्खनच्या पठाराची वैशिष्ट्ये कोणती?
बोअर किती खोलवर मारण्याची परवानगी आहे?
कुसुम योजना काय आहे?
मृदा
मृदा colloidal घटक कोणते असतात?
Podzol काय असतात?
मृदेची प्रत (texture) आणि मुद्दा संरचना (structure) यातील फरक सांगा.
Sub-soiling काय असते?
मृदा आरोग्य कार्ड – ही योजना मृदेचे फक्त आरोग्य तपासते की त्यावर उपायही सुचवते?
ही योजना कशी काम करते? डेटा कोण सांभाळतो? कोणता अधिकारी या योजनेची अंमलबजावणी करतो?
समजा तीन प्रतीच्या मृदा जमिनी आहेत – काळी, लाल व गाळाची. या प्रत्येक मृदेची वैशिष्ट्य काय आहेत? त्यात कोणती पिके घेणे सोयीस्कर ठरेल?
NPK चे आदर्श गुणोत्तर कोणते? सध्या भारतात काय गुणोत्तर आहे? ते कसे सुधारता येईल?
जर शेतात राप केला तर सुपीकता वाढते का?
वाळवंटी प्रदेशाचे शेतजमीनीत रूपांतर कसे करता येईल?
सुपीकता (fertility) आणि उत्पादकता (productivity) यात काय फरक आहे?
एकर व हेक्टर यांचे मोजमाप कसे केले जाते? त्यांच्यात काय संबंध असतो?
Diff bet soil erosion and runoff. How farmers know about soil erosion?
मृदेचा विमा उतरवता येतो का?
अतिवृष्टीने मृदा वाहून गेली तर काय उपाययोजना करावी लागेल?
खते
युरियामध्ये नत्र (nitrogen) किती असते?
कंपोस्ट काय असते? ते कसे बनवले जाते?
तुमच्या शेतात तुम्ही किती गोणी खते वापरता?
‘एक देश, एक खत’ कसे काय साध्य करणार? त्यावर तुमचे मत काय?
‘भारत’ नावाचा एकच ब्रँड असेल तर ती मक्तेदारी होणार नाही का?
पोषणाधारित अनुदान (nutrition based subsidy) देण्यामागे काय तर्क आहे?
fertigation काय असते?
नॅनो खते काय असतात? त्यांचा कोणता फायदा होतो?
नॅनो युरिया कोणी बनवले आहे?
ते फवारले जाते की त्याचे मिश्रण केले जाते?
त्याचे पृष्ठीय क्षेत्र (surface area) किती असते?
नॅनो युरिया कोणत्या प्रमाणात मिसळले जाते?
अशा रासायनिक खताचे नाव सांगा जे सेंद्रिय आहे.
कोंबडी खत, गांडूळ खत यांचा वापर कुठे करता येतो?
कीटकनाशके
Pesticides आणि insecticides यात काय फरक असतो?
Contact insecticide आणि systemic insecticide यात काय फरक असतो?
प्लांट क्वारंटाईन काय असते?
कीटकनाशके व शेतकरी आत्महत्या यांचा कसा संबंध आहे?
एकात्मिक कीड व्यवस्थापन काय असते?
त्यानुसार कीटकनाशक फवारणी हा शेवटचा पर्याय असला पाहिजे का?
पिकांचा किती टक्के नाश तणांनी होतो? (३०%)
पिकांचा किती टक्के नाश कीड लागल्याने होतो? (६%)
सेंद्रिय कीटकनाशके प्रभावी असतात का?
शेती व पर्यावरण
निर्वाह शेतीकडून व्यापारी शेतीकडे वळणे हे निर्वनीकरण होण्यासाठी आमंत्रण आहे असं तुम्हाला वाटते का?
शेती पर्यावरणाला पूरक आहे का?
शेती निसर्गविरोधी कृती आहे का?
जलवायू परिवर्तन (climate change) होण्यास शेतीचा हातभार आहे का?
शेतीतून कार्बन उत्सर्जन होते का? कोणत्या कृतींमधून? किती?
ते कसे कमी करता येईल?
नैसर्गिक शेती
शून्यधारीत नैसर्गिक शेती (ZBNF) काय असते? खरोखर खर्च शून्य असतो का?
ही कल्पना कोणाची? (सुभाष पालवे)
जीवामृत काय असते? त्यात कोणते घटक असतात?
बीजामृत काय असते? त्यात कोणते घटक असतात?
या पद्धतीत खते कुठून तयार केली जातात?
Biofuel म्हणून कोणते पदार्थ काम करू शकतात?
जट्रोपा हे झाड आहे, फुल आहे की फळ आहे?
सेंद्रिय शेताला प्रोत्साहन दिले पाहिजे की असेंद्रिय शेतीला?
भारताने असेंद्रिय शेतीवर बंदी घातली पाहिजे का?
शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळतील यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील?
सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेतीमध्ये कोणता फरक आहे? कोणत्या शेतीला प्रोत्साहन दिले पाहिजे?
सेंद्रिय अन्न वेगळा ब्रँड तयार करून विकले पाहिजे का?
ग्रीन क्रेडिट काय असते? ते शेतकर्याना कसे मिळवून देता येईल?
परंपरागत कृषिविकास योजना काय आहे?
तटबंदी युक्त (fortified) तांदूळ, दूध काय असते? ते कसे बनवले जाते? नैसर्गिक शेतीतून तटबंदी युक्त पिके घेणे शक्य आहे का?
पीएम प्रणाम योजना काय आहे?
ट्रॅक्टर
Difference between machine and implement?
ट्रॅक्टर काय आहे?
ट्रॅक्टेरला RTO Passing लागते का?
भारतात ट्रक जास्त आहेत की ट्रॅक्टर?
ट्रॅक्टरची किंमत काय असते?
शेतीसाठी किती hpचा ट्रॅक्टर वापरला जातो?
महिंद्रने चालक विरहित ट्रॅक्टर आणले आहे. यावर तुमचे काय मत आहे?
भारत ट्रॅक्टरच्या उत्पादनात जागतिक नेता बनला आहे. हे चांगले की वाईट?
ट्रॅक्टरमुळे बेरोजगारी वाढते का?
ट्रॅक्टर सेवांचे उबरीकरण (uberisation) करण्याची गरज आहे का?
Happy Seeder महाराष्ट्रात का वापरला जात नाही?
stubble burning ची समस्या महाराष्ट्रात का नाही? की आहे?
शेती तंत्रज्ञान (Agritech)
तुम्हाला कृषी क्षेत्रातील काही स्टार्टअपची नावे सांगता येतील का?
ते स्टार्टअप नफ्यात आले आहेत का? माहितीचा पुरवठा अबाधित ठेवला (access to information) तर त्याला त्याचा काय फायदा होतो?
शेतकरी व ग्राहक यांना जोडणारे एखादे ऍप आहे का?
महाविस्तार ऍप काय काम करते? वापरून बघितले आहे का?
महाडीबीटी कसे काम करते?
फक्त माहीतीचा पुरवठा पुरेसा आहे की भौतिक अस्तित्व (physical presence) असणे आवश्यक आहे?
सध्या किती शेतकरी अशा सेवांचा लाभ घेत आहेत?
शेतीमध्ये जैव-तंत्रज्ञानाला कितपत वाव दिला पाहिजे?
कृषी क्षेत्रातील भविष्यातील तंत्रज्ञानाबद्दल तुम्ही काही सांगू शकता का?
मॉलिक्युलर शेती काय असते? (molecular agriculture)
नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीची उत्पादकता कशी वाढवता येईल?
तांत्रिक
Permanant Wilting Point काय असतो?
क्षेत्र क्षमता काय असते? (Field capacity)
Sewage आणि sludge या दोघांतील फरक सांगा.
टोमॅटो व वांगी ही फळे आहेत की भाजीपाला?
कडधान्य व भरडधान्य यात फरक काय?
आपण प्रायोगिक स्तरावर regenerative शेती करायला सुरुवात केली पाहिजे का?
AT (Anti-bacterial) बियाणे काय असते? त्याचा काय उपयोग होतो?
IFFCO आणि भारतीय बियाणे महामंडळ (FCI) कशाप्रकारे काम करतात?
समुद्री तण (sea weeds) यांचा शेतीमध्ये कशाप्रकारे वापर करून घेता येईल?
Phyto-sanitation काय असते?
भारताला ते न पाळल्याचा फटका बसला आहे का?
टोळ (locust) संख्येने कशाप्रकारे वाढतात?
त्यांची वाढती संख्या आपल्या लक्षात कशी येत नाही?
ते प्रामुख्याने कुठून येतात?
टोळधाड आली तर कोणते उपाय योजावे लागतात?
बाजरी पासून वीज कशी तयार होते?
दुग्ध जनावरे व संगीत प्रणाली यांचा काही आंतरसंबंध आहे का?
Totipotency काय असते?
Callous culture काय आहे?
बहुसंख्य पीके ही त्यांच्या जंगली कुटुंबातून आपण दत्तक घेतली आहेत. तुम्ही काही पिके व त्यांचे जंगली नातेवाईक सांगू शकता का?
पीक संसर्ग (crop infestation) काय असतो?
उभी शेती काय असते? (Vertical farming)
ट्रान्सजेनिक पिके काय असतात?
सोनेरी तांदूळ (गोल्डन राईस) ट्रान्सजेनिक असतो का?
Genome Mapping काय असते? ते आपल्याकडील कोणत्या पिकांसाठी झाले आहे?
प्लांट पॅथॉलॉजी या संज्ञेतून तुम्हाला काय समजते?
Systemic Rice Intensification काय असते?
जलवायू परिवर्तन सहन करू शकतील अशा काही पिकांची नावे सांगा. (परभणी क्रांती – भेंडी)
झिरो टिलेज काय असतं?
शेतीची मकोका पद्धत काय आहे? बियाणांच्या आवृत्या बाजारात कशा आणल्या जातात?
त्यासाठी प्रमाणपत्र लागते का?मका कोणत्या पद्धतीने पेरतात?( ridges and furrow)
मक्यावरील recent pest कोणती; control कसा कराल?
BBF वरती मका लावतात का?
काँग्रेसी गवत काय असते? ते परदेशी (exotic) जीव आहेत का?
आद्रता मोजण्यासाठी कोणती उपकरणे वापरतात?प्लास्टिक तांदूळ काय असतो? तो भारतात आहे का?
ग्लूटेन फ्री आहार आपण घेतला पाहिजे का?
पॉलिहाऊस व ग्रीन हाऊस यात काय फरक असतो?
काउंटर बंड आणि ग्रेडेड बंड यात काय फरक असतो?
संशोधन
शेती पदवीधर शेती संशोधनाकडे का वळत नाहीत?
भारत शेती खर्चाच्या किती टक्के खर्च संशोधनावर करतो? GDP च्या?
केलेले संशोधन शेतकऱ्यांपर्यंत का पोहचत नाही?
काही सध्या कार्यरत कृषी वैज्ञानिकांची माहिती सांगा.
कोणी कृषी अर्थतज्ज्ञ माहिती आहेत का?
विस्तार सेवा (extension services) प्रभावी कामगिरी करत आहेत का?
कृषी सेवक यासाठी जबाबदार आहेत का?
महाराष्ट्रात कोणत्या कृषी संशोधन संस्था आहेत?
फलोत्पादन
तुम्हाला t1 हायब्रीड फ्लोरिबंडा याबद्दल माहिती आहे का? (गुलाब प्रजाती)
भेंडीला कोणती कीड लागते?
भेंडीच्या विषाणूमुळे होणारे रोग कोणते? नियंत्रणासाठी उपाय सांगा.
Agro-ecological zone काय असतात?
त्यांचे वर्गीकरण कसे केले जाते? राजस्थान हा कमी पावसाचा प्रदेश असूनही मोठ्या प्रमाणावर फळे व भाजीपाला निर्यात करतो. कसे काय?
भाऊसाहेब फुंडकर कोण होते? फळबाग लागवडीला किती टक्के अनुदान दिले जाते? (८०%)
Avocado
हे काय असते?
त्याच्या वाढीसाठी कोणती भौगोलिक स्थिती आवश्यक असते?
त्याचा सर्वात मोठा उत्पादक कोण?
याला सध्या मागणी का वाढली आहे?
केसस्टडी
समजा एका एका विहिरीचे पाणी गावातील सहा शेतकऱ्यांना द्यायचे आहे. तुम्ही त्याचे वाटप कसे कराल?विदर्भ मध्ये land holding जास्त आहे, माती पण चांगली आहे, कोकणात तसं नाही तरी कोकणात शेतकरी आत्महत्या दिसत नाहीत असं का?
रायगड मध्ये industries मुळे आंब्यावर काय परिणाम होतो?
कोकणात horticulture एवढं develop का झालं नाही आहे?
कोकणात बासमती का घेत नाहीत?
कराडमध्ये एक प्रोजेक्ट झालंय जो झाला तेव्हा त्याचासारखा प्रोजेक्ट इंडिया मध्ये नव्हता…त्याचा नाव सांगता येईल का….
(टेंभू Lift irrigation)
माझ्याकडे हरित पट्टा आहे. पण त्यावर सूर्यप्रकाश पडत नाही. त्यावर कोणती पिके, फळे, फुले घेता येतील?
तुमच्या परिसरातील असे झाड सांगा की जे फळे देते, सावली देते व जमिनीची धूप थांबवत आहे.
तुमच्या शेतात लहानपणापासून ते आत्तापर्यंत तुम्हाला कोणत्या प्रकारचे बदल झाडझडोऱ्यात दिसले?
महात्मा फुले
त्यांना महात्मा का म्हटले गेले?
फुले नाव त्यांना कसे मिळाले?
त्यांनी स्वतः शेती केली होती का?
त्यांना काय अनुभव आला?
त्यांनी ”शेतकऱ्याचा असूड” असे पुस्तकाचे नाव का ठेवले?
पुस्तकाची सुरवात त्यांनी कोणत्या अखंडाने केली आहे?
हे पुस्तक छापायला त्यांना कोणी वित्त पुरवले?
या पुस्तकात त्यांनी शेती सुधारणेसाठी कोणत्या सूचना केल्या आहेत?
इशारा पुस्तकात त्यांनी कोणता इशारा दिला आहे?
फुले यांनी शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण असे का म्हटले आहे?
पंजाबराव देशमुख
पंजाबराव यांचे स्वातंत्र्य लढयात कोणते योगदान होते?
घटनासमितीत त्यांची कामगिरी कोणती? (पंडित नेहरुं खालोखाल सर्वाधिक शब्द बोलले)
देशाचे पहिले कृषिमंत्री म्हणून त्यांनी कोणती कामगिरी केली?
पंजाबराव म्हणत की ‘India’s culture is agriculture’,
हे विधान तुम्हाला मान्य आहे का?
वसंतराव नाईक
वसंतराव यांना महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते असे का म्हणतात?
सर्वात प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री पद त्यांनी सांभाळले, यशाचे रहस्य कोणते?
शिक्षण क्षेत्रात त्यांनी कोणते योगदान दिले?
बाळासाहेब सावंत
राज्याचे कृषिमंत्रीपद त्यांनी भूषवले होते का?
राज्याचे ते पहिले हंगामी मुख्यमंत्री कधी होते?
साहेब शब्द कोणत्या भाषेतून आला आहे?
