RajyaSeva Questions

समकालीन घटना 

अमृतकाल

विदा संरक्षण विधेयक – तपशील 

पुट्टास्वामी केस – राष्ट्रीय सुरक्षा खाजगीपणाला धोका?

वाढते अपघात व घातपात 

संघटीत गुन्हेगारी 

मानवी अवकाश यात्रा  

राज्यातील ओला दुष्काळ 

केंद्राचे ओला दुष्काळ जाहीर करण्याचे निकष कोणते आहेत?

तशी स्थिती आहे का?

राज्य ओला दुष्काळ घोषित करू शकते का?

ओला दुष्काळ जाहीर झाल्यास कोणते फायदे मिळतील?

सध्या ड्रोनने पंचनामा करण्याची पद्धत सुरु आहे. तिचे फायदे/तोटे कोणते?

अवर्षण व दुष्काळ यात काय फरक आहे?

शेतीच्या नुकसानीची भरपाई सरकारने दिली पाहिजे का?

फसल बिमा योजना प्रभावी नाही आहे का?

लडाख मधील उद्रेक 

उद्रेक कोणत्या कारणांनी झाला?

हे जेन झीचे आंदोलन होते का?

जेन झी कोण असतात? तुम्ही त्यात आहात का?

जेन झी कोणत्या बाबतीत वेगळे आहेत?

आंदोलकांच्या कोणत्या मागण्या आहेत?

सोनम वांगचुक हिरो आहेत की व्हिलन?

त्यांच्यावर कुठला सिनेमा निघाला होता? (३ इडिओट्स)

त्यांना कुठले आंतरराष्ट्रीय अवॉर्ड मिळाले होते? (रॅमन मॅगसेसे)

नेपाळ मधील उद्रेक 

भारतावर कोणता परिणाम होईल?

भारताला यातून कोणता धडा शिकता येईल?

नेपाळ मधील तरुणाई भारताविरुद्ध आहे का?

नेपो किड्स काय असतात?

ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor)

  1. पहलगामवरील हल्ला स्थानिक लोकांनी केला नसून पाकिस्तानच्या सीमेपलीकडील घुसखोरीमुळे झाला होता हे भारताने आधी सिद्ध करावे का?
  2. पहलगाम हे कोणाचे अपयश आहे – राज्य सरकारचे की केंद्र सरकारचे, की आयबी (IB) किंवा रॉ (RAW) चे, की राज्य गुप्तचर विभागाचे, की राज्य पोलिसांचे, की लष्कराचे (Army), की बीएसएफ (BSF) चे?
  3. पहलगामवरील हल्ल्यात फक्त पुरुषांनाच का लक्ष्य केले गेले आणि स्त्रियांना का सोडले गेले?
  4. पहलगाममध्ये आदिल शाहने केलेल्या त्यागाचा आपण कसा उपयोग करू शकतो?
  5. ते युद्ध होते का? युद्धाची व्याख्या कशी केली जाते?
  6. ते कोणी जिंकले?
  7. जर देशावर असा दुसरा हल्ला झाला तर काय होईल?
  8. भारतावर ‘स्वार्म हल्ला’ (Swarm attack) झाला आहे का?
  9. भारताने प्रथम माहिती देऊन नंतर पाकिस्तानवर हल्ला केला हे खरे आहे का?
  10. भारतीय सैन्याने झालेल्या नुकसानीबद्दल भारताच्या लोकांना माहिती देत राहावे का?
  11. पाकिस्तानच्या सीमेच्या आत भारताने केलेला हल्ला संयुक्त राष्ट्र संघ (UNO) आणि त्याच्या सनदेच्या विरोधात आहे का?
  12. भारत ‘नाम’ (NAM – Non-Aligned Movement) सारख्या अलिप्ततावादी धोरणाचे उल्लंघन करत आहे का?
  13. भारताने युद्ध थांबवणे ही चूक होती का?
  14. युद्ध हे भविष्यातील युद्धांमध्ये हवाई दल (Air Force) वर्चस्व गाजवेल याचा स्पष्ट संकेत आहे का?
  15. अमेरिकेने (USA) युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी केली हे खरे आहे का?
  16. आपण अजूनही शिमला कराराला (Simla agreement) बांधील आहोत का?
  17. सिंधू पाणी करार (Indus Water Treaty) रद्द करण्याचे काय परिणाम होतील?
  18. पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब हल्ला (Nuclear attack) करू शकतो का?
  19. जर पाकिस्तानने असा हल्ला केला, तर भारत त्याचे संरक्षण करू शकेल का?
  20. इस्त्रायलप्रमाणे (Israel) भारताने पाकिस्तानच्या अणुक्षमतेवर (nuclear capability) हल्ला करून ती नष्ट करावी का?
  21. पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या देशांशी भारताने मुत्सद्दी संबंध (diplomatic relationship) तोडावेत का?
  22. भारताने पाकव्याप्त काश्मीरवर (PoK) हल्ला करून ते ताब्यात घ्यावे का?
  23. भारताने पाकिस्तानची हवाई हद्द (air space) वापरणे थांबवावे का? आपण ते वापरण्यासाठी लाखो डॉलर्स देत आहोत.

इस्त्रायल – इराण – अमेरिका (Israel – Iran – USA)

  1. आपण तिसऱ्या महायुद्धाकडे (third world war) वाटचाल करत आहोत का?
  2. या संघर्षात भारताने कोणती भूमिका घ्यावी?
  3. इस्त्रायल आत्म-संरक्षणासाठी लढत असल्यामुळे आपण त्याच्या बाजूने उभे राहावे का?
  4. इराण अणुबॉम्ब (nuclear bomb) बनवण्याची महत्त्वाकांक्षा सोडून देईल का?
  5. इराण अणुबॉम्ब बनवत असल्याचे सिद्ध झाले आहे का?
  6. इस्त्रायल हमास (Hamas), हिजबुल्लाह (Hezbollah), हुथी (Houthi) यांना संपवू शकेल का?
  7. इस्त्रायल युद्धखोर राष्ट्र (war mongered nation) बनले आहे का?
  8. अमेरिका युद्धात का सहभागी होत आहे, अमेरिकेसाठी काय धोक्यात आहे?
  9. हा सहभाग अमेरिकेला मजबूत करेल की कमकुवत करेल?

इज्राएल – हमास युद्ध 

इज्राएलने दोन राज्ये सिद्धांत मान्य केला आहे का?

पॅलेस्टाईन आधी होते की इस्राएल?

फताह गट कुठे राज्य करतो?

पॅलेस्टिनची राजधानी कोणती?

गाझा पट्टी कोणत्या समुद्रावर आहे?

हैफा बंदराचे व्यवस्थापन कोण करते?

हमास कोणत्या संघटनेचा फुटावा आहे? 

हिजबोल्ला गट कोणत्या देशातून हल्ले करतो?

इज्राएलची गुप्तहेर संघटना कोणती?

आर्यन डोम तंत्रज्ञान काय आहे? 

भारताने या युद्धात कोणाची बाजू घेतली आहे?

भारतीय पंतप्रधानांनी कधी पॅलेस्टिनला भेट दिली आहे का?

भारतावर या युद्धाचा कोणता परिणाम होतो आहे?

महाराष्ट्रातील ज्यू कोणत्या नावाने ओळखले जातात?

रशिया- युक्रेन युद्ध – संकट व संधी

युनोचा पुन्हा एकदा पराभव झाला आहे का?

युद्धात पहिला बळी सत्याचा जातो. कसा? 

भारताची भूमिका काय? युद्ध संपल्यावर भारताने कोणती कामगिरी करणे अपेक्षित आहे?

पाकिस्तान नाटो सदस्य झाला तर भारताने काय करायला हवे?

आपण रशियाकडून स्वस्त दराने तेल घेत आहोत. ते अनैतिक आहे का?

लाडकी बहीण 

ही योजना महिला सबलीकरणाचे उदाहरण आहे की सशक्तीकरणाचे की सक्षमीकरणाचे?

महसुलाचा किती वाटा या योजनेसाठी लागत आहे?

पात्रतेचे निकष कोणते आहेत?

डोमिसाईलची अट आहे का?

हे चांगले राजकारण आहे की चांगले अर्थकारण की दोन्ही?

की वाईट राजकारण आहे व वाईट अर्थकारण आहे की दोन्ही 

ही योजना बाकी कल्याणकारी योजनांच्या मुळावर आली आहे का?

सामाजिक न्याय मंत्रालय बंद’करा असे मंत्री का म्हणाले?

लाडका भाऊ 

ही योजना कशा प्रकारे काम करते? त्यातून कोणता फायदा होईल?

ही योजना महिलांना लागू आहे का?

या योजनेने बेरोजगारीवर मात करता येईल का?

एक देश एक निवडणूक 

तुमचा या कल्पनेला पाठिंबा आहे का?

पहिल्या तीन निवडणूक या पद्धतीने झाल्या होत्या का?

दरडोई निवडणुकीसाठी किती खर्च येतो? तो जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे का?

एखाद्या देशाने ”एक देश एक निवडणूक” राबवले आहे का?

ही पद्धत प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात आणेल का?

नाचिप्पन समितीच्या शिफारसी काय होत्या?रामनाथ कोविंद समितीच्या शिफारसी काय आहेत?याप्रकारे मतदानाची टक्केवारी वाढेल का?आचार संहिता हा निर्णय प्रक्रियेत अडथळा आहे का? 

महाराजांचा पुतळा 

पुतळे उभारण्यावर बंदी घातली पाहिजे का?

३D प्रिंटिंग काय असते? त्याचा काय फायदा होतो?

महापुरुषांच्या पुतळ्यामुळे गुन्हेगारी दर कमी होतो का?

महापुरुषांचे पुतळे डोक्यावर घेऊ नका तर त्यांचे विचार डोक्यात घ्या असे कोण म्हणाले? (प्रबोधनकार ठाकरे) 

वाढवण 

या बंदराचा विकास कोणती कंपनी करणार आहे?

स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध का आहे?

भूमिपूजन पालघर येथे का करण्यात आले?

reclaimed भूमीवर प्रकल्प उभारल्याने काय होईल?

मासेमारी वर या प्रकल्पाचा परिणाम होईल का? (golden belt of fishing)

खारफुटी वनांवर या प्रकल्पाचा परिणाम होईल का? 

सरकारी रुग्णालये आजारी 

आरोग्यावर पुरेसा खर्च केला जात आहे का?

मृत्यूंसाठी आरोग्यमंत्री जबाबदार आहेत की पूर्ण मंत्रीमंडळ?

वैद्यकीय अधिष्ठाता यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे का?

Maharashtra Medical Pricing Authority काय काम करते? 

Directorate of Medical Research कायम स्वरूपी संचालक नाही. 

आरक्षण 
– आरक्षण रद्द केले जावे का?

– जातीअंत होऊ शकतो का?

– जातीभेद व वंशभेद यातील फरक 

– वर्गभेद व वर्णभेद यातील फरक 

– सर्व समाज गटांना त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षण देऊन टाकले पाहिजे का? 
– आरक्षण हे धोरण मुळात १० वर्षासाठीच होते का?

– आरक्षण हे साध्य आहे की साधन? 
– आरक्षणाचे धोरणाला अंतिम तारीख (Expiry date) ठेवायची गरज आहे का?
– पदोन्नतीमध्ये आरक्षण असावे का?

– लष्कर व न्यायव्यवस्थेतही आरक्षण आणले जावे का? 

– आरक्षणाचे तीन फायदे व तीन तोटे सांगा. 

– आडवे (horizontal) आरक्षण व उभे (vertical) आरक्षण यात काय फरक असतो?

– खाजगी क्षेत्रातही आरक्षण दिले पाहिजे का? तसा आदेश सरकारला काढता येईल का? 
– मुस्लिमांमध्ये मागासपणा असल्यामुळे त्यांना आरक्षण दयावे का?

– धर्मांतर केल्यावर आरक्षण काढून घेतले पाहिजे का? (आंध्र उच्च न्यायालयाने तसा निकाल दिला आहे)

– धनगर आरक्षणाचा प्रश्न कसा सोडवता येईल?
– LGBTQ समाजाला आरक्षण असावे का?

– भटके विमुक्त व OBC यात कोणता फरक आहे?

– भटके व विमुक्त यात काय फरक आहे?

– आरक्षणाऐवजी आर्थिक सहाय्य दिले पाहिजे या विधानावर तुमचे मत. 

– आरक्षण न देताही आरक्षणातून मिळणारे फायदे मिळवून देता येतील का?

– आरक्षणाच्या धोरणात येणाऱ्या काळात कोणते बदल अपेक्षित आहेत?

– महाराष्ट्रात अनुसुचित जाती (SC) किती आहेत? (५९) किती टक्के? (९) 

– आरक्षणात उपवर्गीकरण (sub categorization) लागू केले पाहिजे का?

– ते कशा प्रकारे काम करते?  

– मराठा आरक्षण

  – मराठा कुणबी मधील फरक, मराठा हा वर्ग की जात?

  – सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले जावे का?

  – कुणबी प्रमाणपत्र असलेल्या सर्वाना आरक्षणाचा लाभ मिळेल का? 

  – मराठा समाजाला OBC मध्ये सामावून घेतल्याने इतर जातींच्या संधी संकुचीत होतील असे तुम्हाला वाटते का?

  – मराठा सोडून इतर जातींची कुणबी अशी नोंद असेल तर त्यांनाही तसे प्रमाणपत्र दिले जावे का?

  – मराठा समाजाप्रमाणे इतर राज्यात पाटीदार, यादव, कापू यांनाही OBC आरक्षण दिले जावे का?

  – OBC आरक्षणात ‘जिसकी जीतनी आबादी, उतना हक’ हा नियम लावून अंतर्गत (पोट) आरक्षण दिले जावे का?      –  हैद्राबाद गॅझेट काय आहे?

  – सरसकट व सगेसोयरे यात काय फरक आहे?

  – जलद पाहणी (rapid survey) व शिरगणती (census) यात काय फरक आहे? 

  – राज्य जातींची शिरगणती (census) करू शकते का? बिहारने कशी केली? (पाहणी केली, शिरगणती नाही)

  – देशात शेवटची जातींची शिरगणती (census) कधी झाली होती? (१९३१)

  – तेव्हा मराठा व कुणबी असे वेगळे मोजले होते का? (नाही) 

  – महाराष्ट्राने जातींची पाहणी करायला हवी का?

  – आरक्षणाचा खरोखर फायदा होईल का?

  – सर्वोच्च न्यायालयाने दिलेली तिहेरी चाचणी (triple test) काय आहे? मराठा आरक्षण संदर्भात त्यातील कोणत्या अटी पूर्ण होतात?

  – SEBC न्यायालयात का टिकत नाही? 

  – सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली ५०% आरक्षणाची मर्यादा महाराष्ट्राने ओलांडली आहे का? त्यातून उलटा भेदभाव निर्माण होईल का? (reverse discrimination)

– महिला आरक्षण
– स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना जे ५०% आरक्षण दिले आहे त्याचा महिला सक्षमीकरणासाठी फायदा झाला आहे का?

– कुठल्या क्रमांकाचे विशोधन संसदेत मांडले?

– महिला आरक्षणाची शिरगणती व विसिमांकन यांच्याशी जोड घालण्याची गरज होती का?

– हा पुढच्या तारखेचा धनादेश आहे असे तुम्हाला वाटते का?

– वेगळ्या अधिवेशनाची गरज होती का?

– OBC महिलांसाठी वेगळी तरतूद असायला हवी होती असे तुम्हाला वाटते का? 

– समांतर आरक्षण लागू करत महिला आरक्षण घेणाऱ्या महिलांचे इतर आरक्षण बंद केले पाहिजे का?  

– कॅबिनेटमध्ये देखील महिलांसाठी आरक्षण ठेवले पाहिजे का?

– राजकीय पक्षांना तिकीट देताना महिलांना ५०% तिकीट देण्यासाठी बाध्य केले पाहिजे का?

– महिलांना निवडणूक लढवण्यासाठी राज्याकडून निधी पुरवावा का? (political funding) 

– १५ वर्षांसाठी आरक्षण पुरेसे आहे का? 

– महिला आरक्षणामुळे समतेचा लढा दुर्बल होईल असे तुम्हाला वाटते का?

– महिला आरक्षणामुळे घराणेशाहीच्या वर्चस्वात वाढ होईल असे तुम्हाला वाटते का?

– EWS आरक्षण
  – आर्थिक दुर्बल घटकांसाठी (EWS) आरक्षण असावे का?
  – आरक्षण हा गरिबी निवारण कार्यक्रम आहे का?
  – SC,ST व OBC यांनादेखील EWS खाली आरक्षण दयावे का?

  – EWS व SEBC आरक्षणातील फरक कोणता? SEBC च्या उमेदवारांना EWS मधून आरक्षण दिले जावे का?

  – SC, ST गटाला देखील नॉन क्रिमी लेयरची मर्यादा घातली जावी का? 
  – सामाजिक अन्यायाला प्रश्न तातडीने हाती घ्यावा की आर्थिक अन्यायाचा?
  – सध्याचे आरक्षण वर्ग आधारित आहे की जाती आधारित?
  – EWS आरक्षण हे समांतर आरक्षणात मोडते का?
  – उच्च वर्णीयांना दिलेले आरक्षण हे आपल्या आर्थिक सुधारणा धोरणाचे अपयश म्हणता येईल का? आपल्याला पुरेसे रोजगार निर्माण करता आले नाहीत याचा हा पुरावा मानता येईल का?
  – EWS आरक्षण आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्यासाठी आहे . मग आयकरात देखील आठ लाखापर्यत करातून सूट मिळावी का?
  – औपचारिक (Formal) समानता व भरीव (Substantive) समानता यात काय फरक असतो?
  – ‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’ आंदोलनाबद्दल तुम्ही ऐकले आहे का?

नामांतर 

नामांतर करण्यासाठी कोणते निकष असायला हवेत/आहेत?लोकमत (peoples opinion) आपल्याला कसे कळेल?

त्यासाठी जनमत (plebiscite) घेतले पाहिजे का?

नामांतर केल्याने कोणते फायदे/ तोटे होतात?

जनगणनेला उशीर 

सरकारने चालढकल करण्यासाठी कोणती कारणे पुढे केली आहेत?

तुम्हाला ती पटतात का?

आपण अनेक माध्यमातून आता माहिती गोळा करत असतो,  दशवार्षिक जनगणना घेणे आपण थांबवायला हवे का?

मतदारसंघ सुमारे पन्नास वर्षे गोठले आहेत. त्यांना मुक्त केले पाहिजे का? 

जातीआधारित जनगणना केली पाहिजे का?

ई-जनगणनेची कल्पना व्यवहार्य आहे का? 

लोक अचूक माहिती देतील का?

रेवडी संस्कृती

हे वित्तीय बेजबाबदारपणाचे (fiscal indiscipline) उदाहरण आहे का? 

भारतात सध्या चालू असलेली सर्वात मोठी लोकं कल्याणकारी योजना कोणती? (गरीब कल्याण योजना)

गरिबांचे रूपांतर योजनांचा ग्राहक (beneficiary) मध्ये झाले आहे का? त्यामुळे राजकीय विरोध क्षीण होतो आहे का?

 मुक्त वस्तूचे (freebie) आश्वासन देणे हा मतदारांना दिलेली लाच आहे का? 

मुक्त वस्तूंवर बंधने घालता येतील का?

ती बंधने निवडणूक आयोगाने घातली पाहिजेत की राजकीय पक्षाने स्वयंबंधने घेतली पाहिजेत?

जर एखादा उमेदवार मतदारांना मोफत तीर्थस्थळांचे दर्शन घडवून आणत असेल व तुम्ही तेथे उपजिल्हाधिकारी असाल तर तुम्ही काय कराल?

OPS विरुद्ध NPS विरुद्ध UPS 

जगभर कोणती पद्धती वापरतात?

तुम्ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कोणती शिफारस कराल? (Sustainable Pension Scheme (SPS)

आंध्रमध्ये कोणता मधला मार्ग काढला आहे?

OPS देणारी राज्य लवकरच आर्थिक गर्तेत सापडतील असे तुम्हाला वाटते का?

दक्षिण भारतात जन्म तर घसरत आहे. त्यांनी NPS ऐवजी OPS ला अग्रक्रम द्यायला हवा का?

इलेक्ट्रिक वाहने – घाई होती आहे का? 

स्वच्छ ऊर्जा व हरित ऊर्जा एकच आहे का? 

आण्विक ऊर्जा स्वच्छ आहे की हरित? की दोन्ही आहे की दोन्ही नाही? 

हिजाब

कुराणात सांगितले आहे का? 

समान नागरी कायद्याने (UCC) यावर मात करता येईल का?

हिजाब व घुंगट परंपरा समांतर आहेत का? 

सार्वजनिक जीवनात हिजाबवर बंदी घातली पाहिजे?

ED

PMLA काय आहे?

इतर अशाप्रकारच्या कायद्यांपेक्षा तो वेगळा कसा आहे?

कोणत्या प्रकारचे गुन्हे ED च्या कार्यकक्षेत येतात?

EDचे गुन्हा सिद्ध करण्याचे प्रमाण कमी का आहे?

राजकीय उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी EDचा वापर होतो आहे का?

लग्नाचे वय वाढवणे 

सध्या भारतीय महिलांचे सरासरी लग्नाचे वय किती?

नवरा नवरी मध्ये वयाचा फरक ठेवण्याची आवश्यकता आहे का? 

नवे शैक्षणिक धोरण (NEP)

समीक्षा करा.

पंतप्रधान म्हणाले की मातृभाषेतील शिक्षणाने कणखरपणा, न्याय व दर्जा यांच्यात प्रगती होण्यास सहाय्य होईल. तुम्हाला काय वाटते?

स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पीएम म्हणाले की एनईपी हे गरिबी निवारणाचे शस्त्र आहे. तुम्हालाही तसे वाटते का?

NEPचा SDG साध्य करण्यास कसा फायदा होईल?

बहुप्रवेश – बहुनिकास (multiple entry, multiple exit) तरतुदींमुळे गळती वाढेल का? 

NEPचे 3C कोणते? (critical thinking, creativity, collaboration)

NEP शिक्षणाचे आंतरराष्ट्रीय कारण करू पाहते आहे हे खरे आहे का?

NEP मध्ये बहु शाखा (multi-disciplinery), शाखांतर्गत (intra-disciplinery), शाखांतर (trans-disciplinery) अकॅडमीक बँक ऑफ क्रेडिट कशी काम करते? 

राज्यांना स्वतंत्रपणे धोरणे ठरवण्याची मुभा दिली पाहिजे का?

PM श्री योजना काय आहे?

बिटकॉइन 

सध्याची किंमत किती?

कोण मालक आहे?

पर्यावरणाला धोका आहे का? कसा?

मनी लौंड्रिसाठी कसा वापर होतो?

कोणत्या देशाने बिटकॉइनला अधिकृत चलन म्हणून मान्यता दिली आहे? (Al Salvedor)

e रुपी काय आहे? भारताने डिजिटल करन्सी आणावी का?

क्रिप्टओ चलनांवर बंदी असावी का? 

जर ही कायदेशीर नसतील तर त्यावर कर लावणे अनैतिक नाही का?   

राष्ट्रीय चलनीकरण योजना (NMP)

त्यावर तुमचे मत काय?

मालमत्ता लिझवर दिली पाहिजे की विक्री करणे योग्य?

सरकार कुठल्या मार्गाने जाते आहे?

हे मागच्या दाराने खाजगीकरण आहे का? 

ड्रोन

कुठल्या मंत्रालयाखाली याचे व्यवस्थापन येते?

किसान ड्रोनचा काय फायदा होतो?

सध्या ड्रोन भारतात बनतात की आपण चीनकडून आयात करतो?

ड्रोन चा गैरवापर होऊ शकतो. मग सरकारने उदार धोरण का स्वीकारले आहे?

गतिमान प्रशासनाचे प्रयत्न 

दादालोरा खिडकी – गडचिरोली 

सेंट्रल डॅश बोर्ड 

लखिना पॅटर्न काय होता? आता त्याचे महत्व आहे का?
सारथी काय आहे? सेतू व सारथी मध्ये काय फरक आहे?
नागरिकांची सनद आणि सरकारी सेवा कायदा काय आहे?

करमाळा येथील मनोज राऊत या शिक्षकांचे उपक्रम 

– thumps down – बचत गटांना सही करण्यास शिकवणे 

– जे पालक दारू सोडतील त्यांच्या १ ते १० वी तील पाल्यास शिष्यवृत्ती 

– science  wall – गावातल्या भिंती वैज्ञानिक प्रयोगांनी सजवल्या, सूत्रे 

– वैज्ञानिकांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात. 

– अग्नी क्षेपणास्त्राचे प्रारूप गावात 

स्पॉटनाना 

महाराष्ट्रात देखील उत्तर प्रदेशप्रमाणे  लोकसंख्या नियंत्रण कायदा करायला हवा का?

कोविडचे एक लाख मृत्यू महाराष्ट्रात – एक नवे पानिपत?

देशात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात का?

उज्वला 1.0 व उज्वला 2.0 मध्ये काय फरक आहे?

जल जीवन मिशन काय आहे? गती शक्ती अभियान काय आहे?

शेतकऱ्यांना विम्याचा फायदा का होत नाही?

मराठीत अभियांत्रिकी शिक्षण – तुमचे मत.

अभियांत्रिकी प्रवेशासाठी कोणत्याही तीन विषयांचे गुण – कशी कल्पना आहे? 

विद्यापीठातून ज्योतिष्य शिकवले पाहिजे का?

सहकार मंत्रालय हे केंद्राचे राज्याच्या विषयावर अतिक्रमण आहे का?

सीबीआयला स्वायत्तता दिली पाहिजे का? 

ईडीचा गैरवापर होतो आहे असे तुम्हाला वाटते का?

राज्याची विधान परिषद बरखास्त केली पाहिजे असे तुम्हाला वाटते का?

गृहिणींना पगार देण्याची वेळ आली आहे का?

महाराष्ट्रात पूर परिस्थितीत वाढ का होते आहे?

बळकट सह्याद्रीत दरड कोसळण्याचे प्रमाण का वाढले आहे? यावर उपाय काय?

देशद्रोह

-देशद्रोहाची व्याख्या कशी करणार?

– IPC कलम १४४ चा गैरवापर होतो आहे का?
-अर्बन नक्षल असे कोणाला म्हणता येईल?

– सावरकर यांचा राष्ट्रवाद काय होता?  त्यात मुस्लिमांना स्थान होते का?
– सावरकरांचा राष्ट्रवाद भौगोलिक होता कि सांस्कृतिक?
– त्यांचे हिंदुत्व काय होते?
– सावरकरांना भारतरत्न दिले जावे का?
-आपले सामाजिक – जातीय प्रश्न आधी सोडवले पाहिजेत की आर्थिक – राजकीय? 

– राष्ट्रवाद व देशभक्ती यात काय फरक आहे? 

वाहतूक

– हायपरलूप रद्द करण्याचा निर्णय योग्य आहे का?
– मेट्रो हे विकासाचे प्रतिक आहे का?
– मेट्रो हे mass rapid transport चे उदाहरण आहे का?
– मेट्रो कारशेडसाठी झाडे कापली हा निर्णय योग्य होता का?
– तुम्ही काही पर्याय सुचवू शकता का?
– नवनवीन मेट्रो बांधणे चांगले कि विकासाचे विकेंद्रीकरण करणे चांगले?
– मेट्रो निओ काय असते?
– मुंबईतील मोनोरेल का अपयशी ठरली?
– बुलेट ट्रेन ची भारताला गरज आहे की आहे ती रेल्वे सुधारण्याची गरज आहे?
– बुलेट ट्रेन मधील महाराष्ट्राने आपला वाटा काढून घेतला पाहिजे का?

– वंदे भारतम काय आहे?

– रस्ते, रेल्वे व हवाईमार्ग यातील कशाला प्राधान्य द्यायला हवे?
– महाराष्ट्राला जलवाहतूक करण्याची संधी आहे का?
महाराष्ट्रातील राजकारण 
-पक्षांतर बंदी कायदा आमदाराच्या मतांची किंमत शून्य करतो का?
-पक्षांतर बंदी कायदा पक्षांना फायदेशीर तर आमदारांच्या हिताच्या विरुद्ध आहे असे म्हणता येईल का?
-राज्यपाल हे केंद्राचे एजंट असतात का?
-राज्यपाल हे पद फक्त रबर स्टॅम्प उरले आहेत का?

दारूबंदी 
-संपूर्ण दारूबंदी केली पाहिजे का?
-ज्या जिल्ह्यात दारूबंदी आहे ती यशस्वी आहे का?

-चंद्रपूरची दारूबंदी उठवण्याचा निर्णय योग्य आहे का? 

-किराणा दुकानातून वाईन विक्रीला ठेवावी का? 

-इ-सिगारेट वर बंदी घातली पाहिजे कि तंबाखूवरच बंदी घातली पाहिजे?
-गुटखाबंदीला यश आले आहे का?

– डान्सबार वर बंदी असावी का?

– पोर्नोग्राफीवर बंदी घालावी का?

– की बंदीवरच बंदी घालावी?
जवाहरलाल नेहरु
-त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार असे म्हणता येईल का?
-त्यांचे आर्थिक धोरण चुकीचे होते का?
-‘हिंदू वाढीचा दर’ काय संकल्पना आहे?
-त्यांनी प्राथमिक शिक्षणापेक्षा जास्त लक्ष उच्च शिक्षणावर केंद्रीत केले का?
-भारताचा लोकशाही निर्देशांक का घसरला आहे?

चर्चेतील विषय
१) एकवेळ वापराचे प्लास्टिक बंद करता येईल का ?
२) स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिलेल्या महिला आरक्षणाचा महिलांना फायदा झाला का?
३) निवडणूक रोखे पध्द्तीमुळे निवडणुक निधीबाबत पारदर्शकता वाढली आहे असे तुम्हाला वाटते का?
४) शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जावी की कर्जमुक्ती?
५) न्यायव्यवस्थेला बदलासाठी बाहेरून तयार केले पाहिजे की आतून बदल होईल?
६) कुलभूषण जाधव यांची सोडवणूक करण्यासाठी कोणती पावले उचलली पाहिजेत?
७) नियोजन आयोग प्रभावी होती की आताचा नीती आयोग जास्त परिणामकारक आहे?
८) राज्यात नीती-आयोगाची गरज आहे का?
९) सोन्याचा वाढता वापर कसा कमी करता येईल?
१०) महाराष्ट्राचे उदयोगधंद्यातील अग्रस्थान घसरून ते गुजरातकडे जात आहे का?
११) दिल्ली, मुंबई येथील प्रदूषण कोणत्या उपायांनी आटोक्यात आणता येईल ?
१२) शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून पर्यटनाला चालना देणे चांगले की गडकिल्ल्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करून?
१३) भारतासाठी काय योग्य आहे – मेक इन इंडिया की मेड इन इंडिया की मेक फॉर इंडिया की मॅन्युफ्याक्चर इन इंडिया? की आत्मनिर्भर भारत’?

१४) समान नागरी कायद्याची गरज आहे का?

१५) लोकसंख्या नियंत्रणाची गरज आहे का?
१६) गोहत्या, गोवंशवर महाराष्ट्र शासनाचे काय धोरण आहे? 

१८) लावणी – अभिजात नृत्य

?

१९) वेगळा विदर्भ – 

विकासाचा अनुशेष की अनुशेषाचे राजकारण२०) जी. एम. पिकांवर बंदी घालावी का?

२१) शिक्षण खाजगी असावे की सरकारी?२२) सोशल मिडियायावर सेन्सॉरशिप असावी का?

२३) ऍस्ट्रोसिटी कायद्याचा दुरुपयोग होतो आहे का? तो बंद करायला हवा का?
२४) महाराष्ट्र गुजरातच्या मागे आहे का?
२८) चिनी मालावर बहिष्कार घालावा का?
२९) महाराष्ट्राचा सीमावाद कसा सोडवता येईल?

३०) रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी काय करता येईल?
३१) भारताने लष्करी महासत्ता बनावे की आर्थ्रिक की सांस्कृतिक की धार्मिक महासत्ता बनावे?
३२) जागतिकीकरणाने भारतीय संस्कृती धोक्यात आली आहे का?
३३) सहकारात्मक संघराज्य व स्पर्धात्मक संघराज्य यात काय फरक आहे.
३४) दररोज संविधानाच्या सरनाम्याचे शाळेत वाचन करणे योग्य आहे का?
३५) राज्य सरकारने स्वतःची शेती विमा कंपनी उभी करावी का?

देशांतर्गत मुद्दे
– जालिकट्टू, कंबाला, बैलगाड्यांची शर्यत हे सर्व चालू ठेवायला हवे का? संविधानाने दिलेल्या सांस्कृतिक मूल्यांच्या जपणुकीच्या अधिकारांचे काय?
– भारताने विज्ञानाला महत्व दयावे की तंत्रज्ञानाला?
– अर्थशास्त्रात अमर्त्य सेन यांचे काय योगदान आहे?
– नद्यांचे पाणीवाटप वारंवार संघर्ष निर्माण करते आहे. त्यावर कशाप्रकारे उपाय करता येईल?
– देशाच्या विविध भागातून लष्कर व लष्करी कायदे मागे घेण्याची गरज आहे का?
– इंडिया ऑनलाईन आहे व भारत ऑफलाईन ही टीका योग्य आहे का?
– शहरे प्रथम स्मार्ट करायला हवी की गावे? गांधी म्हणत की गावांचा विकास हा भारताचा विकास आहे, ते सूत्र आता उलटे झाले आहे का?
– वैद्यकीय सुविधांचा वाढता खर्च कसा कमी करता येईल? आरोग्य क्षेत्रात उदारीकरण, खाजगीकरण हे धोरण योग्य आहे की सरकारी आरोग्य सुविधा पुरवणे हे धोरण योग्य ठरेल?

आंतरराष्ट्रीय विषय
– सार्कचे भवितव्य काय असू शकते? ब्रिक्स हे धोरण भारताला कितपत फलदायी आहे. भारत चीनच्या प्रभावाखाली जाण्याचा धोका आहे का?
– भारताने यापुढे गरीब, अविकसित देश म्हणून स्वतःला जगापुढे सादर करावे की उभारती अर्थव्यवस्था व प्रांतिक सत्ता म्हणून स्वतःची प्रतिमा बनवावी?
– चीनने आर्थिक प्रगती सध्या केली आहे व राजकीय उदारीकरणात मागे पडला आहे, तर भारताने उलटे केले आहे. कोणती स्थिती चांगली म्हणता येईल.
– BRI या चीनच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाबाबत भारताने कोणती भूमिका घ्यायला हवी.
– भारताच्या यूनोतील कायम सदस्यत्वाच्या मागणीची सध्याची स्थिती काय आहे?
– भारत न्यूक्लियर सप्लाय ग्रुपचा सदस्य झाला तर काय फायदा होईल.
– सध्याच्या भारताच्या परराष्ट्र धोरणाचे आधारभूत खांब कोणते?

नथिंग पर्सनल अबाऊट इट
– तुमच्या आयुष्याचे ध्येय कोणते? तुमच्या अस्तित्वाचे रहस्य काय? (कोहम ते सोहम)
– नागरी सेवांचीच निवड का केली? (स्पर्धा परीक्षा द्यायचा निर्णय माझा स्वतःचा आहे हे आधी स्वतःला व नंतर पॅनेलला पटवून देता आले पाहिजे)
– कोणत्याही कारणाने अपयश आले तर पर्यायी करियर प्लॅन (Plan B) काय आहे?
– तुमचे कोणते गुण तुम्हाला भावतात?
– आयुष्यात केलेल्या तीन मोठया चुका कोणत्या?
– आयुष्यात कोणत्या तीन गोष्टीनी योग्य वेळी हात दिला?
– यश हे नशिबाने मिळते की कठोर परिश्रमांनी प्राप्त होते?
– तुमचे प्रशासनातील आदर्श कोणते? (दोन-तीन आदर्श व त्यांचे योगदान यावर माहिती जमवून ठेवायला हवी)
– तुमचे राजकारणातील आदर्श कोणते? (असले पाहिजेत, सांगितले पाहिजेत व त्यांच्या गुणदोषांवर खुल्या मनाने चर्चादेखील करता आली पाहिजे)

– एक राज्यातील व देशातील सेलिब्रिटी सुचवा की ज्यांच्याबरोबर तुम्हाला जेवण घ्यायला आवडेल.

– तुम्ही तुमचा राजकीय कल कसा स्पष्ट कराल? डावा, उजवा, मध्यम की मध्यम-डावा किंवा मध्यम-उजवा.
– पंधरा वर्षांनी तुम्ही व्यक्ती म्हणून कसे असाल?
– (जर मुलाखतीपर्यंत पोहोचायला अनेक प्रयंत्न करावे लागले असतील) तर ते का करावे लागले?
– कोणते विषय तुमचे नावडते आहेत?
– तुम्ही तुमच्या पत्नीला घरकामाचा पगार द्याल का?
– तुमच्या जवळच्या नातेवाईकांपैकी कोणी हुंडा देत किंवा घेत असल्याचे कळल्यास तुम्ही त्या विवाहास हजेरी लावेल का? (उत्तरात याहून जास्त काही करण्याची अपेक्षा आहे)

– श्रद्धा, मत, माहिती, जाण, ज्ञान आणि सत्य यात काय फरक असतो?

– तुमची देवाची कल्पना काय आहे?

– तुमचा देवावर विश्वास आहे का?

– तुमच्या कुटुंबाचा आहे का?

– स्वतःचे वर्णन करा.

– विचार करणारी व्यक्ती तटस्थ असू शकते का?

– तुमचा कोणी मेंटर आहे का?

– लोकांना सरकारी नोकरी का हवी असते? जर आपण सरकारी नोकरीतून कायमपणा व सामाजिक सुविधा काढून टाकल्या तर लोक सरकारी नोकरीला अग्रक्रम देतील का? 

– एखाद्या सरकारी खात्यात आलेला चांगला अनुभव शेअर करा.

एक वाईट अनुभव देखील शेअर करा.

– आम्ही तुमची निवड का करावी?
– प्रशासकीय अधिकारी म्हणून तुमचे अग्रक्रम कोणते असतील?

– बाबा आमटेंसारख्या लोकांनी सरकारच्या बाहेर राहून चांगले काम केले. मग बाहेर राहून काम करणे चांगले नाही का?

– तुम्ही तयारी करता खाजगी शिकवणी वर्ग केले होते का? जर हो, तर ज्यांना ते करणे शक्य झाले नाही त्यांच्यावर अन्याय झाला असे वाटत नाही का? दोघांमध्ये समान स्तरावर स्पर्धा कुठे आहे? (Level playing field) 

– कोणती मूल्ये तुमच्यासाठी पवित्र आहेत? 

– समजा तुम्ही वरिष्ठ सरकार अधिकारी आहात. एखाद्या क्षेत्राबद्दल तुमच्या काही पक्क्या धारणा आहेत. पण सरकारने जे धोरण काढले ते तुमच्या मूल्यांच्या व दृष्टिकोनाच्या विरुद्ध आहे. अशावेळी तुम्ही काय कराल?

– तुम्हाला कशाने राग येतो?

– राग आल्यावर तुमचा आवाज चढतो का? 

– सरकारी सेवक म्हणून काम करताना तुमच्या विरुद्ध जाऊ शकतात अशा तुमच्या दोन दुर्बलता सांगा.

– तुमच्या बालपणी झालेल्या एखादा मजेशीर किस्सा आम्हाला ऐकवा. मग तो काहीही असो.

– तुम्ही आईकडून व वडिलांकडून आत्मसात केलेली एक गोष्ट सांगा.

– तुमच्या मित्रांची गणना करा. कठीण वाटते का? तुम्ही त्यांच्याबरोबर संपर्कात आहात का? 

– जर आम्ही तुमच्या जवळच्या मित्राला तुमच्या तीन चांगल्या व तीन वाईट गुणांबद्दल विचारले तर ते काय सांगतील असे तुम्हाला वाटते?

– प्रत्येकाला इच्छा असते की आपण व्यक्तिमत्वात काही ना काही बदल घडवून आणू. ‘मी जर असा असतो तर…’ तुम्हाला असे वाटते का?

– जबाबदारी पार पाडताना कोण प्रथम येते –  कुटुंब की समाज?

– तुम्ही तुमची इच्छांची यादी केली आहे का? (बकेट लिस्ट)

– कुठला रंग तुम्हाला आवडतो?

– पुढील प्रश्नांची उत्तरे हो/नाही मध्ये द्या. तुम्ही सायकल चालवता? स्कूटर? कार? स्वयंपाक करता? चहा? भांडण करता? तुम्ही मद्य सेवन करता का? मद्य सेवनाचे काही फायदे असतात का?

– असा एखादा प्रसंग सांगा की ज्याने तुमच्या पालकांना तुमचा अभिमान वाटला होता. तुमच्यात विशेष काय आहे?

– जेव्हा तुम्ही अभ्यास करत नसता तेव्हा काय करता?

– तुम्ही तणावातून मोकळे होण्यासाठी काय करता? (स्ट्रेस बस्टर)

– तुम्हाला प्रेरणा देणारी एखादी ओळ सांगा. त्या ओळीचा अर्थ सांगा.

– तुम्ही विचार प्रधान आहात की कृतीप्रधान?

– काही वेळा काहीच कृती न करणे हीच कृती असते का? 

– अंतर्मनातील द्वंद्व (crisis of conscience) काय असते?

– तुम्ही कधी त्याला सामोरे गेले आहात का? अशी एखादी घटना सांगा की ज्यामुळे तुम्हाला स्वतःची लाज वाटली. 

– तुम्ही मास्लोची स्वयंप्रेरण्याची थेअरी ऐकली आहे का?

– त्याच्या गरजाच्या उतरंडीमध्ये सनदी सेवक बनणे ही तुमच्या कुठल्या गरजांची पूर्तता आहे?

– मुकेश अंबानींनी त्यांची 1% संपत्ती तुम्हाला देऊ केली तर तुम्ही घ्याल का? 

गाडी चालक परवाना (driving licence)

तुम्ही ते कधी बनवला?

तुम्ही कोणत्या प्रक्रियेतून त्याच्यासाठी गेलात?

भ्रष्टाचार नव्हता? विचित्र वाटतं ऐकायला! तुम्ही ड्रायव्हिंग स्कूल मधून गेलात का?

सरकारी कार्यालयात भ्रष्टाचाराला का समोरे जावे लागते?

तुम्ही अधिकारी झाल्यावर या परवानापद्धतीत कोणते बदल घडवून आणल की ज्यामुळे भ्रष्टाचार कमी करता येईल?

नोकरशाही 

यशवंतराव चव्हाण म्हणत की नोकरशाहीने हो म्हणायला शिकले पाहिजे व राजकारण्यांनी नाही म्हणायला शिकले पाहिजे. आज उलटे झाले आहे असे वाटते का?  

रोल प्लेयिंग 
यात समजा तुम्ही पोलीस कमिशनर आहात ते अगदी मुख्यमंत्री आहात पर्यंत भूमिकेची रेंज असू शकते. त्या त्या भूमिकेत शिरून प्रतिसाद देणे अपेक्षित आहे. सामान्य नागरिक म्हणून दिलेला प्रतिसाद वेगळा व अधिकारी पदावरून ती परिस्थिती हाताळायची जबाबदारी शिरावर असताना दिलेला प्रतिसाद वेगळा. अधिकारी म्हणून काम करताना संविधानाचे पालन करायची जबाबदारी व त्याचवेळी कायदा व सुव्यवस्था यांना कायम राखायची जबाबदारी यांच्यात समतोल साधावा लागतो. आपण अशा प्रश्नांची काही उदाहरणे बघू.
– तुम्ही अधिकारी असलेल्या भागात एकाच वेळी दोन ठिकाणी आपत्ती निर्माण झाली. एका भागात आग लागली व दुसऱ्या भागात जातीय दंगली चालू झाल्या तर तुम्ही स्वतः कुठे जाल?
– अधिकारी म्हणून निवड करायची असेल तर तुम्ही कोणत्या सुधारणांना प्राधान्य द्याल. शिक्षण की आरोग्य की भ्रष्टाचार? (येथे चौथा पर्याय तयार करून त्यावर चर्चा करणे अपेक्षित नाही. या तीनपैकी एक निवडून त्याचे तुलनात्मक महत्व सिद्ध करायचे)
– तुम्ही एका बोटीतून नदीत प्रवास करीत आहेत. तुमच्या बरोबर तुमचा अनुभवी वरिष्ठ अधिकारी आहे व तुम्हाला ज्याने वाढवले तो वृद्ध नोकरदेखील आहे. अचानक बोट बुडू लागली. दोघांनाही पोहता येत नाही. कोणा एकालाच वाचवणे शक्य आहे. तर तुम्ही कोणाला वाचवाल?

– एक व्यक्ती तलावाच्या काठावरून चालत होती. अचानक त्याने बघितले की त्याची आई, पत्नी व मुलगी तलावात बुडत आहेत. तिघींनाही पोहता येत नाही. फक्त एक जीव वाचवता येईल. त्या व्यक्तीने कोणाचे प्राण वाचवले पाहिजे. (दिलेल्या प्रसंगाच्या चौकटीतच उत्तर अपेक्षित आहे. लोकांनां बोलावू, लाइफ जॅकेट फेकू, त्या व्यक्तीलादेखील पोहता येत नसेल तर अशा चर्चा करून पॅनलला इरिटेट करू नये)
– तुम्ही एखादया जिल्ह्याचे पोलीस प्रमुख आहात. मोठा मोर्चा निघाला आहे. तो मोर्चा हिंसक बनेल की नाही हे निश्चित सांगता येणार नाही. अशावेळी तुम्ही जास्तीची कुमक मागवून ठेवाल की ठेवणार नाही?
– जर तुम्हाला एका दिवसासाठी मुख्यमंत्रीपद देण्यात आले (नायक सिनेमातील अनिल कपूरप्रमाणे) तर तुम्ही त्या दिवसात कोणते निर्णय घ्याल?
– समजा तुम्हाला एका कायदेशीर कामासाठी एका राजकारणी व्यक्तीच्या मदतीची गरज आहे. तर तुम्ही त्या व्यक्तीची मदत घ्याल का?
– तुमचा एक सहकारी एका प्रकल्पात महत्वाची भूमिका पार पाडत आहे व त्याच्या कौशल्याची तो प्रकल्प उभारण्यासाठी नितांत गरज आहे. पण तुम्हाला लक्षात आले की सहकारी भ्रष्ट आहे. तुम्ही काय कराल?
– तुम्हाला एकाच वेळी अनेक पदांचा चार्ज देऊन ठेवला आहे. त्यामुळे तुमचे खाजगी जीवन अनियमित झाले आहे. शिवाय तुम्हाला त्या जास्तीच्या पदांचा कोणताही मोबदला मिळत नाही. तुम्ही काय कराल?

– तुमच्या सहकाऱ्यांनी पगार व इतर मागण्यांवरून संपाची घोषणा केली आहे. तुम्हाला ती कारणे पटलेली नाहीत. मग तुम्ही त्या संपात सहभागी होणार की नाही?समाजव्यवस्था1) महिलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढल्यामुळे  घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे का?२) ग्रामीण भागात शहरी भागापेक्षा कमी प्रमाणात बलात्कार होतात का?३) आपण पुन्हा समाजात एकत्र कुटुंबपद्धती आणायला हवी का?४) स्त्रीच स्त्रीची शत्रू असते का?५) लिंगभाव भेदभाव हाच लिंगभाग पूर्वग्रह असतो का? ( Is gender discrimination same as gender bias?)६) आपण लिंगभाव अलिप्त समाज उभारला पाहिजे की लिंगभाव समान समाज उभारला पाहिजे?७) लिंगभाव समानता हे एक मिथक आहे का?८) अरिस्टोटल म्हणायचा की ‘स्त्रीपुरुष समानता आलीच तर स्त्रियांचे वर्चस्व वाढेल’. तुमचे काय मत आहे? ९) ‘लिंगभाव संवेदनशीलता वाढवल्याने लिंगभाव समानतेकडे पाऊले पडेल’ यावर एक छोटे भाषण द्या. १०) अधिक संख्येने स्त्रिया प्रशासनात आल्या तर भ्रष्टाचार कमी होईल का? ११) ‘पुरुष मंगळावरचे तर स्त्रिया शुक्रावरील असतात’ हे खरे आहे का? (Men are from mars and woman are from Venus’)  १२) गृहिणीचे देशाच्या GDPत योगदान असते का? १३) गृहिणीला तिच्या कामाचे वेतन दिले जावे का? मातृत्व या पदासाठी सर्वाधिक वेतन असावे का? १४) जर एक मूल धोरणाने लिंग प्रमाण बिघडत असेल तर आपण दोन मूल धोरण प्रोत्साहित केले पाहिजे का?१५) दक्षिण भारतात लिंगप्रमाण का घसरत आहे?  १६) भारतीय स्त्रिया एक वर्ग आहेत का? १७) “बेटी बचाव, बेटी पढाओ” कितपत यशस्वी आहे? 

अर्थभान 
१) भारताचे राष्ट्रीय उत्पन्न (GDP) मोजमाप करण्यात सध्या कोणते वाद निर्माण झाले आहेत?
२) घाऊक मूल्य वर्धित उत्पन्न (GVA) आणि जी. डी. पी. ची मोजणी यात काय फरक आहे?
३) जगदीश भगवती व अमर्त्य सेन यांच्या अर्थशास्त्रीय विवेचनात कोणते मूलभूत फरक आहेत?
४) उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण या संकल्पनांचा आपापसात काय संबंध आहे?
५) वस्तूंचा व्यापार आधी खुला केला पाहिजे की सेवांचा?
६) जग जागतिकीकरणाकडे पाठ फिरवत असताना भारताने पुढाकार घेऊन जागतिकीकरणाला चालना दयावी का?
७) दुसऱ्या पिढीच्या सुधारणांना सुरवात झाली आहे का? तिसऱ्या पिढीच्या सुधारणा कोणत्या असतील?
८) नवउदारमतवाद काय असतो? भारताने समाजवादी अर्थव्यवस्थेला सोडचिठ्ठी दिली आहे का?
९) मिश्र अर्थव्यवस्था कालबाहय झाली आहे का?
१०) आर्थिक पुढाकार घेण्यात भारताने चीनशी बरोबरी साधली पाहिजे की दुय्यम भूमिका निभावली पाहिजे?

११) भारतीय रुपया सध्या का मजबूत होतो आहे? त्याचे कोणते संभाव्य परिणाम होऊ शकतात?
१२) बँकांची वाढती बुडीत कर्जाची समस्या कशी सोडवता येईल?
१३) चौथी उद्योगिक क्रांती सुरु झाली आहे का? पहिल्या तीन कोणत्या होत्या?
१४)  कृत्रीम बुद्धिमत्तेमुळे जर रोजगार निर्मितीवर परिमाण होणार असेल तर आपण त्याकडे पाठ फिरवली पाहिजे का? अत्याधुनिक तंत्रज्ञानाला स्वीकारले पाहिजे की विरोध करायला हवा?
१५) सुवर्ण ठेव योजना यशस्वी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील?
१६) आर्थिक समावेशनाचे कोणते प्रयत्न सध्या चालू आहेत?
१७) वैश्विक किमान उत्पन्न (UBI) ही संकल्पना राबवायची वेळ आली आहे का?
१८) भारताने स्वतःची रेटींग एजन्सी स्थापन करायची वेळ आली आहे का? पाश्चात्य रेटींग कंपन्यांनी भारताबद्दल पूर्वग्रह बाळगला आहे का?
२०) आपण विविध देशांशी व्दिपक्षीय व बहुपक्षीय करार करून व्यापाराला प्रोत्साहन दिले पाहिजे की जागतिक व्यापार संघटनेसारख्या वैश्विक व्यासपीठावरून व्यापारवाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत?
२२) निती आयोगाने नियोजन आयोगाची पोकळी यशस्वीरीत्या भरून काढली आहे का?
२४) भारताला पूर्णपणे रोखविरहित अर्थव्यवस्था बनणे शक्य आहे का?
२६) काळ्या पैशावर निर्णायक विजय मिळवता येतो का?
२७) धनविधेयक व वित्त विधेयक यात काय फरक असतो?
२८) चलनविषयक धोरण समितीमुळे रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता धोक्यात आली आहे असे वाटते का?
२९) पायाभूत सुविधांच्या उभारणीला चालना देण्यासाठी कोणत्या गोष्टी करता येतील?
३०) तुमच्या मतानुसार भारताच्या पाच प्रमुख आर्थिक समस्या कोणत्या आहेत?
३१) संपूर्ण गरीबीचे उच्चाटन शक्य आहे का?
३२) भारत श्रीमंत झाल्यावर गरीबीवर मात करू शकेल की गरिबीवर मात केल्यावर भारत श्रीमंत होईल?

राजतंत्र 
१) भारतासारख्या अर्धसामंतीय समाजाला लोकशाही योग्य पद्धती आहे का?
२) भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये लोकशाही अस्थिर असताना भारत कितीकाळ लोकशाहीचा प्रयोग टिकवू शकेल?
३) राजकीय लोकशाहीला जास्त महत्व दिले पाहिजे की आर्थिक लोकशाहीला?
४) राज्यघटनेचा कुठला भाग ही भारतीयांची देणगी आहे?
५) राज्यघटनेला ‘राष्ट्रीय पुस्तक’ म्हणून घोषित केले पाहिजे का?
६) सकारात्मक व नकारात्मक मूलभूत अधिकार कोणते आहेत? कायदेशीर, मूलभूत व मानवी हक्कांमधील फरक सांगा.
७) लोकशाहीची तूट ही संकल्पना काय असते?
८) नक्षलवाद्यांची ‘नवी लोकशाही क्रांती’ ही संकल्पना काय आहे?
९) भारतात आपण संविधानिकदृष्ट्या धर्मनिरपेक्षतेचे तत्व पाळतो की सर्वधर्मसमभाव तत्व आचारतो की दोन्ही?
१०) भारतातील धर्मनिरपेक्षता पश्चिमेतील धर्मनिरपेक्षतेपेक्षा वेगळी आहे का? असल्यास कोणता फरक आहे?
११) प्रांतवाद (regionalism) आणि प्रांतिकवाद (provincialism) एकच आहेत का? भारत त्यापैकी कशाने ग्रस्त आहे?
१२) अमेरिकेत जशा पक्षांतर्गत निवडणूका घेतात (प्रायमरीज) तशा भारतात सक्तीच्या केल्या पाहिजेत का?
१३) देशात शॅडो कॅबिनेट पद्धत चालू करणे कितपत योग्य ठरेल?
१४) नागरी समाज काय असतो? भारतात त्याची वाढ झाली आहे का?
१५) सोशल मिडियाला लोकशाही राज्यव्यवस्थेत काही भूमिका दिली पाहिजे का?
१६) ओपिनियन पोलवर बंदी घातली पाहिजे का?
१७) खाप पंचायतींवर काय उपाय करता येईल? त्यांना न्यायव्यवस्थेत स्थान दिले पाहिजे का?
१८) जमातवाद व भ्रष्टाचार यात जास्त गंभीर समस्या कोणती?
१९) केंद्र व राज्य यांच्या निवडणूका एकाचवेळी घेतल्या पाहिजेत का? फायदे-तोटे कोणते असतील?
२०) सर्वात जास्त मते तो उमेदवार जिंकतो (फर्स्ट पास द पोल) या पद्धतीचे कोणते तोटे आहेत?
२१) भारतात खूप जास्त राजकीय पक्ष आहेत ही भारतीय लोकशाहीची कामगिरी आहे की अपयश?
२२) प्रातिनिधिक लोकशाहीऐवजी थेट लोकशाही प्रस्थापित केली पाहिजे का? का सहभागी लोकशाही सध्या पुरेशी आहे?
२३) यापुढे महत्वाच्या मुद्दयांवर (उदा. खाण प्रकल्प) स्थानिकांचे जनमत घेतले पाहिजे का?
२४) न्यायपालिकांनी कार्यकारी पालिकेच्या अधिकारांवर अतिक्रमण केले आहे अशी टीका करणे योग्य ठरेल का?
२५) न्यायाची प्रस्थापना करणे म्हणजे काय?
२६) पर्यायी न्याय पद्धती कोणत्या आहेत? त्यांना मुख्य पद्धतीमध्ये सामावून घेतले पाहिजे का?
२७) राज्यपालांचे पद रद्द केले पाहिजे का?
२८) राज्यसभेच्या वर्चस्वाला ‘निवडणूकीत हरलेल्यांचा जुलूम’ असे वर्णन करता येईल का?
२९) पुढील विधान उलगडून दाखवा,’व्यक्तीला आत्मा असतो, पण राज्य मात्र आत्मविरहीत यंत्र असते’.
३०) महिला आरक्षण विधेयकाची गाडी कुठे अडली आहे?
३१) अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भारतामध्ये गैरवापर होतो आहे का? त्यावर बंधने आणायची गरज आहे का?
३२) छोटी राज्ये प्रशासनासाठी सोयीची असतात की मोठी राज्ये? दुसरा राज्य पुनर्रचना आयोग स्थापन करण्याची गरज आहे का?
३३) देशद्रोह कशाला म्हणावे?
३४) जगात विचारसरणींवर आधारीत संघर्ष कमी होऊन राष्ट्रवादावर आधारीत संघर्षांमध्ये वाढ झाली आहे असे दिसून येत. त्याची कोणती कारणे असावीत?
३६) भारतीय राज्यव्यवस्थेला असलेले प्रमुख धोके कोणते आहेत?

निवडणूका
१) भारतातील राजकीय पक्षांमध्ये अंतर्गत लोकशाहीचा अभाव आहे का ? त्यात कशा प्रकारे सुधारणा घडवून आणता येईल?
२) पक्ष महत्वाचा असतो की व्यक्ती? लोकांनी कोणाकडे पाहून मतदान करावे?
३) ज्याप्रकारे पक्षांतरे होत असतात ते बघता विचारसरणी दुय्य्म होत चालली आहे असे म्हणता येईल का?
४) ओपिनियन पोल – त्यांच्यावर बंदी घालायची गरज आहे का?
५) प्रादेशिक पक्षांना काही भवितव्य आहे का?
६) आपण USA सारखे द्विपक्षीय लोकशाहीत रूपांतरित होऊ का?
७) शैक्षणिक संख्यामध्ये निवडणूक व्हाव्यात का?
८) त्यात राजकीय पक्षांना सहभाग नोंदवू शकतात का?
९) विद्यार्थांनी राजकारणात उतरावे का?
१०) केंद्र व राज्याच्या निवडणूका एकाच वेळी घेण्याची कल्पना कशी आहे? (एक राष्ट्र, एक निवडणूक)
११) निवडणूक रोख्यांमुळे निवडणूक निधीच्या कारभारात पारदर्शकता आली आहे का?
१२) सत्ताधारी पक्षालाच सर्वात जास्त निधी जिकण्यामागे रहस्य काय?
१३) मतदान कार्ड आधाराला जोडण्याची गरज आहे का? त्यामुळे दुहेरी मतदान किंवा खोट्या मतदानास आळा घातला येईल का?
१४) मतदानाची सक्ती करायला हवी का? मतदानासाठी साक्षरतेची अट घालायला हवी का?
१५) मतदान करणे हा संविधानिक अधिकार आहे की कायदेशीर?
१६) धार्मिक नेत्यांना राजकीय पदे घेण्यावर बंदी घातली पाहिजे का?
१७) सद्य काळात असे नेते लोकशाही मार्गाने पदांवर येत आहेत ज्यांचा लोकशाही व्यवस्थेवर विश्वास नाही . असे का होते आहे?
१८) आदर्श आचारसंहितेचे रूपांतर आपण कायदयात करायला हवे का?
१९) निवडणूक-पूर्व युतीचे पालन निवडणुकीनंतरही झाले पाहिजे असा कायदा करणे आवश्यक आहे का?

विज्ञान व तंत्रज्ञान 

सध्या मुलाखतीला येणारे बहुसंख्य उमेदवार हे अभियांत्रिकी किंवा इतर एखाद्या विज्ञान विषयाच्या पार्श्वभूमीचे असतात. त्यामुळे मुलाखतीत तांत्रिक स्वरूपाचे प्रश्न येण्याची शक्यता असते. या प्रश्नातून तुम्ही तुमच्या शिक्षणात किती रस घेतला हे दिसते. 

विज्ञानाशी संबंधित प्रश्न

१) भारतात लोक विज्ञानाला जास्त महत्व देतात की तंत्रज्ञानाला, की दोघांनाही सारखे महत्व दिले जाते?

२) मूलभूत संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी काय करता येईल?

३) विज्ञानामुळे आध्यात्मिकता कमी होते आहे का?

४) ‘वैज्ञानिक अंधश्रद्धा’ काय असतात?

५) विज्ञान व शास्त्र एकच आहे का? शास्त्र महत्वाचे की विज्ञान की दोन्ही?

६) विज्ञान न-नैतिक असते का? युद्धात होणाऱ्या महासंहाराला शास्त्रज्ञांना दोषी ठरवता येईल का?

७) खिळा आहे. खिळ्यावर गंज चढला तर वजन वाढेल की कमी होईल? 

तंत्रज्ञानाशी संबंधित प्रश्न

१) तंत्रज्ञानावर खूप जास्त भर दिला तर माणसाच्या विचारशक्तीवर परिणाम होईल का?

२) ‘जुगाड’ तंत्रज्ञान हा प्रकार प्रगतीला पोषक आहे का?

३) महाजालाची तटस्थता (नेट न्यूट्रॅलिटी) काय आहे?

४) भारत संगणक क्षेत्रात आघाडीला असूनही भारताला स्वतःची ऑपरेटिंग सिस्टिम का विकसित करता आलेली नाही?

५) सायबर दहशतवाद काय असतो?

६) सोशल मिडीयावर सेन्सॉरशिप लावली पाहिजे का?

७) जॅम त्रिमूर्ती – कशा प्रकारे काम करते?

८) इंटरनेट ऑफ थिंग्स, वेब दोन हे काय आहेत?

९) सुप्त तंत्रज्ञान (embedded) काय असते?

१०) नियर फिल्ड तंत्रज्ञान काय आहे? लाय-फाय, व्हाईट फाय काय असते?

११) यू. पी. आय., काम करते? तुम्ही ते वापरून बघितले आहे का?

१२) भारताने ई-गव्हर्नन्सला प्राधान्य दयावे की एम-गव्हर्नन्सला?

१३) सी. एफ. एल. चांगले तंत्रज्ञान आहे की एल. ई. डी.?

१४) ३D प्रिंटिंग तंत्रज्ञान कसे काम करते? त्यातून कोणत्या शक्यता आहेत?

१६) कामगारांना काढून तेथे रोबोटला कामाला लावले पाहिजे का? रोबोटवर आयकर लावला पाहिजे का?

१७) व्हाट्सअपला महसूल कसा मिळतो?

१८) F१६ विमाने चांगली आहेत की राफेल?१९) ई. व्ही. एम. मशीनला चकवता येते का? पुन्हा मतपेटीकडे गेले पाहिजे का?

महिलांना अपेक्षित प्रश्न 

– तुम्ही साडी का घातली आहे? (व्यावसायिक दिसण्यासाठी)

– मग फोटोमध्ये का नाही? (नसल्यास) 

– महिला प्रशासनात आल्याने भ्रष्टचार कमी होईल का?
– महिला अधिकाऱ्याच्या निर्णय प्रक्रियेत पुरुष अधिकाऱ्याच्या निर्णयप्रक्रियेपेक्षा फरक पडतो का? पडत असल्यास कोणता?
–  महिला आरक्षणाची गरज आहे का?

– काम व आयुष्य यांची सांधेजोड कशी कराल?
– तुम्हाला तर दुर्गम जागी पोस्टिंग दिले तर काम करायला जाल का?

 – महिला भावनाशील असतात का? त्यामुळे कामावर परिणाम होतो का?

 – त्या भावनाशीलतेचा प्रशासनात फायदा कसा करून घेता येईल?

– महिला बहूकामी (मल्टी टास्किंग) असतात. त्यामागे काही वैज्ञानिक कारण आहे का?

– त्याचा प्रशासनात कशाप्रकारे वापर करून घेता येईल?-  लिंग व लिंगभाव (जेंडर) यात काय फरक असतो?
–  लिंगभाव असमानता ही महिलांच्या प्रगतीला बाधक ठरते का?
– कोणत्या महिलेला तुम्ही आपला आदर्श मानता.
–  मातृसत्ताक समाज आपण पुनर्प्रस्थापित करायला हवा का?
–  गृहिणीला तिच्या कामाबद्दल पगार दिला जावा का?
– ग्रामीण भागातील महिलांना उपयोगी ठरू शकेल असे एखादे यंत्र सुचवा.

– कंपन्यांच्या बोर्डावर महिलांना संचालक म्हणून नेमल्याने अर्थव्यवस्थेत काही फरक पडेल का? उत्तर हो असेल तर कोणता?

 – काचेचे छप्पर निर्देशांक (ग्लास सिलिंग इंडेक्स) काय असतो?

 – कंपन्या महिलांना आपल्या संचालक मंडळावर घ्यायला नाखुश का असतात? (हा पुरवठ्याचा मुद्दा आहे की दृष्टिकोनाचा)

– महिला संचालक बोर्डावर असण्याची काय गरज असते?

– महिला असल्याने तुम्ही निर्णय प्रक्रियेत कोणत्या प्रकारे बदल घडवून आणू शकाल?

– समाज सर्व प्रशासन स्तरावर, अगदी कारकून ते मुख्यमंत्री महिला आहेत. अशावेळी निर्णय प्रक्रिया कशी असेल? 

– महाराष्ट्रातून एकही महिला मुख्यमंत्री का झाली नाही?

– रितीभातींचा भार महिलांवर जास्त असतो का? त्या आवडीने ते करतात का? 

– हा त्यांच्या समाजातील भूमिकेचा भाग असतो का? 

– पर्यावरणीय स्त्रीवाद काय आहे? उदाहरणासह स्पष्ट करा.

– घरगुती हिंसाचाराची समस्या आपण कोणत्या प्रकारे हाताळाल?

 – भावनिक हिंसाचार काय असतो?

– मुलींचे शिक्षण वाढल्याने आर्थिक उत्पन्न देखील वाढले आहे. परिणामी घटस्फोटाचे प्रमाण देखील वाढते आहे. हे प्रमाण कमी कसे करता येईल? 

– भारतीय सैन्यदलाने महिलांना युद्धरेषेवर (वॉर फ्रंट) उतरवण्याचे ठरवले आहे. याबद्दल तुमचे काय मत आहे?

– ‘माय लाईफ, माय रूल्स’ बद्दल तुमचे काय मत आहे?

–  पर्यावरणीय स्त्रीवाद काय असतो?

– ‘राईट टू पी’, ‘हॅपी टू ब्लीड’ या चळवळी कशाबद्दल आहेत?- ‘मी टू’ चळवळीचा काय फायदा झाला?

– सार्वजनिक नालस्ती करण्याने (पब्लिक शेमिंग) पुरुष सार्वजनिक जीवनात जास्त जबाबदारीने वागतील का? 

– तुम्ही ‘नारी’ पोर्टल पाहिले आहे?

– SHe बॉक्सचा वापर केला आहे का? खाजगी पण जपण्याचा अधिकार महिलांना कशा प्रकारे सक्षम करतो?

सक्षमीकरण

– चंदा कोचर, शिखा शर्मा, चित्रा रामकृष्ण या महिला अतिसक्षमीकरणाचे उदाहरण म्हणता येईल का?

– महिलांचे सक्षमीकरण (एम्पॉवरमेंट) आणि समानाधिकार (emancipation) यात काय फरक असतो? उदाहरणे देता येतील का? कोणाला प्राधान्य दिले पाहिजे?

– महिला सक्षमीकरणात पुरुषांचा सहभाग आवश्यक आहे का?

– तंत्रज्ञानाचा महिलांवर काय परिणाम झाला आहे?

– राज्य महिला आयोग – सनद, सध्याच्या अध्यक्षा, कामाचे स्वरूप, न्यायदानाचे अधिकार आहेत का?

– महिला दक्षता समिती, ग्रामभगिनी, दामिनी पथक, शक्ती विधेयक 

– भारतीय परंपरेतील शक्ती संप्रदायाकडे तुम्ही कसे पाहता?

– महिलांविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यांसाठी ‘महिला अत्याचार’ (woman atrocity) घोषित केले पाहिजे का?

– तुमच्यासाठी जास्त प्रेरक कोण आहे – आई की वडील?

– समजा तुम्ही व तुमचा नवरा कमावते आहात. पण तुमचा नवरा तुम्हाला घरकामात मदत करीत नाही. यावर काय उपाय करता येईल?

अभियांत्रिकी :-
१) अभियांत्रिकीची व्याख्या कशी कराल?
२) आपण भारतात दर्जेदार अभियंते निर्माण करतो का?
३) जसे प्रत्येक मेडिकल कॉलेज एखादया दवाखान्याशी जोडलेले असते तसे प्रत्येक अभियांत्रिकी महाविदयालय एखादया उद्योगाशी जोडून घेतले पाहिजे का?
४) अभियांत्रिकी पदवीधरांनी सहा महिने उद्योगामध्ये इंटर्न म्हणून काम करावे हा निर्णय योग्य आहे का?
५) चांगल्या अभियंत्याचे गुण कोणते असतात?
६) BE आणि B.Tech यात काय फरक असतो?
७) IIT/JET परीक्षेची संरचना कशी असावी?
८) अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी कोणते योगदान दिले?
९) अभियांत्रिकीचे विदयार्थी फुटबॉल पहाण्यात जास्त रस का घेतात?
१०) तुम्ही चेतन भगतचे “फाईव्ह पॉईंट समवन” हे पुस्तक वाचले आहे का? त्याचे मर्म काय आहे?

इलेक्ट्रानिक्स  व टेलीकम्युनिकेशन
१) मानवजातीच्या इतिहासात इलेक्ट्रानिक्स ही तिसरी क्रांती मानली जाते. उलगडा करा.
२) ‘राष्ट्रीय इलेक्ट्रानिक्स धोरण’ २०१९ च्या तरतुदी काय आहेत?
३) निर्वात पोकळीमध्ये इलेक्ट्रान्स असू शकतात का?
४) प्लाझमा स्थितीत इलेक्ट्रान्स असतील, तर त्यांना इलेक्ट्रान्स म्हणता येईल का?
५) बायो-चिप्स या इलेक्ट्रानिक सर्किटपेक्षा चांगले काम करू शकतील का?
६) ड्रग डोपिंग व इलेक्ट्रानिकमधले डोपिंग यात काय फरक आहे?
७) कृत्रिम चंद्र कसा कार्य करतो?
८) दीर्घ काळात भारतीय दूरसंचार क्षेत्रात कोणते तंत्रज्ञान सफल होईल, CDMA की GSM?९) दूरसंचार मनोऱ्यामुळे आरोग्यावर घातक परिणाम होतो का?१०) मनोऱ्यांमुळे चिमण्या कमी झाल्या आहेत का?११) जिओने आपल्या सेवेसाठी कोणते तंत्रज्ञान वापरले आहे?१२) LTE तंत्रज्ञान कसे काम करते?१३) भारताला कॉल ड्रॉपची समस्या का भेडसावते आहे?१४) ४G आणि ब्रॉडबॅण्ड यात काय फरक असतो?१५) ५G मनोरे फारतर २५० फुट परिसरात सेवा देतात, मग ते कशाप्रकारे स्वस्त पडतात?१६) ५G चे पाच घटक कोणते?१७) ५G चा पक्ष्यावर घातक परिणाम होईल का? १८) ५G आयात करण्याऐवजी भारत स्वतः निर्मिती करू शकतो का? १९) मोबाइलच्या हँडसेटप्रमाणे फ्रिक्वन्सीला दिला जाणारा प्रतिसाद बदलतो का? २०) एन्क्रिप्शन काय असते?२१) त्यामागे कोणते तंत्रज्ञान आहे?२२) संपर्क साधनांमध्ये क्लोज लूप व ओपन लूप काय असते?२३) संपर्क जाळ्यात फीडबॅक सिस्टम काय असते?२४) GAGAN आणि IRNSS यात काय फरक आहे?२५) IRNSS ची प्रगती कुठवर आली आहे?

मॅकनिकल अभियांत्रिकी१) कॉम्प्रेसर काय असतात? ते भारतात का बनवले जात नाहीत? २) जर्मन लोक यंत्र अभियांत्रिकीत विशेष पारंगत का असतात?३) भारतात बुलेट ट्रेन बनवणे शक्य आहे का? ४) जर पेट्रोल कार डिझेलपेक्षा चांगल्या असतील तर आपण डिझेलवर बंदी का आणू नये?५) ‘क्वांटम यांत्रिकी’ काय असते? क्युबिट्स काय असतात?६) थर्मोडायनॅमिक्सचे कायदे कोणते आहेत?७) ऑक्टेन क्रमांक व सिटेन क्रमांक यात काय फरक असतो? ८) IC इंजिन कसे काम करते?९) गिअरचा पीच काय असतो?१०) SI आणि CI इंजिनमध्ये काय फरक असतो?११) शेतीचे यांत्रिकीकरण कसे साध्य करता येईल?१२) नेहमीच्या गाड्यांपेक्षा टेस्लाची गाडी कशी वेगळी असते?१३) हायब्रिड कारसाठी लागणारी लिथियम बॅटरी भारतात उत्पादीत होते का?१४) एनट्रॉपी काय असते? एनत्थापि काय असते? दोघांमध्ये काय फरक असतो?१५) चालणाऱ्या जहाजावर कुठल्या प्रकारचे दबाव (Forecs) कार्यरत असतात? १६) गायरोस्कोप काय असतो? तो कुठे वापरला जातो? १७) EVM ला बिघडवता येते का? १८) ड्रम ब्रेक चांगले असतात की डिस्क ब्रेक चांगले असतात?  १९) यंत्रांची देखभाल चांगल्या प्रकारे होते आहे हे कसे सांगता येईल?२०) रोबोटिक्स संदर्भात असिमोव्हचे तीन नियम कोणते? सायबोर्ग काय असतो?२१) पीचींग व रोलिंगमध्ये काय फरक असतो? २२) रेफ्रीजरेशन पद्धती कशी काम करते? २३) व्हेलोसिटीचा दर काय असतो? २४) यंत्र मानवी व मानवी जीवन यांत्रिक होत असे तुम्हाला वाटते का? 

जन्म वर्ष
१९७० – राहुल गांधींबरोबरच तुमचे जन्मवर्ष आहे. तुमच्या व त्यांच्या करियरची तुलना करा.
             गरिबी हटाव हा एक जुमला होता का?
१९७१ – भारताला युद्ध हवे होते की भारत या वर्षात युद्धात खेचला गेला?
१९७४ – असंतोषाचे वर्ष – कसे?
१९८१ – धोनी व तुमचे जन्मवर्ष एकच. सागरसम्राट ही तेलविहीर चालू झाली.
१९८२ – नाबार्डची स्थापना. सी. डी. देशमुख व विनोबा भावे यांचा मृत्यू
१९८३ – भारताने क्रिकेट चषक ज़िकला
१९८४ – आपरेशन ब्लू स्टार, भोपाळ वायू दुर्घटना, आशियाड, “नाम”चे अधिवेशन
१९८५ – पक्षांतरबंदी कायदा
१९८६ – शाहबानो खटला, ऑपरेशन ब्लॅक थंडर, पर्यावरण संरक्षण कायदा, ग्राहक संरक्षण कायदा
१९८७ – देवराला सती घटना, श्रीलंकाशी शांतता करार, गोवा राज्याची स्थापना
१९८८ – उदयोग धोरण – उदारीकरणाची देशात सुरुवात
            सेबी, राष्ट्रीय गृह बँक यांची स्थापना
            मतदानाचा वयोगट वाढवला
            तुम्ही विराट कोहलीबरोबर जन्मलात
१९८९ – बर्लिनच्या भिंतीचे पतन, बदलाची लाट, त्याचा भारतावर काय परिणाम झाला?
          – बोफोर्स घोटाळा काय होता? तो खटला आपल्या तार्किक परिणितीपर्यत एवढया वर्षात का पोहचु
             शकलेला नाही?
          – तुम्ही स्वतः ला उदारीकरणपूर्व काळातील व्यक्ती मानता की उदारीकरण नंतरच्या काळातील व्यक्ती?
          – आघाडीच्या सरकारांची देशात सुरुवात, ही सरकारे प्रगतीला पूरक ठरली की त्यांनी निर्णयप्रक्रियेला
             खीळ घातली?
१९९० – भारत व जगासाठी उलथापालथींनी भरलेले वर्ष – प्रस्थापित विरोधी लाट
         – याकाळात सरकारे अस्थिर झाली की राज्यसंस्था की दोन्ही?
१९९१ – वादळाचा केंद्रबिंदू
         – नवे आर्थिक धोरण  – समाजवादाला सोडचिठ्ठी?
         – या वर्षाला ‘भारताच्या आर्थिक स्वातंत्र्याचे वर्ष’ म्हणता येईल का?
          – राजीव गांधींची हत्या  – लिट्टेची घोडचूक ठरली का?
         – आखाती युद्ध  – जग एकध्रुवीय दिशेने
१९९२ – बाबरी मशिदीचे पतन
         – आर्थिक सुधारणा पर्वाची सुरुवात
         – पूर्वेकडे बघा धोरण
         – ७३ व ७४ घटनादुरुस्ती – तिने घडवून आणलेले परिवर्तन
१९९३ –  रूपयाचे दोनदा अवमूल्यन – अर्थव्यवस्था दोलायमान
             मुंबईत बॉम्ब हल्ले, लातूरचा भूकंप
१९९४ – हम आपके है कौन – सुधारणा नंतरच्या काळातील सिनेमाचा उदय
            सुश्मिता व ऐश्वर्या यांना मिस वर्ल्डचा ‘किताब
१९९५ – तुमच्या जन्म इंटरनेट व WTO समवेत झाला आहे. दोन्ही जागतिकीकरणाचे वाहक
१९९६ – वाजपेयी यांचे पहिले सरकार. येणाऱ्या युगाची चाहूल?
१९९७ – आशियाई संकट, भारतीय राजकारण पेचप्रसंगाकडे

१९९८ – पोखरण – त्यानंतर चाचण्या का घेतल्या नाहीत? 

बहिणाबाई चौधरी
– त्यांनी मराठीत लेखन केले की अहिराणीत?
– त्या साक्षर होत्या का?
– संत बहिणाई कोण होत्या?
– गावगाडयात चौधरी या पदाची कर्तव्ये कोणती होती?

जीजाबाई
१) जीजाबाईनी स्वराज्य स्थापनेत रस का दाखवला?
२) संपूर्ण महाराष्ट्राला व त्यातील भौगोलिक विभागांना व्यापणारे त्यांचे जीवन कसे होते?
३) जीजाबाईचे महाराष्टातील दुसरी एक राणी गौतमी हिच्याशी काय साम्य आहे?

शिवाजी महाराज 
१) राजे धर्मनिरपेक्ष होते की सर्वधर्मसमभावावर विश्वास ठेवणारे होते?

२) त्यांचे हिंदवी स्वराज’ ही राष्ट्रवादाची अभिव्यक्ती होती का?
३) विविध व्यापारी पेठांची लूट त्यांनी का केली?
४) गनिमीकावा हा लढाईचा प्रकार कसा जन्माला आला?

५) महाराजांची कोणती गोष्ट तुम्हाला सर्वाधिक भावते?

गोपाळ कृष्ण गोखले
१) त्यांना भारत व पाकिस्तानचे राष्ट्र पितामह असे म्हणायला हवे का?
२) त्यांचा कुठला गुण खास होता?
३) भारत सेवक समाजाचे योगदान कोणते?
४) गांधींनी त्यांचे वर्णन कुठल्या शब्दांत केले आहे?
५) आपण त्यांचा वारसा विसरत चाललो आहोत का?

लोकमान्य टिळक
१) त्यांनी मांडणी केलेला “सांस्कृतिक राष्ट्रवाद” काय होता?
२) “लोकमान्य” असणे ही त्यांची ताकदपण होती पण दुबळेपणापण. असे म्हणता येईल का?
३) लखनौ करार हे मुस्लिमांप्रती अनुययाच्या धोरणाचे उदाहरण आहे का?
४) प्रतियोगी सहकारिता ही कल्पना काय होती?

तुकडोजी महाराज
१) त्यांचे खरे नाव काय होते?
२) त्यांना “राष्ट्रसंत” कोणी म्हटले व का?
३) त्यांचे स्वातंत्र्य योगदान कोणते?४) ग्रामगीता या पुस्तकाचे काय वैशिष्ट्ये आहे? 
गाडगेबाबा १) त्यांचे खरे नाव कोणते?२) त्यांनी स्वच्छतेवर भर का ठेवला?३) त्यांनी स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतला का?४) त्यांनी धर्मशाळा का उभारल्या?
लोकनायक बापूजी अणे १) त्यांना लोकनायक असे का म्हणतात? २) ते कोणत्या पक्षाशी संबंधित होते?३) त्यांनी वेगळ्या विर्दभाला पाठींबा दिला होता का? 
स्वामी दयानंद सरस्वती १) त्यांचे खरे नाव काय होते?२) त्यांचा आर्यसमाज हा “आक्रमक हिंदूवाद” होता की हिंदू धर्मा विरुद्ध केलेले बंड होते? ३) दयानंद यांना वर्णव्यवस्थेची उतरंड मान्य होती का? ४) आर्यसमाजाला मूर्तीपूजेचा बिमोड करता आला का? ५) त्यांच्या शुद्धी चळवळीचा काय फायदा/तोटा झाला? 
स्वामी रामानंद तीर्थ १) त्यांचे खरे नाव काय होते?२) रामानंद आर्यसमाजाचे सदस्य होते का?३) त्यांचे हैद्राबाद मुक्तीसंग्रामात कोणते योगदान आहे?४) रामानंद यांनी मराठवाडा महाराष्टाला जोडताना अटी घातल्या का? 
महात्मा फुले १) त्यांना ‘महात्मा’ का म्हटले गेले?२) रोजच्या जीवनात सत्यधर्माचे पालन करणे शक्य आहे का?३) महात्मा फुले यांना भारतरत्न दिले जावे का?४) फुले यांची कोणती गोष्ट आज सर्वाधिक महत्वाची मानता येईल?
सावित्रीबाई फुले १) त्याचे स्रियांच्या आधुनिकीकरणात योगदान कोणते?२) सावित्रीबाई यांच्या वाड्मयीन कृती कोणत्या?३) ३ जानेवारी काय म्हणून साजरा केला जातो?
राजर्षी शाहू?१) शाहूंना ‘राजर्षी’ ही पदवी कोणी दिली? त्या पदवीचा अर्थ काय?२) शाहू हे फुले व डॉ  आंबेडकर यांच्यातील दुवा होते असे कसे म्हणता येईल?३) डॉ आंबडकरांनी शाहूंचे वर्णन ‘सामाजिक लोकशाहीचा आधारस्तंभ’ असे का केले?
राणी लक्ष्मीबाई १) मूळ नाव मणिकर्णिका होते. ते तसे का ठेवले?२) लक्ष्मीबाई  क्रांतिकारक होती का?३) ती राष्ट्रांसाठी लढली की झाशीसाठी?४) तिच्या दत्तक मुलाचे नाव काय होते?
भाऊराव पाटील १) त्यांना कर्मवीर असे का म्हणतात?२) “कमवा व शिका” हा पर्याय आज योग्य ठरेल काय?३) त्यांचे श्रमाला प्रतिष्ठा मिळवून द्यायचे ध्येय साध्य झाले का?४) आजची रयत शिक्षण संस्था त्यांचे मूळचे आदर्श पालन करीत आहे का? 
डॉ आंबेडकर १) ब्राह्मणी शक्तींनी त्यांच्याकडून राज्यघटना लिहून घेतली व नंतर काम होताच बाजूला सारले असे म्हणता येईल का?२) डॉ आंबेडकरांची सामाजिक लोकशाही ही संकल्पना काय होती? ती कशी प्रत्यक्षात आणता येईल?३) डॉ  आंबडेकर समाजवादी विचारांचे होते का?४) काँग्रेसने त्याचा घटनासमितीवरील प्रवेश रोखून धरण्याचा प्रयत्न का केला?
वि. दा. सावरकर १) त्यांना भारतरत्न दिले जावे का?२) त्यांनी तुरुंगात किती वर्षे काढली?३) त्यांना ‘माफीवीर’ म्हणणे योग्य आहे का?४) सावरकरांचे हिंदुत्व व मोदीत्व एकच आहे का?५) गांधीहत्येमध्ये सावरकरांचा सहभाग होता का?
यशवंतराव चव्हाण १) कोणती भूमिका सर्वात चांगली झाली? सातारा प्रतिसरकारचे प्रमुख की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री की देशाचे गृहमंत्री की देशाचे संरक्षणमंत्री की वित्त आयोगाचे प्रमुख?२) त्यांना पंतप्रधान का बनता आले नाही? त्यांनी प्रयत्न केला होता का?

३) केव्हा उपपंतप्रधान होते?

४) जन्मगाव? आत्मचरित्राचे नाव? (कृष्णाकाठ) 
३) त्यांचा कोणता वारसा आज शिल्लक आहे?

वसंतदादा पाटील 

त्यांना दादा असे का म्हटले जाई?

त्यांनी राज्याच्या विकासात कोणते योगदान दिले?

शिक्षण कमी असल्याने त्यांना अनेक चांगले निर्णय घेता आले पाहिजे का?

शरद पवार १) त्यांना यशस्वी राजकारणी म्हणता येईल का?२) राष्ट्रीय स्तरावर त्यांची यशवंतराव चव्हाणांसारखीच अहवेलना झाली का?३) त्यांचा पक्ष कोणत्याही पक्षाशी युती करायला तयार असतो. याला काय म्हणता येईल, लवचिक राजकारण की अनैतिक राजकारण? 
अश्वमेध १) मेध म्हणजे काय?२) अश्वमेध कोणत्या कारणासाठी केला जाई?३) शेवटचा अश्वमेध कोणी केला होता?४) पुरुषमेध होता का?  

OBC
1) डॉ आंबेडकरांनी OBC आरक्षणाला पाठिंबा दिला होता का?
२) आरक्षण जाती आधारित आहे कि वर्ग आधारित?
३) इतर समाजांना OBC यादीत समाविष्ट करण्याच्या कल्पनेला तुमचा पाठिंबा आहे का?
४) नॉन – क्रिमी लेअरचा निकष हटवला जावा किंवा निदान इतर आरक्षणांनाही लागू केला जावा असे तुम्हाला वाटते का?
५) आरक्षण आर्थिक निकषांवर दिले पाहिजे का?
६) न्यायालयांनी आरक्षणावर घातलेली ५०% ची मर्यादा दूर केली पाहिजे का?
७) सगळ्या समाजांना त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षण दिले जावे का?

SC
१) अँट्रोसिटी कायद्याचा गैरवापार होत आहे असे तुम्हाला वाटते का?
२) SC यादी वाढवायला हवी का?
३) आपण एखादी ‘गिव्ह अप ‘ मोहीम चालवून ज्यांनी आधीच आरक्षणाचा लाभ घेतला आहे त्यांना आरक्षण घेण्यापासून परावृत्त केले पाहिजे का?
४) SC आरक्षण हे जातीनुसार आहे की वर्गानुसार?
५) भारतीय समाज जातीमुक्त होऊ शकतो का?
६) रोहित वेमुला कोण होता? OBC कि SC? (त्याचे वडील OBC व आई SC होती)

ST
१) ST ना ‘आदिवासी’ म्हटले जावे की ‘वनवासी’?
२) ST समाजामध्ये एखादे डॉ. आंबेडकर येऊ शकतात का?
३) आतापर्यंत ST समाजांना  मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न कितपत यशस्वी झाले आहेत? त्या प्रयत्नामुळे आदिवासी समाजाची सांस्कृतिक वैशिष्ट्ये लोप पावत आहे का?
४) लोकसंख्येने भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती? महाराष्ट्रातील?
५) भारतातील आदिवासींचा इतिहास हा हिंसक उठावांनी भरलेला आहे व त्याचेच प्रतिबिंब नक्षलवादी हिंसेत पडले आहे असे म्हणता येईल का?
६) भारतामध्ये आपण मूळ समाज (aborigin ) मानतो का?
७)आदिवासी जमाती मध्ये जातीव्यवस्था असते का?
८) ऑस्ट्रोसिटी कायद्याचे संरक्षण आदिवासी नाही उपलब्ध आहे का?
९) आदिवासी संस्कृती पितृसत्ताक आहेत का? (नागांनी महिला आरक्षणाला विरोध केला आहे)
१०) आदिवासी मुख्य प्रवाह आणणे गरजेचे आहे का?
११) आदिवासींचे शहरीकरण केले पाहिजे का?
१२) आदिवासींच्या उत्थानात शिक्षणाचा वाटा कितपत आहे?
१३) आदिवासी विद्यार्थ्यांना कोणत्या माध्यमातून शिक्षण दिले जावे? मातृभाषेत की राज्यभाषेत की हिंदीत की इंग्रजीत?
१४) आदिवासी भागांचा विकास करण्यासाठी निसर्ग-पर्यटन हि संकल्पना सोयीची आहे का?

विमुक्त जमाती 

३१ ऑगस्ट १९५२ – गुन्हेगारी जमाती कायदा रद्द, २०० जमाती कायद्यातून मुक्त, म्हणून ३१ ऑगस्ट विमुक्त दिन 

What is Habbitual Offenders Act? तो कोणाला लागू होतो? 

SEBC
१) आर्थिक दुर्बल घटकांसाठीचे आरक्षण (EWS) SEBC ला दिले जावे का?
२) SEBC  हा प्रवर्ग OBC प्रेक्षक वेगळा कसा आहे?
३) SEBCला OBC आरक्षणात समाविष्ट करून घेतले पाहिजे का?
४) आर्थिक मागासलेपणाचा निकष फक्त दोन पिढ्यांपुरताच लावला जावा का?

IT
१) ज्ञान सर्वोच्च असते कि माहिती?
२) आपण माहितीच्या सुनामी युगात जगतो आहोत का?
३) जे माहितीवर नियंत्रण ठेवतात तेच जगावर नियंत्रण ठेवतात असे म्हणता येईल का?
४) फेसबूकवरील  माहितीवर कोणते अधिकार आहे, कंपनीचा की लोकांचा?
५) IT मधील तेजी संपली आहे का? यात पुन्हा मागणी निर्माण होईन का? की कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मनुष्यबळाची गरज कमी होत जाईल?
६) IT  क्षेत्र अजूनही सूर्योदय (sunrise) क्षेत्र आहे का?
७) तुम्ही कधी स्टार्टअप काढायचा विचार केला नाही का?
८) एक IT मधील पदवीधर म्हणून GST व आधार या दोघांतील समस्यांचे निराकरण करण्यासाठी तुम्ही काय कराल?
९) डाटा ची सुरक्षा कशी  ठेवली पाहिजे?
१०) तुमचा ओपन सॉफ्टवेअर आंदोलनाला पाठिंबा आहे का? तुम्ही कधी लिनक्स किंवा रेड हॅट किंवा उम्बक्तु यांचा वापर केला आहे का?
११) केरळ मधील ‘शाळांमध्ये IT’ या प्रकल्याची वैशिष्ट्ये कोणती?
१२) क्युबिट काय असतात? क्वांटम तंत्रज्ञान क्षेत्रात पाय रोवण्यासाठी भारताने कोणती पावले उचलली आहेत?
१३) डिजिटल इंडियाकडे जो आपला प्रवास चालला आहे त्यातून डिजिटल हुकूमशहा सत्ताधीश होईल असे वाटत नाही का?
१४) सरकारी कामकाजाच्या पद्धती / प्रक्रिया / कामकाज यात काय कमतरता असतात?
१५) लोकसेवेची परिणाम कारकता वाढवण्यासाठी IT चा कशाप्रकारे करून घेता येईल?
१६) डिजिटल ट्विन हि संकल्पना काय आहे?
१७) भारताला स्वतःचे मार्क झुकेरबर्ग व बिल गेट्स तयार करता येतील का?
१८) शक्ती मायक्रोचीपला एक दिवस इंटेलवर मात करता येईल असे तुम्हाला वाटते का?
१९) ‘नॅशनल सुपर कॉम्पुटिंग मिशन’ काय आहे?
२०) चीनने जशी पेटाफ्लॅप संगणकाची साखळी बनवली आहे  तशी ती आपल्याला बनवतात येईंल का?
२१) ‘ परम शिवाय’ची गणनशक्ती किती आहे?
२२) संस्कृत ही सूचनावली लिहिण्यासाठी सर्वोत्तम भाषा आहे का?

रसायन शास्त्र 

) किमयाशास्त्राचेरसायनशास्त्राच्याविकासातकोणतेयोगदानआहे

?२

) आपलामेंदू रसायनांनी बनलेलाअसतो का

?३

) रसरत्नाकरहेपुस्तककोणीलिहिले

? ४

) औषधांच्यादुकानालाकेमिस्टअसे काम्हणतात

?५

) सेंद्रियरसायनशास्त्रचांगलेकिअसेंद्रिय

 (inorganic)?६

) इंटरकॅलेशन कायअसते

?७

) लिथीयनआयनबॅटरीहाशोधमैलाचादगडकसाआहे

?८

) CNR राव यांचेरसायनशास्त्रातीलयोगदानकोणते

?९

) मागचेरसायनशास्त्रातीलनोबेलकोणत्याशोधाबद्दलमिळाले

?  १०

) कुठल्यारासायनिकसंयुगांमुळेमेहरौलीचालोहस्तंभ गेलीकित्येकशतकेनगंजताउभाआहे

?११

) जररासायनिकअपघातझालातरतुम्हीकोणत्याउपाययोजनाकराल

?१२) ११९ सावे संयुग कोणते असेल?१३

) २०१९हेकशाचेआंतरराष्ट्रीयवर्षघोषितकरण्यातआले

?

गणित

१) वैदिक गणित काय असते? ते कितपत उपयोगी आहे? वैदिक काळात शून्य होते का? 

२) गणिताचा तत्वज्ञानाशी काय संबंध आहे? 

३) भारताने शून्याचा शोध कसा लावला?

४) शुद्ध गणिताला विज्ञान म्हणता येईल का? कारण आकडे हेच एक गृहितीक आहेत.  

५) ग्वाल्हेर व गणित यांचा काय संबंध आहे?

६) गणित आणि खगोल शास्त्र यांचा सहसंबंध आहे का ? 

७) टिळकांनी गणित व खगोलशास्त्रावर कोणते गणित लिहिले? 

८) रामानुजम यांचे गणितातील योगदान कोणते? विशेषतः प्राईम नंबर्स बाबतीत 

९) रामानुजम यांच्याशी कोणता आकडा संबंधित आहे? का? 

१०) रामानुजम यांचा वाढदिवस काय म्हणून साजरा केला जातो? तो कोणता आहे? 

११) पाय ( Pi ) दिवस कोणता असतो? 

१२) ‘ द मॅन हू क्न्यु इन्फिनिटी’ हा सिनेमा तुम्ही बघितला आहे का? 

१३) जॉश नॅश यांचे गेम थिअरीत कोणते योगदान आहे? 

१४) गणित विषयात मूल्यव्यवस्था अंतर्भूत असते का?

१५) मंजुल भार्गव यांचे गणित या विषयात कोणते  योगदान आहे? 

१६) कोणत्या अवार्डला गणिताचे नोबेल असे म्हणतात? 

१७) फिल्ड मेडल आणि अबेल अवार्ड यात काय फरक आहे? 

१८) रँग्लर ही पदवी कशी मिळते? ट्रायपॉस पास होणे काय असते? 

१९) गणिताला महागड्या प्रयोगशाळा लागतात का? मग आपण विज्ञानाच्या या अंगातही का मागे पडलो आहोत?

२०) भारतात गणिताला लोकप्रिय करायचे मार्ग सांगा? 

२१) गणिताचा प्रशासनात कसा उपयोग करता येऊ शकतो? 

२२) मेट्रिक्स काय असते? 

२३) बुलन अल्जेब्रा काय असते? अलजेब्रा नाव कसे आले? 

मराठी साहित्य

– अलंकार किती? कोणते? उदाहरणे?

– हिरवे हिरवे गार गालिचे …. अलंकार कोणता?

– यमकाचे उदाहरण सांगा. 

– वृत्त म्हणजे काय? कोणकोणते?

– ‘जे खळांची व्यंकटी सांडो..” अर्थ काय? 

बळीराजाचे जग 

घरची शेती असेल तर सखोल माहिती घ्यायला हवी. मी त्यात लक्ष घालत नाही व त्यामुळे मला फारशी माहिती नाही हे समर्थन लंगडे आहे. तुम्ही शेतकरी समाजातून आला आहात हा एक मोठा प्लस पॉईंट ठरू शकतो. पण आपण शेतकऱ्यांच्या भावनांशी एकरूप झालो आहोत हे दाखवून देता आले पाहिजे. शेती व ग्रामीण पार्श्वभूमीतून प्रशासनात येणे  हे एक सामर्थ्यस्थळ आहे, मर्मस्थान नव्हे. अशा उमेदवारांकडे समस्यांकडे बघण्याचा जास्त वास्तववादी दृष्टिकोन असू शकतो.
बेगडी जवळीक नको 
पार्श्वभूमी असूनही जर उमेदवार त्या प्रश्नांवर चर्चा करायला नाखूष असेल किंवा त्याची माहिती उथळ असेल तर याचा नकारात्मक ठसा पॅनलवर उमटतो. उदा. अनेक उमेदवार आपल्या कुटुंबाचे शेतीतून मिळणारे उत्पन्न अगदी नाममात्र दाखवतात. तसे ते असेलही. पण मग काही पूरक प्रश्न तयार होतात. तुमचे कुटुंब दारिद्र्यरेषेखाली मोडते का? दारिद्र्यरेषा कशी ठरवतात? तुमच्याकडे कोणते रेशनकार्ड आहे? या प्रश्नांची समर्पक उत्तरे देता आली तरच तुम्ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेती व्यवसायात पुरेसा रस घेता असे सिद्ध होईल.
संगती
उमेदवाराच्या उत्तरात संगती असणे अपेक्षित आहे. मी आदिवासींमध्ये जाऊन शाश्वत शेतीचा प्रसार करतो असे सांगून मग आमच्या घरच्या शेतीत आम्ही ऊस घेतो हे असंगतीचे उदाहरण आहे. शेतीव्यवसायाला बाजार खुले झाले पाहिजे असे म्हणून नंतर देशांतर्गत महागाई आटोक्यात आणण्यासाठी शेतमालाच्या निर्यातीवर बंधने आणली पाहिजेत असे म्हणणे ही विसंगती ठरेल. शेतीतून पुरेसा नफा मिळाला पाहिजे असे म्हणतानाच शेती उत्पन्नावर कर लावण्यास सहमती दर्शवावी लागेल.
प्रश्नांचा मागोवा 
१) तुमच्याकडे किसान क्रेडिट कार्ड आहे का? तुमचे पीक फसल बीमा योजनेखाली आले आहे का?
२) तुम्ही कोणती पिके घेता? त्यासाठी किती गोणी खते वापरता? तुम्ही तुमच्या मालाची विक्री कशी करता?
३) ई-नाम, पाळीव प्राणी अभियान, सुक्ष्म सिंचन अभियान यांची माहिती.
४) जलव्यवस्थापन तंत्रे उदा. गोकुळ, वनराई बंधारे, शिरपूर पॅटर्न, शेततळी, जलयुक्त शिवार योजना. राजस्थानातील जोहड किंवा आपल्याकडील शिवकालीन पाणी साठवण योजना.
५) ‘उत्पादन खर्चावर आधारीत शेतमालाला किंमत’ हा तर्क तुम्हाला मान्य आहे का?
६) शेती ही संस्कृती आहे की व्यवसाय आहे?
७) ऍग्रो-क्लायमॅटिक झोन काय असतात? भारतात ते किती आहेत? त्यानुसार आपल्याकडे पीक पद्धती आहे का?
८) शेतीमध्ये जैव-तंत्रज्ञानाला कितपत वाव दिला पाहिजे? सेंद्रिय शेताला प्रोत्साहन दिले पाहिजे की असेंद्रिय शेतीला?
९) शेतीला अनुदानांची गरज आहे का? शेती स्वबळावर टिकू शकत नाही का?
१०) शेतीला कर्जमाफी दिली पाहिजे का? त्याची उद्योगांना दिलेल्या कर्जमाफीशी तुलना करा.
११) भारतात आपण कंपन्यांकडून शेती (कॉर्पोरेट फार्मिंग) करायला परवानगी दयायला हवी का?
१२) भारतीय शेतीचे खाजगीकरण करायची गरज आहे का?
१३) शेतकऱ्यांच्या कंपन्या उभ्या केल्या तर त्याचा शेतीला फायदा होईल की तोटा?
१४) शेतीसाठी अर्थसंकल्पात कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत? शेतीचा वेगळा अर्थसंकल्प मांडण्याची गरज आहे का?
१५) कराराची शेती व शेतजमीन भाडेपट्टयाने देणे (लँड लिजिंग) यात काय फरक आहे?
१६) शेतीचे यांत्रिकीकरण करायची गरज आहे का? त्यामुळे बेरोजगारी वाढेल का?
१७) उदारीकरणाचा शेती व्यवसायाला फायदा झाला आहे की तोटा?

१८) टोमॅटो व वांगी ही फळे आहेत की भाजीपाला? 

१९) कडधान्य व भरडधान्य यात फरक काय? 

मास्तरकी 
ज्ञानरूपी वसा 
जर पालकच शिक्षक असतील तर शिक्षक म्हणून करियरचा विचार का केला नाही हा पहिलाच प्रश्न असतो. चांगल्या शिक्षकांची देशाला नितांत गरज आहे. याचे उत्तर शिक्षकी पेशातून फारसे काही होत नाही असे दिले तर याचा अर्थ तुमच्या पालकांचा निर्णय चुकला असा होतो. तेव्हा प्रशासन हे कसे जास्त वैविध्यपूर्ण व आव्हानात्मक आहे अशा सकारात्मक कारणीमीमांसेवर चर्चा केलेली बरी. अर्थात तिथेही प्रशासक जास्त महत्वाचा की शिक्षक असा पेच आहेच. प्रशासन हे शिक्षणाचे उपयोजित (applied) रूप आहे असा निष्कर्ष काढता येईल.
प्रश्नांचा मागोवा 
१) तुम्ही जर शिक्षणमंत्री झालात तर शिक्षण क्षेत्रात कोणत्या सुधारणा घडवून आणाल?
२) वर्तनवादी शिक्षणपद्धतीकडून ज्ञानरचनावादी शिक्षणपद्धतीकडे वाटचाल यावर चर्चा.
३) चांगल्या शिक्षकाकडे कोणते गुण असले पाहिजेत? शिकवण्यासाठी तंत्रज्ञानाचा कितपत वापर केला पाहिजे?
४) अजूनही आपल्याकडे सरकारकडून शिक्षणावर पुरेसा खर्च केला जात नाही, याची काय कारणे असावीत?
५) आपले शिक्षण अजूनही मॅकोलियन शिक्षणपद्धती राबवते का?
६) शिक्षणाचा मूलभूत अधिकार कायदा (RTE) कितपत यशस्वी ठरला आहे?
७) ‘शेजार शाळा’ संकल्पना काय आहे?
८) आपण खाजगी शाळांना प्रोत्साहन दिले पाहिजे की सरकारी शाळांना?
९) सरकारी शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण स्टॅम्पसारखी योजना राबवली पाहिजे का?
१०) अमेरिकेतील ‘समान शाळा’ कार्यक्रम काय आहे?
११) शिक्षणाच्या दृष्टीने बुद्धयांक (IQ) महत्वाचा की भावनांक (EQ) महत्वाचा?
१२) प्राथमिक शिक्षणाचे माध्यम कुठले असले पाहिजे?
१३) सेमी-इंग्रजी माध्यम योग्य आहे का?
१४) आदिवासींच्या शिक्षणासाठी वेगळा अभ्यासक्रम तयार करायची गरज आहे का?
१५) शांतिनिकेतन, विश्वभारती हे प्रयोग काय आहेत?
१६) नयी तालीम किंवा बुनियादी शिक्षा या शिक्षण प्रणालीची वैशिष्टये कोणती?
१७) सर्व शिक्षा अभियान २.० काय आहे?
१८) सहशिक्षण दिले जावे की मुलामुलींना वेगळे शिक्षण दिले जावे?
१९) विद्यापीठ अनुदान आयोगाची कार्यकक्षा विस्तारली पाहिजे की कमी केली पाहिजे?
२०) उच्च शिक्षण स्वयंपूर्ण (self-financed) केले पाहिजे का?
२१) भारतात आपण तांत्रिक शिक्षणाला महत्व दिले पाहिजे की मानव्य विद्याशाखांना?
२२) विद्याशाखांमध्ये आपापसातील देवाणघेवाण (inter-disciplinary approach) वाढवण्यासाठी काय करता येईल? क्रेडिट पद्धतीचा यासाठी वापर करता येईल का?
२३) भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी आपण प्रोत्साहीत करायला हवे की नाही?
२४) शिक्षण संस्थांना स्वायत्तता दिली पाहिजे की सरकारचे त्यांच्यावर कडक नियंत्रण असायला हवे?
२५) आपण जर दूरस्थ शिक्षणाला प्रोत्साहन दिले तर त्याचा शिक्षणाच्या दर्जावर परिणाम होणार नाही का?
२६) भारतीय विद्यापीठांना जागतिक मानांकनात स्थान का मिळत नाही?
२७) शिक्षण क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला मान्यता दिली पाहिजे का?
२८) पाश्चात्य पद्धतीचे शिक्षण थांबवून गुरु-शिष्य परंपरेला प्रोत्साहन दिले पाहिजे का?
२९) विवेकानंद म्हणत की, ‘मला माणूस घडवणारे शिक्षण हवे आहे’, म्हणजे काय?
३०) ज्या प्रमाणात भारतात शिक्षणाचा प्रसार होत आहे त्या प्रमाणात आधुनिकतेचा प्रसार होत आहे का? नसल्यास का होत नाही आहे?
३१) आनंददायी शिक्षण काय आहे?
३२) शिक्षण कायद्यामध्ये शिक्षकांकडून नियमबाह्य कामे करुन घ्यायची तरतूद आहे का? असल्यास कोणती?
३३) व्होकेशनल शिक्षण ही कोणाची शिफारस होती?
३४) कोठारी आयोग कधीचा आहे?
३५) नविन शैक्षणिक धोरण समितीचे अध्यक्ष कोण?
३६) शाळा बंद केल्या तर एवढा गहजब का?
३७) दिल्लीने शाळांमध्ये कोणता बदल घडवून आणला?
३८) मित्रा कार्यक्रम उपक्रम काय आहे?

आदिवासी विकास 

आदिवासी व वनवासी यात काय फरक आहे?

आदिवासी हे नाव मूळ रहिवासी म्हणून आहे की आदिम स्तिथीमधील आहेत म्हणून?

धनगरांना आदिवासी आरक्षण दिले पाहिजे का?

आदिवासींची संख्या वाढू शकते का?

आदिवासींचे नेहुरुंच्या काळातील पंचशील कोणते? ते धोरण आजही लागू आहे का?

आदिवासींना मुख्य प्रवाहात सामावून घेतले पाहिजे का?

महाराष्ट्रातील सर्वाधिक संख्येचे आदिवासी कोणते? सर्वात कमी?

महाराष्ट्रातील PVTG किती आहेत? कोणते?

आदिवासी भाषा नष्टप्राय होत आहेत का? कोणत्या?

राष्ट्रपती कोणत्या आदिवासी गटातील आहेत? 

भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती?

आदिवासी विकास मंत्रालयाचे बजेट किती आहे?

कोण मंत्री आहेत?

आमच्या गावात आम्हीच सरकार ही घोषणा कोणत्या गावाने दिली?

त्या चळवळीचे नेतृत्व कोणी केले?

वनहक्क कायदा काय आहे? त्याची अंमलबजावणी परिणामकारक आहे का?

चैत्राम पवार कोण आहेत? राहीबाई पोपरे? नजूबाई गावित?

जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकाचे लेखक कोण? कोणाबद्दल आहे?

शबरी योजना काय आहे?

Preferences suggested for the MPSC posts 

1) DC( Postings in collector office and As a Prant, deputation in other departments)
Or
Dy. SP(Promotion is faster than DC, uniform service)

2) Tahsildar(Taluka level, magistrate Rights)
Or
SP excise( District level post, small department, promotion)

3) ARTO ( office job, promotion as dy. RTO who is head of office)
Or
ACST( sales tax dept, office job, city posting)
Or
DY SP excise( promotion good, small department)
Or
Dy. CEO- BDO( Taluka level little bit hard job, posting as BDO for 3-6 years)

4) Section officer ( mantralaya posting, Mumbai city location, office job)

Or
Chief officer( Urban development, Admin head if nagarpalika, independent work)
Or
Naib tahsildar ( Revenue dept, diverse work at taluka level, promotion aft 10 years as tahsildar)
Or
ABDO( To assist BDO And Dy. CEO, faster promotion)
Or
DSLR- land record ( taluka level, land record related work)
OrAsst commissioner state excise ( office job, posting mainly in cities)

Lokayan IAS Academy

Privacy Policy | Terms and Conditions | Disclaimer